5 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 December 2018 Current Affairs In Marathi

5 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 डिसेंबर 2018)

देशातील सर्वात अवजड उपग्रह GSAT-11 चे प्रक्षेपण:

 • अखेर तो क्षण आलाच जेव्हा देशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चे प्रक्षेपण करण्यात आले. 5,854 वजन असणाऱ्या या उपग्रहाचे आज (5 डिसेंबर) सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आले. GSAT-11
 • हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल. हा उपग्रह इतका मोठा आहे की, प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा मोठा  आहे, जो एका मोठ्या रुमइतका असल्याचे सांगितले जात आहे.
 • याआधी वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून परत मागवले होते.
 • Gsat-6A च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास Gsat-6A अनियंत्रित झाला होता आणि 29 मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता.
 • यानंतर GSAT-11 चे प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक निरीक्षण आणि तपासण्या केल्यानंतरच GSAT-11 चे प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
 • तसेच हा उपग्रह इंटरनेटच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरेल असा दावा केला जात आहे. उपग्रहाचे काम सुरु झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल. GSAT-11 च्या सहाय्याने प्रत्येत सेकंदाला 100 गीगाबाइट हून जास्त ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 डिसेंबर 2018)

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारताला मोठे यश:

 • व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी भारताला मोठे यश मिळाले आहे. 3600 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यातील कथीत दलाल आणि ब्रिटिश नागरिक ख्रिश्चिअन मिशेलला भारतात आणण्यात येत आहे.
 • तर त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून भारताच्या तपास यंत्रणा मिशेलला दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन गेले. त्यानंतर तेथून त्याला थेट भारतात आणण्यात येणार आहे. याबाबत काही माध्यमांनी वृत्त दिले आहे.
 • नोव्हेंबरमध्ये कसेशन कोर्टाने कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाला कायम ठेवत मिशेलच्या प्रत्यार्पणाचा मार्ग खुला केला होता. वृत्तानुसार, 54 वर्षीय मिशेलला दुबई विमानतळावर नेण्यात आले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात येणार आहे.
 • भारताने 2017 मध्ये खाडीतील देशांकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. सीबीआय आणि ईडी याप्रकरणी मिशेलवर फौजदारी खटल्याप्रकरणी चौकशी करीत आहेत.

10वीच्या विद्यार्थ्यांना यू-ट्यूबव्दारे मार्गदर्शन:

 • यंदापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका दिल्या जाणार आहेत. बालभारतीकडून या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत.
 • 6 डिसेंबरपासून ते यू-ट्यूबवरील बालभारती वाहिनीवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
 • दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (2018-19) बदलण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्येही मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी करून पाठ केलेले उत्तरपत्रिकांमध्ये उतरविण्याऐवजी त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करावे, त्यांची मते नोंदवावीत यासाठी कृतिपत्रिका देण्यात येणार आहे. Youtube
 • या कृतिपत्रिकांचे सराव प्रश्नसंच ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर 26 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ बालभारतीने तयार केले आहेत.
 • येत्या 6 डिसेंबरपासून ते यू-ट्यूबवरील बालभारतीच्या वाहिनीवर उपलब्ध केले जाणार आहेत अशी माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली आहे.
 • विद्यार्थ्यांनी सराव कृतिपत्रिका सोडविल्यानंतर त्यांच्या कुठे चुका झाल्या त्या या व्हिडीओ पाहून दुरूस्त करता येणार आहेत. सर्व विषयांचे व्हिडीओ विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
 • 6 डिसेंबर रोजी सर्व प्रथम भाषा विषयांचे व्हिडीओ उपलब्ध होतील. 7 रोजी द्वितीय भाषा विषयांचे तर 8 रोजी तृतीय भाषा विषयांचे व्हिडीओ उपलब्ध होतील.

चार गुरुत्वीय लहरींची लायगो, व्हर्गो प्रकल्पात नोंद:

 • लायगो या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांतर्गत आणखी चार गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व शोधण्यात आले असून, कृष्णविवरांच्या एकमेकांवरील आघातानंतरच्या विलीनीकरणातून गुरुत्वीय लहरींची निर्मिती होत असते.
 • अमेरिकेतील लायगो व युरोपच्या व्हर्गो या गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रांनी 10 कृष्णविवरांच्या व एका न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद केली आहे.
 • यात गुरुत्वीय लहरी घटनांची नोंद GW170729, GW170809, GW170818, and GW170823 या नावांनी झाली असून, त्यातील जीडब्ल्यू 170729 या गुरुत्वीय लहरी 29 जुलै 2017 रोजी नोंदल्या गेल्या.
 • तर त्या जास्त वस्तुमान असलेल्या दूरस्थ स्रोतापासून आलेल्या होत्या. त्यातील विलीनीकरणाची घटना ही पाच अब्ज वर्षांपूर्वीची असून, त्यात निर्माण झालेली ऊर्जा ही पाच सौर वस्तुमानाइतकी आहे. तिचे रूपांतर शेवटी गुरुत्वीय लहरीत झाले.
 • 12 सप्टेंबर 2015 ते 19 जानेवारी 2016 या काळात पहिल्यांदा गुरुत्वीय लहरींच्या निरीक्षणाला लायगो प्रकल्पात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रगत लायगो प्रकल्पात तीन द्वैती कृष्णविवरांच्या विलीनीकरणातून आलेल्या गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या.
 • 30 नोव्हेंबर 2016 ते 25 ऑगस्ट 2017 या काळात एका द्वैती न्यूट्रॉन ताऱ्याच्या विलीनीकरणातून व सात कृष्णविवरांच्या विलीनीकरण घटनातील गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या.

मुस्लिम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकावे:

 • बांगलादेश, पाकिस्तान आणि सीरिया यांच्यासारख्या मुस्लिम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकले पाहिजे तरच जगात शांतता नांदू शकते असे तिबेटीयन अध्यात्मिक गुरु दलाई लामा म्हणालेDalai Lamba
 • 125 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असूनही आज भारतात विविध धर्म-परंपरा आहेत. मुस्लिम देशांनी भारताकडून शिकले पाहिजे तरच जगात शांतता नांदेल असे दलाई लामा म्हणाले.
 • भारतात सर्व धर्मांमध्ये एक समन्वय असून अहिंसेच्या तत्वामुळे आज आधुनिक भारताचा विकास होत आहे असे दलाई लामा यांनी पत्रकारांना सांगितले.
 • भारत आणि चीनमध्ये असलेल्या डोकलाम वादाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चा करुन हा प्रश्न सोडवला पाहिजे. हिंदी-चिनी भाई भाई या घोषणेनुसार दोन्ही देशांमध्ये संवाद झाला पाहिजे असे दलाई लामा म्हणाले.

दिनविशेष:

 • 5 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक माती दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना सन 1906 मध्ये 5 डिसेंबर रोजी झाली.
 • भारताचे 14वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरलजयंत नाडकर्णी‘ यांचा जन्म 5 डिसेंबर 1931 मध्ये झाला.
 • सन 2016 मध्ये गौरव गिल यांनी ‘आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप 2016‘ हा किताब जिंकला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.