4 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

जागतिक ब्रेल दिन
जागतिक ब्रेल दिन

4 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 जानेवारी 2023)

पंतप्रधानांची 27 जानेवारीला ‘परीक्षा पे चर्चा’:

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जानेवारी रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.
 • नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये पंतप्रधान संवाद साधणार आहेत.
 • 16 फेब्रुवारी 2018 रोजी याच स्टेडियममध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधानांच्या संवादात्मक कार्यक्रमाची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.

आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते महिन्याभरात भारतात:

 • या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते भारतात आणले जाण्याची शक्यता असल्याची माहिती मंगळवारी दिली.
 • हे 12 चित्ते मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात स्थलांतरित करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
 • हे चित्ते या जानेवारीतच येण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सूत्राने सांगितले.
 • कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) विसाव्या बैठकीत कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सात नर आणि पाच मादी असलेल्या या 12 चित्त्यांना सामावून घेण्यासाठी केलेल्या तयारीचे सादरीकरण केले.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या 72 व्या वाढदिवशी कुनो अभयारण्यात नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांची (पाच मादी व तीन नर) पहिली तुकडी सोडण्यात आली होती.

‘Break Journey Rule’नियमामुळे प्रवाशांना होणार फायदा:

 • भारतीय रेल्वे आता ‘Break Journey Rule’ घेऊन आली आहे.
 • ज्याद्वारे तुम्ही परत तिकीट न काढता तुमचा प्रवास पुन्हा सुरू करू शकतात.
 • जर एखाद्या प्रवाशाचे तिकीटाचे आरक्षण हे 500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी असेल, तर तो प्रवासी प्रवासादरम्यान एका स्टेशनवर उतरून दोन दिवसांसाठी आपला प्रवास थांबवू शकतो.
 • मात्र या सुविधेचा लाभ तेव्हा घेता येतो, जेव्हा प्रवासाच्या सुरुवातीपासून 500 किलोमीटरचे अंतर पूर्ण झालेले असेल.
 • याशिवाय आपले तिकीट हे एक हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरासाठीचे असेल, तर रेल्वे तुम्हाला संपूर्ण प्रवासात दोनदा आपला प्रवास थांबवण्याची सुविधा देते.
 • अशावेळी तुमच्याकडे दोनदा दोन दिवस थांबण्याचा पर्याय असतो.

गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी:

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) माजी अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी निवड झाली आहे.
 • गांगुलीने ऑक्टोबरमध्ये ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद सोडले होते.
 • आता तो दिल्ली कॅपिटल्ससह ‘आयएलटी ट्वेन्टी-20’मधील संघ दुबई कॅपिटल्स आणि दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-20 लीगमधील पट्रोरिया कॅपिटल्स संघाच्या क्रिकेटविषयक निर्णय आणि कामकाजावर लक्ष ठेवणार आहे.
 • गांगुलीने यापूर्वी 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रेरक म्हणून काम केले होते.

रणजी ट्रॉफीत जयदेव उनाडकटने रचला इतिहास:

 • जयदेव उनाडकटने मंगळवारी प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.
 • डावखुरा वेगवान गोलंदाज आणि सौराष्ट्राचा कर्णधार उनाडकटने हॅट्ट्रिकसह 8 बळी घेतले.
 • जयदेव उनाडकट डावाच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा रणजी ट्रॉफी इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला.
 • पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला.

दिनविशेष:

 • 4 जानेवारी हा दिवस ‘जागतिक ब्रेल दिन‘ आहे.
 • इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 4 जानेवारी 1643 मध्ये झाला होता.
 • आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये झाला होता.
 • लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँड तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचा जन्म 4 जानेवारी 1813 मध्ये झाला होता.
 • सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.
 • ब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासुन सन 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
 • सन 1954 मध्ये ‘मेहेरचंद महाजन‘ यांनी भारताचे 3रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.