5 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

5 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 डिसेंबर 2020)

भारतीय वंशाची संशोधक ‘टाइम’च्या पहिल्या ‘किड ऑफ द इयर’ची मानकरी :

  • भारतीय-अमेरिकी वंशाच्या गीतांजली राव या पंधरा वर्षांच्या संशोधक मुलीस ‘टाइम’चा पहिलाच ‘किड ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तिने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत.
  • तर टाइम नियतकालिकाने म्हटले आहे की, हे जग ज्यांनी त्याला आकार दिला त्यांचे आहे. जग अनिश्चिततेकडे जात असताना नव्या पिढीतील मुले संशोधनातून जी उत्तरे शोधत आहेत ती महत्त्वाची आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.
  • तसेच टाइमने पाच हजार उमेदवारांतून राव हिची निवड केली असून तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली.
  • निरीक्षण, संशोधन, संदेशवहन, विचार-चर्चा यातून आपण काही समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असे गीतांजलीने आभासी मुलाखतीत सांगितले. दूषित पाण्यापासून अनेक समस्यांवर तिने अभिनव उत्तरे शोधली असून गप्पांमधूनही तिच्या बुद्धीची चमक प्रत्ययास आली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 डिसेंबर 2020)

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची झायडस कॅडिलास परवानगी :

  • झायडस कॅडिलाने तयार केलेल्या ‘झायकोव-डी’ या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना भारताच्या महाऔषधनियंत्रकांनी परवानगी दिली आहे.
  • तसेच ‘पेगीहेप’या जैविक उपचार पद्धतीच्या चाचण्यांनाही परवानगी देण्यात आली आहे. करोना प्रतिबंधक लस निर्मिती यशस्वीरीत्या करण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू असताना झायडसला ही परवानगी मिळाल्याने त्यांनी एक मोठा टप्पा ओलांडला गेला आहे.
  • झायडस कॅडिलाने ‘पेगीहेप’ उपचार पद्धतीच्या पहिल्या दोन वैद्यकीय चाचण्या गेल्या महिन्यात केल्या होत्या.
  • त्यानंतर ही उपचार पद्धत व लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी परवानगीकरिता अर्ज केला होता.
  • तर या चाचण्या डिसेंबरमध्ये सुरू होणार असून भारतातील 20—25 केंद्रात 250 स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे.

UN चा ऐतिहासिक निर्णय :

  • संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला (भांग) धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने (CND) बुधवारी हा निर्णय घेतला आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले आहे.
  • तर यासाठी झालेल्या मतदानात 27 देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले.
  • विशेष म्हणजे यावेळी भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केलं. तर, चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या 25 देशांनी विरोधात मतदान केले.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयानंतर गांजा किंवा भांगपासून बनलेल्या औषधांचा वापर वाढू शकतो. याशिवाय गांजाच्या साइंटिफिक रिसर्चसाठीही चालना मिळू शकते. या निर्णयानंतर अनेक देश गांजा किंवा भांगच्या वापराबाबतच्या आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जडेजाने मोडला धोनीचा विक्रम :

  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
  • तिसऱ्या वन-डे सामन्यात हार्दिक पांड्यासोबत महत्वपूर्ण दीडशतकी भागीदारी केलेल्या जाडेजाने पहिल्या टी-20 सामन्यातही महत्वाची भूमिका बजावली.
  • 5 बाद 92 अशी परिस्थिती असताना जाडेजाने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत टीम इंडियाला 161 धावांचा टप्पा गाठून दिला.
  • रविंद्र जाडेजाने अखेरच्या षटकांत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. 23 चेंडूत 5चौकार आणि एका षटकारासह जाडेजाने नाबाद 44 धावा केल्या.
  • यानिमीत्ताने जाडेजाने धोनीचा विक्रमही मोडला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता जाडेजाच्या नावावर जमा झाला आहे.

दिनविशेष:

  • 5 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक माती दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना सन 1906 मध्ये 5 डिसेंबर रोजी झाली.
  • भारताचे 14वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल ‘जयंत नाडकर्णी‘ यांचा जन्म 5 डिसेंबर 1931 मध्ये झाला.
  • सन 2016 मध्ये गौरव गिल यांनी ‘आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप 2016‘ हा किताब जिंकला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.