Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

4 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

4 August 2019 Current Affairs In Marathi

4 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2019)

देशातील 2 हजार रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध :

  • देशभरातील सुमारे 2 हजार रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सध्या मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • राजस्थानातील अजमेर विभागातील राणा प्रतापनगर रेल्वे स्थानक हे मोफत इंटरनेट सेवा असलेले देशातील दोन हजारावे स्थानक ठरले, असे रेलटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित चावला यांनी सांगितले.
  • तर आम्ही 74 रेल्वे स्थानक वायफाययुक्त केले आणि अजून काही स्थानकांवर मोफत वायफायची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे, असे चावला यांनी सांगितले.
  • तसेच रेल्वेचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या रेलटेल या कंपनीने डिजिटलयुक्त फलाट तयार करण्यासाठी स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याची सुरुवात केली होती.
  • पहिल्या टप्प्यात 1600 स्थानकांवर ही सोय पुरवण्यात आली. आता उर्वरित स्थानकांवर इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रेलटेलने टाटा ट्रस्टची मदत घेतली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2019)

आता भारतीय पोस्ट सुरू करणार ‘ही’ नवी सेवा :

  • देशात ऑनलाइन खरेदीला मिळणारी पसंती पाहता आता भारतीय पोस्टानेही ई ट्रेडिंग ट्रेडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना आता भारतीय पोस्टही टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
  • तर सरकारच्या या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांची संख्या ही फ्लिपकार्टवर असलेल्या विक्रेत्यांपेक्षाही दुप्पट आहे. दरम्यान, पोस्टाने विक्रेत्यांना आपल्याशी जोडण्याच्या कामाला सुरूवातही केली आहे.
  • तसेच भारतीय पोस्ट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणेच आपल्या ई कॉमर्स पोर्टलवरून एसी, फ्रिज, टिव्हीपासून मोठ्यात मोठे ते छोट्यात छोटे सामान विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. ई कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य ठेवले होते. 2016 मध्ये ई-मार्केटप्लेस (Government e-Marketplace) या नावाने ते लॉन्च करण्यात आले होते.
  • सध्या या पोर्टलसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पोर्टवरून खरेदी केलेली वस्तू देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवली जाणार असल्याची माहिती पोस्टातील एका अधिकाऱ्याने दिली. तसेच हे सामान पोस्टमॅनच संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहेत. सध्या अंबालामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अन्य ठिकाणीही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिनविशेष :

  • कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 मध्ये झाला.
  • पतंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1863 मध्ये झाला.
  • साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना.सी. फडके यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 मध्ये झाला.
  • सन 1956 मध्ये भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
  • मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सन 2001 मध्ये 4 ऑगस्ट रोजी स्थापन झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2019)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World