4 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

4 October 2019 Current Affairs In Marathi

4 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2019)

दिल्ली-कटरा एक्स्प्रेसमुळे काश्मीरच्या विकासाचा प्रवास सुरू :

 • अनुच्छेद 370 हा जम्मू व काश्मीरच्या विकासातील अडथळा होता आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाचा प्रवास सुरू होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
 • तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह व हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत शहा यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवी झेंडी दाखवला.
 • अनुच्छेद 370 रद्द करणे आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात या दोन गोष्टींमुळे नवा भारत नव्या जम्मू-काश्मीपर्यंत येईल आणि या भागासाठी नवा इतिहास घडवला जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.
 • तसेच येत्या दहा वर्षांमध्ये जम्मू व काश्मीर हा देशाच्या सर्वाधिक विकसित भागांपैकी एक राहील आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या सोबतीने विकासाचा प्रवासही सुरू झाला आहे. या गाडीमुळे विकासाला, तसेच धार्मिक पर्यटनाला चालना
  मिळेल असे शहा यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2019)

स्मिथला धोबीपछाड देत मयांक अग्रवाल ठरला सर्वोत्तम :

 • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे. मयांक अग्रवालचं द्विशतक आणि रोहित शर्माने झळकावलेलं शतक या जोरावर भारताने आपला पहिला डाव 502 धावांवर घोषित केला.
 • मयांक अग्रवालने 215 धावांची खेळी केली, त्याच्या या खेळीत 23 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान मयांकने ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथला मागे टाकलं आहे.
 • तर यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान आता मयांक अग्रवालला मिळाला आहे.
 • तसेच स्टिव्ह स्मिथने नुकत्याच पार पडलेल्या अ‍ॅशेस मालिकेत धावांचा रतीब घातला होता. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्टिव्ह स्मिथने 110.57 च्या सरासरीने 774 धावा केल्या होत्या. चौथ्या कसोटी सामन्यात स्मिथने 211 धावांची खेळी केली होती. मयांकने विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावलं.

हम्पी जगात तिसऱ्या स्थानी :

 • भारतीय स्टार महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने जागतिक संघटना फिडेच्या नव्या क्रमवारीमध्ये तिसरे स्थान मिळवले. आंध्र प्रदेशच्या या 32 वर्षीय खेळाडूने दोन वर्षांनंतर पुनरागमन करत अलीकडेच रशियात फिडे महिला ग्रांप्री जेतेपद पटकावले.
 • ग्रँडमास्टर हम्पीला यामुळे 17 इएलओ गुणांचा लाभ झाला. ती 2577 गुणांसह तिसऱ्या स्थानी दाखल झाली.
 • तर चीनची हाऊ यिफान 2659 गुणांसह अव्वल स्थानी असून चीनचीच ज्यू वेनजिन 2586 दुसºया स्थानावर आहे.
 • तसेच खुल्या गटात दिग्गज विश्वनाथन आनंद 2765 अंकांसह नवव्या स्थानी आहे.

तीन बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी 34 समित्या :

 • युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) यांचे विलीनीकरण सुलभतेने व्हावे यासाठी 34 कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
 • तर येत्या 1 एप्रिलपासून या या विलीनीकरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
 • तसेच या बँकांच्या एकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 34 कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक समितीत तिन्ही बँकांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. कर्ज प्रक्रिया, कर्ज मुदत आणि ग्राहकांना देण्यात येणा-या लाभांचे मानकीकरण करण्याचा प्रयत्नही समित्या करतील. बँकांचे विलीनीकरण पूर्ण होईपर्यंत ग्राहकांशी संबंधित कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी हे मानकीकरण केले जाणार आहे.

दिनविशेष:

 • 4 ऑक्टोबर हा दिवस राष्टीय एकता दिन तसेच जागतिक प्राणी दिन आहे.
 • सन 1824 मध्ये मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.
 • भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1884 मध्ये झाला.
 • 4 ऑक्टोबर 1904 हा दिवस ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चे रचनाकर ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड‘ यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.