5 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

सुंदर पिचाईं
सुंदर पिचाईं

5 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 डिसेंबर 2022)

सुंदर पिचाईंना ‘पद्म भूषण’ प्रदान :

 • गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ प्रदान करण्यात आला.
 • भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग प्रकारात 2022 या वर्षासाठी पिचाई यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • यावर्षीच्या सुरवातीला ‘पद्म भूषण’ पुरस्कारासाठी 17 दिग्गजांची नावं सरकारकडून घोषित करण्यात आली होती.

अंदमानच्या बेटांना ‘परमवीर चक्र’ विजेत्यांची नावे :

 • केंद्र सरकारने अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील 21 निर्मनुष्य बेटांना देशाचा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार असलेल्या ‘परमवीर चक्र’प्राप्त शूर सैनिकांची नावे दिली आहेत.
 • या 21 बेटांपैकी 16 उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यात आहेत, तर पाच बेटे दक्षिण अंदमानमध्ये आहेत.
 • अंदमान-निकोबार बेटांचे खासदार कुलदीप राय शर्मा यांनी संरक्षण व स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने या शूर सैनिकांची नावे 21 बेटांना नाव देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले.
 • उत्तर व मध्य अंदमानमधील ‘आयएनएएन 370’ क्रमांकाच्या पहिल्या निर्जन बेटाला मेजर सोमनाथ शर्माचे नाव देण्यात आले. आता ते ‘सोमनाथ द्वीप’ म्हणून ओळखले जाईल.
 • ‘आयएनएएन 308’ क्रमांकाच्या बेटाला ‘करमसिंग द्वीप’ असे नाव देण्यात आले.
 • तसेच मेजर राम राघोबा राणे, नाईक जदुनाथसिंग, कंपनी हवालदार मेजर पिरूसिंग शेखावत, कॅप्टन गुरबचनसिंग सलारिया, लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा मगर, सुभेदार जोगिंदर सिंग साहनन, मेजर शैतानसिंग भाटी, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुजरेरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, कर्नल होशियार सिंग दहिया, सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मल जीतसिंग सेखोन, मेजर रामस्वामी परमेश्वरन, कॅप्टन बाणा सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे आणि सुभेदार मेजर संजय कुमार या सर्व परमवीर चक्राने सन्मानित योद्धय़ांची नावे या बेटांना देण्यात आली आहेत.

बांगलादेशचा भारतावर रोमहर्षक विजय :

 • शकिब अल हसनची प्रभावी गोलंदाजी आणि त्यानंतर मेहदी हसन मिराज-मुस्तफीझूर रहमान यांच्यातील अखेरच्या गडय़ासाठी झालेल्या अविश्वसनीय 51 धावांच्या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा एक गडी आणि 24 चेंडू राखून पराभव केला.
 • प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताचा डाव 41.2 षटकांत 186 धावांत संपुष्टात आला.

कर्णधार रोहित शर्माने मोडला ‘या’ दिग्गज खेळाडूचा विक्रम :

 • बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात येताच रोहित शर्माने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला.
 • वास्तविक, आता रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अझहरने केलेल्या धावांचा आकडा पार करण्यात यश मिळवले आहे.
 • मोहम्मद अझरुद्दीनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9376 धावा केल्या आहेत, तर आता रोहित त्याच्या पुढे गेला असून त्याने बाद होण्याआधी पर्यंतच्या केलेल्या धावांचा विचार करता त्याने 9378 धावा केल्या.
 • मर्यादित षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितने सहावे स्थान पटकावताना मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले.

दिनविशेष:

 • 5 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक माती दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना सन 1906 मध्ये 5 डिसेंबर रोजी झाली.
 • भारताचे 14वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल ‘जयंत नाडकर्णी‘ यांचा जन्म 5 डिसेंबर 1931 मध्ये झाला.
 • सन 2016 मध्ये गौरव गिल यांनी ‘आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप 2016‘ हा किताब जिंकला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.