4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs

लाइफलाइन एक्स्प्रेस
लाइफलाइन एक्स्प्रेस

4 January 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 जानेवारी 2021)

भारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’ :

 • भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे जी संपूर्ण जगात कुठल्याही देशानं अद्याप सुरू केलेली नाही. भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’ बनवली आहे.
 • भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असणाऱ्या या ट्रेनचं नाव ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ असं ठेवण्यात आलं आहे.
 • ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ सध्या आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे. या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि पाच ऑपरेटिंग टेबलसह इतर सर्व सुविधा आहेत.
 • तर विशेष म्हणजे, ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’मध्ये रुग्णांचा मोफत उपचार केला जाणार आहे.
 • कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने याआधीच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावलं उचललं आहेत. यात रेल्वे स्थानकांवर ऑटोमॅटीक तिकीट तपासणी यंत्र यासह अनेक सुविधांचा समावेश आहे.

कोरोना लसीसाठी Co-WIN अ‍ॅपवर करावे लागणार रजिस्टर :

 • भारतातील सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीची ड्राय रन सुरू झाली आहे.
 • दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड -19 लसीच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी, डेटा ठेवण्यासाठी आणि लोकांना या लसीसाठी नोंदणी करण्यासाठी कोविन (Co-WIN App) नावाचे अ‍ॅप तयार केले आहे.
 • देशातील नागरिक जे आरोग्य कर्मचारी नाहीत ते कोविन अ‍ॅपवर लससाठी स्वत: ची नोंदणी करु शकतात, ज्यासाठी त्यांना हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअर वरून डाउनलोड करावे लागेल.
 • तर यामुळे लसीकरण सुरू झाल्यानंतर ज्यांनी या अ‍ॅपवर आधीच नोंदणी केली आहे त्यांना लवकरात लवकर लस मिळेल.

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापराची संमती :

 • भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे.
 • सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे.
 • तसेच या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं डीसीजीआयने म्हटलं आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
 • त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे :

 • वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राने सांभाळावे, असा प्रस्ताव भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून देण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी महासंघाचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.
 • तर येत्या 9 जानेवारीला भारतीय कबड्डी महासंघाची ऑनलाइन कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे. या सभेला पाटील आणि कार्यकारिणी सदस्य सचिन भोसले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
 • तसेच या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेच्या यजमानपदाविषयी भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारणा केली जात आहे.
 • महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यास मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्हा संघटनांनी आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली आहे.

दिनविशेष:

 • 4 जानेवारी हा दिवस ‘जागतिक ब्रेल दिन‘ आहे.
 • इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 4 जानेवारी 1643 मध्ये झाला होता.
 • आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये झाला होता.
 • लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँड तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचा जन्म 4 जानेवारी 1813 मध्ये झाला होता.
 • सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.
 • ब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासुन सन 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
 • सन 1954 मध्ये ‘मेहेरचंद महाजन‘ यांनी भारताचे 3रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.