4 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

4 January 2019 Current Affairs In Marathi

4 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 जानेवारी 2019)

राज्यात महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार:

  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेमहात्मा जोतिराव फुले नसते तर महाराष्ट्र पुरोगामी झाला नसता, राज्यात समतेचे राज्य आले नसते, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगावला महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
  • नायगाव (ता. खंडाळा) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 188व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते.
  • मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे आयटीआयला परवानगी देण्याबाबत तांत्रिक अडचणी आहेत. मात्र, मुलींच्या उद्योग विकास प्रशिक्षणाची काय सोय करता येईल ते पाहू.
  • तसेच शिरवळ-नायगाव-मांढरदेव या रस्त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करू. तालुक्‍यातील नीरा-देवघर प्रकल्पाच्या गावडेवाडी, शेखमिरवाडी व वाघोशी येथील उपसा जलसिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध असतानाही कामे सुरू नाहीत. ही कामे त्वरित सुरू करून खंडाळा तालुक्‍यातील अधिकाधिक शेती सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न करू. या योजनांसाठी केवळ 19 टक्के इतकेच वीजबिल भरावे लागेल. उर्वरित 81 टक्के वीज बिलाचा बोजा शासन सोसेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
  • नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. त्यामुळे स्मारकाकडे जाणारे सर्वच रस्ते या सावित्रीच्या लेकींनी फुलून गेले होते.

चीनचे अंतराळात ऐतिहासिक कार्य:

  • चीनने अंतराळात आणखी एक मैलाचा दगड रोवला आहे. कारण, चीनने चंद्राच्या बाहेरच्या भागावर जो पृथ्वीवरुन दिसत नाही त्यावर इतिहासात पहिल्यांदाच अंतराळ यान उतरवले आहे. याचे नाव चांगे-4 असे असून 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 46 मिनिटांनी या यानाने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला. अमेरिकेच्या माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. यापूर्वी चीनने चंद्रावर एक रोवर यानही उतरवले होते. Chang Spacecraft
  • यापूर्वी अमेरिका आणि सोवियत रशियन संघाने चंद्रावर यान उतरवले होते. मात्र, चांगे-4 हे यान चंद्राच्या खालच्या भागावर उतरवण्यात आले आहे. जो भाग पृथ्वीपासून कायमच दूर अंतरावर असतो.
  • चीनच्या अंतराळ कार्यक्रमावर सूक्ष्मपणे काम करणाऱ्या मकाऊ युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर झू मेंघूआ यांनी सांगितले की, चीनचे हे अंतराळ अभियान हे दाखवते की, चीन अंतराळ संशोधनात खोलवर संशोधन करण्यामध्ये विश्वात वरच्या पातळीवर पोहोचला आहे. आम्ही चिनी लोकांनी असे काही करुन दाखवले आहे ज्याची हिम्मत अमेरिकन लोकांनीही केलेली नाही.
  • तज्ज्ञांच्या मते, चीन वेगाने आपला विकास करीत आहे. तो आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि इतर क्षेत्रात अमेरिकेलाही आव्हान देऊ शकतो.
  • चीन 2022 पर्यंत आपले तिसरे अंतराळ स्टेशन पूर्णपणे कार्यान्वित करण्याची योजना आखत आहे. दरम्यान, चीनने चंद्राच्या अशा पृष्ठभागावर यान उतरवले आहे जेथे अद्याप कोणीही पोहोचू शकलेले नाही. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते अंतराळ यानाचे हे लँडिंग एका प्रचाराशिवाय काहीही नाही.

महापालिकेव्दारा अनुदान थेट बॅंक खात्यात होणार:

  • महिला बचत गटांना सॅनिटरी पॅड बनवण्याचे मशीन विकत घेण्यासाठी महापालिका 95 टक्के अनुदान देणार आहे. विशेष बाब म्हणजे यंत्रखरेदीत होणारे घोटाळे टाळण्यासाठी महापालिका पहिल्यांदाच अनुदान थेट बचत गटांच्या बॅंक खात्यात जमा करणार आहे. या बचत गटांनी बनवलेले पॅड बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
  • महिला बचत गटांना सॅनिटरी पॅड बनवण्याचे मशीन; तसेच खाद्यपदार्थ बनवण्याचे व शिवणकामाचे संच देण्यात येणार आहेत. तसेच अपंगांना फोटो कॉपी मशीन देण्यात येणार आहे. वस्तूच्या एकूण किमतीच्या 95 टक्के अनुदान थेट बचत गटांच्या बॅंक खात्यांत जमा होईल.
  • शहरातील 350 अपंगांना फोटो कॉपी मशीन देण्यात येणार आहेत. सुरुवातीला ही मशीन 40 टक्के अपंगत्व असलेल्या महिलांनाच देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुरेसे महिला लाभार्थी मिळत नसल्याने पुरुषांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • तर या फोटो कॉपी मशीनसाठी देण्यात येणारे स्टेट बॅंकेचे प्री-पेड कार्ड एकदाच वापरता येणार आहे. त्यासाठी महापालिका 11 कोटी रुपये खर्च करणार आहे. महापालिकेने बाजारभावानुसार या यंत्राची किंमत ठरवली आहे.
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरवल्या जाणाऱ्या 27 वस्तू; तसेच महिला व बालकल्याण विभागामार्फत या वस्तूंच्या खरेदीवर नेहमीच भ्रष्टाचाराचा आरोप होतो. त्यासाठी महापालिकेने ही यंत्रे विकत घेऊन, ती बचत गटांना वितरित करण्याऐवजी पात्र बचत गट आणि अपंगांना थेट अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेला पुन्हा विलंब:

  • भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेला विलंब होत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोला 3 जानेवारीला चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करायचे होते. पण हे प्रक्षेपण सुद्धा पुढे ढकलावे लागले आहे. Chandrayaan 2
  • प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून प्रक्षेपणाला तिसऱ्यांदा विलंब झाला आहे. याआधी डिसेंबर 2016 त्यानंतर ऑक्टोंबर 2018 मध्ये प्रक्षेपण पुढे ढकलावे लागले. फेब्रुवारी महिन्यात चांद्रयान-2 चे प्रक्षेपण होऊ शकते असे इस्त्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पुढच्या महिन्याच्या मध्यावर हे प्रक्षेपण होऊ शकते पण तारीख अद्याप निश्चित केलेली नाही असे सूत्रांनी सांगितले.
  • तर या मोहिमेत कोणताही अडथळा नसून मोहिम योग्य मार्गावर आहे असे अधिकाऱ्याने सांगितले. लँडर आणि रोव्हरचा समावेश असलेली चांद्रयान-2 ही संपूर्णपणे स्वदेशी मोहिम आहे.

दिनविशेष:

  • 4 जानेवारी हा दिवस ‘जागतिक ब्रेल दिन‘ आहे.
  • इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 4 जानेवारी 1643 मध्ये झाला होता.
  • आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये झाला होता.
  • लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँड तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचा जन्म 4 जानेवारी 1813 मध्ये झाला होता.
  • सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.
  • ब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासुन सन 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
  • सन 1954 मध्ये ‘मेहेरचंद महाजन‘ यांनी भारताचे 3रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.