5 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
5 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 फेब्रुवारी 2023)
न्यायवृंदाच्या शिफारशीनुसार पाच न्यायमूर्तीच्या नियुक्तीस मंजुरी:
- न्यायवृंदाने केलेल्या शिफारशीनुसार शनिवारी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीची नियुक्ती करण्यात आली.
- न्यायवृंदाने गेल्या वर्षी 13 डिसेंबरला न्यायमूर्तीच्या नावांची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.
- सर्वोच्च न्यायालयापुढे नमते घेत न्यायवृंदाने शिफारस केलेल्या नावांना केंद्राला अखेर मंजुरी द्यावी लागली.
- पंतप्रधान कार्यालयाने 2 फेब्रुवारीला नियुक्त्यांना मंजुरी दिल्यानंतर न्यायमूर्तीची नावे नियुक्तीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती.
- राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती पंकज मिथल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय करोल, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पी. व्ही. संजयकुमार, पाटणा उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती
- अहसानुद्दीन अमनुल्लाह आणि अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे.
- हे पाच न्यायमूर्ती पुढच्या आठवडय़ात शपथ ग्रहण करतील.
- त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची संख्या 32 होईल.
Must Read (नक्की वाचा):
‘अग्निवीर’साठी आता प्रवेश परीक्षा भरती प्रक्रियेत बदल:
- लष्कराने ‘अग्नीवीर’ भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत.
- त्याअंतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना आता प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल.
- यानंतर उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.
- आधीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नंतर अंतिम टप्प्यावर प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे.
- मात्र, आता ‘ऑनलाइन’ प्रवेश परीक्षा हा पहिला टप्पा असेल.
जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरवर बंदी:
- भारताची जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी आढळल्यामुळे 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
- आंतरराष्ट्रीय चाचणी संघटनेने (आयटीए) घेतलेल्या उत्तेजक सेवन चाचणीमध्ये दीपा दोषी आढळल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
- गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघाच्या संकेतस्थळावर दीपाची ‘निलंबित’ अशी नोंद करण्यात आली आहे.
- मात्र, दीपाचे निलंबन हे उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाशी संबंधित नसल्याचे राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स संघटनेकडून सांगण्यात आले होते.
- आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघासाठी काम करणाऱ्या ‘आयटीए’ या स्वतंत्र उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने दीपाची स्पर्धाविरहित कालावधीत चाचणी घेतली होती.
- यात दीपाच्या शरीरात ‘हिजेनामाइन’ हे उत्तेजक सापडले आहे. या द्रव्यावर जागतिक प्रतिबंधक संस्थेने बंदी घातली आहे.
महाराष्ट्राच्या बॉक्सिंगपटूंची सुवर्ण हॅट्ट्रिक:
- महाराष्ट्राच्या बॉक्सिंगपटूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शनिवारी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली.
- मात्र, याच क्रीडा प्रकारातील हरियाणाच्या अपेक्षित यशाने महाराष्ट्राला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरावे लागले.
- यजमान मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे.
- महाराष्ट्राकडून शनिवारी देविका घोरपडे, कुणाल घोरपडे, उमर शेख (तिघे बॉक्सिंग) आणि सारा राऊळ (जिम्नॅस्टिक) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
- सायकिलगमध्ये पूजा दानोळे, संज्ञा कोकाटेचे यश कायम राहिले. ॲथलेटिक्समध्ये रिले शर्यतीत मुलींनी सुवर्ण कामगिरी केली.
- बॉक्सिंगमध्ये देविका, उमर, कुणालला सुवर्ण बॉक्सिंग प्रकारात महाराष्ट्राचे चार खेळाडू अंतिम फेरीत होते.
- यापैकी उमर अन्वर शेख, देविका घोरपडे, कुणाल घोरपडे या तिघा पुण्याच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली.
दिनविशेष:
- चार्ली चॅप्लिनने सन 1919 मध्ये इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली होती.
- सन 1952 मध्ये स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.
- सन 2003 या वर्षी भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
- पुण्याची स्वाती घाटे ही सन 2004 या वर्षी बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.