5 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

आयएनएस विक्रांत
आयएनएस विक्रांत

5 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2021)

संपूर्ण भारतीय बनावटीची INS Vikrant खोल समुद्रातील चाचण्यांसाठी रवाना :

  • स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ही नौदलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे.
  • तसेच खोल समुद्रातील चाचण्यांकरता आज ‘विक्रांत’ कोची बंदरातून रवाना झाली.
  • तर या चाचण्या यशस्वी झाल्या तर लवकरच 40 हजार टन वजनाची ‘आयएनएस विक्रांत’नौदलात दाखल होईल.
  • 2009 साली ‘आयएनएस विक्रांत’च्या बांधणीला कोचीमध्ये सुरुवात झाली. 2014 साली तिचे जलावतरण झाले.
  • तसेच विक्रांतच्या प्राथमिक चाचण्या या कोची बंदराजवळ नुकत्याच पूर्ण झाल्या होत्या. आता पुढील काही आठवडे ‘आयएनएस विक्रांत’च्या खोल समुद्रात सखोल चाचण्या घेतल्या जातील.
  • तसेच यामध्ये विमानवाहू युद्धनौकेची कार्यक्षमता तपासली जाईल, सर्व उपकरणांच्या चाचण्या घेतल्या जातील तसेच युद्धनौकेवरून लढाऊ विमान आणि विविध हेलिकॉप्टर यांची पूर्ण क्षमतेने उड्डाणे होतील.
  • तर स्वबळावर विमानवाहू युद्धनौका बांधण्याचे तंत्रज्ञान जगात फक्त मोजक्या देशांकडे आहे, यामध्ये आता भारतही दाखल होणार आहे.
  • सध्या भारताकडे ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे. ‘विक्रमादित्य’ ही रशियाकडून नूतनीकरण करत आपण विकत घेतली आहे.
  • तसेच याआधी ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘आयएनएस विराट’ या विमानवाहू युद्धनौका इंग्लंडकडून घेतल्या होत्या, ज्या आता नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2021)

बॉक्सिंग मध्ये लवलिनाला कांस्य :

  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आधीच पदकनिश्चिती करणाऱ्या बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहाइनला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • बुधवारी महिलांच्या 69 किलो वजनी गटात टर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेलीने लवलिनाला धूळ चारून अंतिम फेरी गाठली.
  • तर जगज्जेत्या बुसेनाझने आसामच्या 23 वर्षीय लवलिनाचा उपांत्य लढतीत 5-0 असा फडशा पाडला.
  • परंतु बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही खेळाडूंना कांस्यपदक बहाल करण्यात येते. त्यामुळे लवलिनाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात दुसरे कांस्य आणि एकूण तिसऱ्या पदकाची नोंद केली.
  • बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी ती भारताची तिसरी खेळाडू ठरली.

अ‍ॅथलेटिक्स मध्ये पहिल्याच प्रयत्नात नीरज अंतिम फेरीत :

  • पदकाचा दावेदार मानला जाणारा नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकाराची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे.
  • तर बुधवारी पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर अंतरावर भाला फेकून पात्रता फेरीतील अव्वल स्थानासह त्याने हे यश मिळवले आहे.
  • भालाफेक प्रकारात 83.50 मीटर हे अंतिम फेरीच्या पात्रतेचे निकष ठरवण्यात आले होते.

अर्जेंटिनाची भारतावर मात :

  • भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. पण त्यांचा प्रवास अर्जेंटिनाने रोखला.
  • तर अटीतटीच्या झालेल्या लढतीत अर्जेंटिनाने भारताला 2-1 असे पराभूत करत फायनलमध्ये धडक दिली.
  • अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने दोन गोल करत संघाच्या विजयाचा पाया रचला.
  • तर भारताकडून ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने गोल केला.
  • भारताच्या 18 सदस्यीय महिला संघाने सोमवारी तीन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात रवीकुमारचा दहीयाचा अंतिम फेरीत प्रवेश :

  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये 57 किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
  • तर त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव त्याने केला आहे. त्यामुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे.
  • तसेच सुरुवातीला 5-9 अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनं तीन महत्त्वाचे गुण कमावले. त्यामुळे रवीकुमारचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश झाला आहे.
  • ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी मेडल जिंकणारा रवी कुमार दहीया पाचवा कुस्तीपटू ठरला आहे.
  • तर याआधी के. डी. जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या चार खेळाडूंनी भारतासाठी मेडल जिंकण्याची कमाल केली होती.

दिनविशेष :

  • 5 ऑगस्ट 1914 ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.
  • नेल्सन मंडेला यांना 5 ऑगस्ट 1962 मध्ये तुरुंगात टाकण्यात आले.
  • 5 ऑगस्ट 1962 मध्ये कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
  • चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा 5 ऑगस्ट 1930 मध्ये जन्म झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.