4 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

‘INS ध्रुव’ नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल
‘INS ध्रुव’ नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल

4 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 सप्टेंबर 2021)

‘INS ध्रुव’ नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल :

 • शत्रूपक्षाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा क्षणार्धात माग काढणारं जहाज आयएनएस ध्रुव (INS Dhruv)लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
 • आयएनएस ध्रुव हे शत्रूच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारं भारताचं पहिलं जहाज आहे. जे जहाज 10 सप्टेंबर रोजी लॉंच केलं जाईल.
 • हिंदुस्तान शिपयार्डने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) यांच्या सहकार्याने निर्मिती करण्यात आलेल्या आयएनएस ध्रुवमध्ये शत्रूच्या टेहळणी उपग्रह आणि अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्याची क्षमता आहे.
 • तर हे जहाज भारतीय नौदलाच्या जवानांसह स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) द्वारे नियंत्रित केले जाईल.
 • तसेच आतापर्यंत अशी जहाजं फक्त फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, रशिया आणि चीनद्वारे चालवली गेली आहे. आता या यादीत भारताचा देखील समावेश झाला आहे.
 • 10,000 टन वजनाचे हे जहाज भारतीय शहरे आणि लष्करी तळांजवळ येणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांबाबत लवकर चेतावणी देणारी यंत्रणा म्हणून काम करेल आणि ते त्या हल्ल्याचा प्रतिकार करेल.
 • तर त्यात या हल्ल्यांना अयशस्वी करण्याची क्षमता आहे. एवढंच नव्हे तर हे जहाज हिंदी महासागरातील भारताचं सागरी क्षेत्र अधिक सुरक्षित करेल आणि शत्रूंपासून सतर्क राहील.

जागतिक अब्जाधीशांच्या यादीत पुण्याच्या आनंद देशपांडेंचा समावेश :

 • पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे यांचा गुरुवारी जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आलाय.
 • तर देशपांडे यांच्या कंपनीमधील संपत्तीचा वाटा हा एक अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याचं ‘फोर्ब्स’ने म्हटलं आहे.
 • फोर्ब्सनुसार आज पर्सिस्टंटचे वार्षिक उत्पन्न हे 56.5 कोटी डॉलर इतकं आहे.
 • तसेच ही कंपनी डेटा मॅनेजमेंट, डिजिटसल इंजिनीअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करते.
 • केवळ आयटीच नाही सामाजिक बांधिलकी जपण्याचं कामही देशपांडे करत आहेत. त्यांनी सहा वर्षांपूर्वी ‘दे आसरा’ नावाच्या फाउंडेशनची स्थापना केली आहे.

टोक्यो पॅरालिम्पिक मध्ये तिरंदाज हरविंदर सिंगला कांस्यपदक :

 • टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाज हरविंदर सिंगने कोरियाच्या सूमिन किमचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.
 • तर त्याने हा सामना 6-5 ने जिंकला.
 • पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच तिरंदाजीमध्ये पदक पटकावले आहे.
 • तर सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 13 पदके जिंकली आहेत. भारताकडे आता 2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्यपदके आहेत.
 • तसेच रिओ पॅरालिम्पिक मध्ये भारताने 2 सुवर्णांसह 4 पदके जिंकली होती.

अवनी लेखरा एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ठरली पहिली भारतीय :

 • टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिनं इतिहास रचत वैयक्तिक दुसरं पदक पटकावलं आहे.
 • तर एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकत तिने इतिहास रचला आहे.
 • महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन एसएच1 स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवलं.
 • तसेच अंतिम फेरीत 445.9 गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली.

उंच उडीमध्ये प्रवीण कुमारला रौप्यपदक :

 • टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
 • पुरुष उंच उडी टी 64 प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केलीय.
 • ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये सुवर्णपदकासाठी अगदी अटीतटीची लढत पहायला मिळाली.
 • पहिल्या प्रयत्नात प्रवीणने 1.88 मीटरची उडी मारत पहिलं स्थान पटकावलं. नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 1.93 मीटरची उडी मारली.

विराटनं आशियातील पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान पटकावला :

 • विराटने इन्स्टाग्रामवर 150 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. या टप्प्यावर पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
 • तर 150 मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स मिळवणारा विराट कोहली क्रिकेट जगताचा पहिला क्रिकेटपटू आहे.
 • फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत क्रीडाविश्वात प्रथम येतो.
 • तसेच लिओनेल मेस्सी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
 • तर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारचे इंस्टाग्रामवर 160 मिलियन फॉलोअर्स आहेत. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीचा नंबर येतो.

दिनविशेष :

 • महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1221 मध्ये झाला.
 • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला.
 • थॉमस एडिसन यांनी 4 सप्टेंबर 1882 मध्ये इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले. तसेच वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
 • केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म 4 सप्टेंबर 1941 मध्ये झाला.
 • सन 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
 • रघुराम राजन यांनी सन 2013 मध्ये रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.