5 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

बैरूट शहरामध्ये मंगळावारी दोन मोठे स्फोट झाले:
बैरूट शहरामध्ये मंगळावारी दोन मोठे स्फोट झाले:

5 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2020)

बैरूट शहरामध्ये मंगळावारी दोन मोठे स्फोट झाले:

  • मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट शहरामध्ये मंगळावारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले.
  • या स्फोटांमध्ये 70 जण ठार झाले आहेत तर 4000 जण जखमी झाले आहेत.
  • बैरूटमध्ये अवघ्या 15 मिनिटांच्या आतच दोन महाभयंकर स्फोट झाले.हे स्फोट इतके भयंकर होते की स्फोट झालेल्या जागेपासून 15 मैल अंतरावरील सर्व घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं.
  • आधी मृतांचा आकडा 70 तर जखमींचा आकडा 2750 असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर हा आकडा वाढून 70 जणांचा मृत्यू झाला असून चार हजारहून अधिकजण जखमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2020)

एच 1 बी व्हिसा असलेल्यांना कंत्राटे दिली जाणार नाहीत- अध्यक्ष ट्रम्प:

  • एच 1 बी व्हिसा असलेल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना ट्रम्प प्रशासनाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे, त्यामुळे या व्यावसायिकांना अमेरिकी रोजगार बाजारपेठेत काम मिळणे कमी होईल.
  • अध्यक्ष ट्रम्प यांनी एक अध्यादेश जारी केला असून त्यातील तरतुदीनुसार परदेशी कामगारांना विशेष करून एच 1 बी व्हिसा असलेल्यांना यापुढे संघराज्याशी संबंधित कामांची कंत्राटे दिली जाणार नाहीत.
  • ट्रम्प यांनी सांगितले की, यापुढे संघराज्य सरकार अमेरिकी लोकांनाच कामे देईल. एच 1 बी व्हिसा असलेल्या लोकांना कंत्राटे मिळणार नाहीत. त्याबाबतच्या अध्यादेशावर मी स्वाक्षरी केली आहे.
  • एच 1 बी व्हिसा नियंत्रण कडक केले आहे. यापुढे अमेरिकी कामगारांच्या जागी परदेशी कामगार दिसता कामा नयेत.

करोनामुळे 1.6 अब्ज विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात:

  • करोनाची साथ व त्यानंतर लावण्यात आलेले निर्बंध यामुळे जगातील अनेक देश व खंडातील 1.6 अब्ज विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.
  • करोनाच्या आर्थिक फटक्यामुळे पुढील वर्षी 23.8 दशलक्ष विद्यार्थी शिक्षणच घेऊ शकणार नाहीत असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
  • संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी म्हटले आहे की, शिक्षण हा व्यक्तिगत विकासाचा पाया असून समाजाच्या भवितव्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.
  • जुलैच्या मध्यावधीत 160 देशात शाळा बंद असून त्याचा फटका 1 अब्ज मुलांना बसला आहे. 4 कोटी मुलांचे शिक्षण पूर्व प्राथमिक पातळीवरच थांबले आहे.

फुटबॉलपटू इकेर कॅसियासने अखेर खेळातून निवृत्ती जाहीर केली :

  • स्पेनला 2010 मध्ये विश्वचषक जिंकून देणारा फुटबॉलपटू आणि गोलरक्षक इकेर कॅसियासने अखेर खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे.
  • कॅसियास पोर्तुगालमधील पोटरे संघाशी 2015 मध्ये करारबद्ध झाला होता. मात्र गेल्या वर्षी मे महिन्यात त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तेव्हापासून तो स्पर्धात्मक फुटबॉल खेळलेला नाही.
  • 39 वर्षीय कॅसियासने रेयाल माद्रिदकडून पाच वेळा ला-लिगा विजेतेपद पटकावले असून तीन वेळा चॅँपियन्स लीग जिंकली आहे.
  • कॅसियासच्या नेतृत्वाखाली स्पेनने 2010 मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.

दिनविशेष :

  • 5 ऑगस्ट 1914 ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.
  • नेल्सन मंडेला यांना 5 ऑगस्ट 1962 मध्ये तुरुंगात टाकण्यात आले.
  • 5 ऑगस्ट 1962 मध्ये कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
  • चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा 5 ऑगस्ट 1930 मध्ये जन्म झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.