4 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

World Cancer Day
World Cancer Day

4 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 फेब्रुवरी 2020)

जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत विदीत दुसऱ्या स्थानी :

  • विश्वनाथन आनंद याच्यानंतर पेंटाल्या हरिकृष्ण याने भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू म्हणून गेली अनेक वर्षे मान पटकावला होता. पण नाशिकचा युवा ग्रँडमास्टर विदीत गुजराथी याने हरिकृष्णला मागे टाकत दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे.
  • तर अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार, विदीतने 2721 एलो रेटिंग गुणांसह भारतीयांमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
  • तसेच पाच वेळचा जगज्जेता आनंद 2755 गुणांसह अव्वल स्थानी आहे. हरिकृष्णला 2713 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • जागतिक क्रमवारीत जगज्जेता मॅग्नस कार्लसन अग्रस्थानी विराजमान आहे. तर आनंद 15व्या क्रमांकावर आहे.

30 कोटींहून अधिक ‘पॅन’ क्रमांक ‘आधार’शी संलग्न :

  • स्थायी खाते क्रमांक (पॅन) ‘आधार’शी संलग्न करण्याची तारीख वाढवण्यात आली असतानाच, सरकारने 30 कोटीहून अधिक ‘पॅन’ युनिक आयडेंटिफिकेशन कोडशी संलग्न केले आहेत, अशी माहिती अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत दिली.
  • 27 जानेवारी 2020 पर्यंत एकूण 30 कोटी 75 लाख 2 हजार 824 पॅन क्रमांक आधारशी जोडले गेले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
  • सरकारने आधार- पॅन जोडणीची मुदत वाढवली आहे काय, या प्रश्नाला ठाकूर यांनी होकारार्थी उत्तर दिले. पॅन- आधार संलग्न करण्याची अखेरची तारीख 31 डिसेंबर 2019 वरून 31 मार्च 2020 पर्यंत वाढवण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
  • तर 27 जानेवारी 2020 च्या आकडेवारीनुसार, एकूण 17,58,03,617 पॅन क्रमांक आधारला जोडण्यात आलेले नाहीत. त्यासाठीची मुदत वाढवण्यात आल्यामुळे, पॅन कार्डधारकांना जोडणीसाठी जादा वेळ मिळणार आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.

भारतीय लष्कराचं ‘चीता’ हेलिकॉप्टर कोसळलं :

  • जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात सोमवारी भारतीय लष्कराचं ‘चीता’ हे हेलिकॉप्टर कोसळलं.
  • जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माहोर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
  • तर उधमपूर येथून या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. ज्यानंतर ही दुर्घटना घडली. याप्रकरणी लष्कराकडून चौकशी केली जात आहे.
  • तसेच या अगोदर सप्टेंबर 2019 मध्ये पूर्व भूतान येथे देखील चीता हेलिकॉप्टर कोसळले होते. त्या वेळी घडलेल्या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर असणाऱ्या रजनीश परमार व वैमानिक कॅप्टन कालझँग वांगडी यांचा समावेश होता.

जगातील पाणथळांचा शोध घेत संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संरक्षण देणारी ‘रामसर’ :

  • पाणथळ जागांचे संवर्धन पृथ्वीसाठी गरजेचे असल्याने जागतिक स्तरावर 1974 सालापासून प्रयत्न सुरू झाले आहे.
  • इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनारपट्टीवर वसलेल्या रामसर या शहरात यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद 2 फेब्रुवारी 1971 साली घेण्यात आली.
  • तर या परिषदेत जगभरातील 170 पेक्षा अधिक देश सहभागी होत करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • जैवविविधतेने समृध्द असलेल्या पाणथळ जागांना ‘रामसर पाणथळ’ म्हणून समाविष्ट केले जाऊ लागले. या अशासकिय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचा यामागील उद्देश पाणथळांचे संरक्षण अन् संवर्धन असाच आहे.
  • भारतातील सुमारे दहा नव्या पाणथळांची भर 2019अखेर रामसरच्या यादीत पडली. यामध्ये नांदूरमधमेश्वरच्या रूपाने महाराष्ट्रला स्थान मिळाले.
  • तसेच रामसर या आंतरराराष्ट्रीय संस्थेचे सचिवालय स्वीत्झर्लंडच्या ग्लांडमध्ये आहे. पाणथळ जागांवरील जैवविविधता आणि त्याचे महत्त्व लक्षात घेता आंआंतरराराष्ट्रीय स्तरावर दखल घेत अशा महत्त्वाच्या पाणथळ जागांना एकप्रकारे संरक्षण देण्यासाठी रामसर ही आंतरराराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे.
  • 1971 साली झालेल्या झालेला करार पाणपक्ष व दलदली प्रदेश परिसंस्थेचे संवर्धन व धोरणात्मक आराखडे हे उद्दिष्ट दर्शवितो. हा करार 1975 सालापासून ‘रामसर’ संस्थेकडून अंमलात आणण्यास सुरूवात झाली. आतापर्यंत सदस्य देशांनी 208दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेले 2 हजार 186 दलदली प्रदेशांचा ‘रामसर क्षेत्र’ म्हणून यादीत समावेश केला आहे.
  • तसेच हे क्षेत्र फ्रान्स, जर्मनी, स्पेन, व स्वित्झर्लंड या चार देशांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षाही अधिक आहे. सर्वाधिक 171 रामसर क्षेत्रे युनायटेड किंग्डममध्ये तर मॅक्सिकोमध्ये 142 इतके आहेत.

युरोपीस संघातून ब्रिटनची अखेर एक्झिट :

  • युरोपीय संघाचे 47 वर्षे सदस्य राहिल्यानंतर ब्रिटन अखेर युरोपीय संघातून बाहेर पडला. युरोपीय संघातून बाहेर पडणारा युरोप हा पहिला देश आहे.
  • 23 जानेवारी 2013 रोजी तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी असे आश्वासन दिले होते की, जर त्यांचा पक्ष 2015 च्या निवडणुकीत विजयी झाला, तर युरोपीय संघात राहायचे की बाहेर पडायचे, यावर जनमत घेतले जाईल.
  • 7 मे 2015 रोजी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीने लेबर पार्टीवर विजय मिळविला आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत मिळविले.
  • 23 जून 2016 रोजी ब्रिटनने युरोपीय संघातून वेगळे होण्यासाठी ऐतिहासिक जनमत घेतले. 52 टक्के लोकांनी बेक्झिटचे समर्थन केले. त्यानंतर डेव्हिड कॅमेरून यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा.

दिनविशेष:

  • 4 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला होता.
  • सन 1944 मध्ये चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच केली होती.
  • श्रीलंका देशाला सन 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
  • सन 2004 मध्ये मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.