4 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

4 April 2019 Current Affairs In Marathi

4 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 एप्रिल 2019)

‘नासा’च्या आरोपाला अमेरिकी प्रशासनाचे महत्त्व नाही:

  • अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीमुळे (मिशन शक्ती) निर्माण झालेल्या अवकाश कचऱ्याने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकास धोका असल्याचा आरोप केल्यानंतर अमेरिकी प्रशासनाने मात्र नासाच्या टीकेला फारसे महत्त्व देण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.
  • भारत व अमेरिका हे दोन देश अवकाश क्षेत्रात सामायिक हितसंबंध जोपासत असून अवकाश सुरक्षेत त्यांचे सहकार्य आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.
  • परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी नासाच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे. भारताने उपग्रहभेदी चाचणी केल्यानंतर एकूण उपग्रहाचे 400 तुकडे अवकाशात फिरत असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकास धोका असल्याचे नासाने म्हटले होते.
  • पॅलाडिनो यांनी सांगितले की, अवकाश कचऱ्याचा प्रश्न अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे. अवकाश कचऱ्याचा मुद्दा लक्षात घेऊनच ही चाचणी करण्यात आली होती. या भारताच्या निवेदनाचा आम्ही सकारात्मक अर्थ घेतला आहे. भारत व अमेरिका यांच्यात तांत्रिक व वैज्ञानिक सहकार्य आहे त्यात अवकाश सुरक्षेच्या मुद्दय़ाचाही समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 एप्रिल 2019)

ब्रुनेईमध्ये नवीन शरिया कायदा:

  • समलिंगी संबंध आणि व्यभिचारासाठी ब्रुनेई येथे दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा नवीन शरिया कायद्यानुसार संमत केली आहे.
  • ब्रुनेईमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्य़ांसाठी शरिया कायद्यानुसार कडक शिक्षा जाहीर करण्यात आल्या असून जागतिक स्तरावरील राजकारणी, मानवी हक्क गट आणि प्रसिद्ध व्यक्तींनी या शिक्षांचा निषेध केला आहे. Brunei
  • ब्रुनेईवर सध्या सुल्तान हस्सानाल बोल्किआ यांची सत्ता आहे. राष्ट्रीय स्तरावर शरिया कायदा लागू करणारा मध्य पूर्व आशियामधील ब्रुनेई हा पहिलाच देश आहे.
  • चोरी करणाऱ्यांचे हात-पाय छाटण्याची आणि बलात्कार आणि दरोडय़ासाठीही देहांताची शिक्षा या कायद्यानुसार ठोठावण्यात येणार आहे. तर प्रेषित महंमद यांचा अपमान करणाऱ्या मुस्लीम अथवा बिगर मुस्लिमांना फाशीची शिक्षा ठोठावली जाईल.
  • तसेच या शिक्षा ‘क्रूर आणि अमानवी’ आहेत अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांनी निषेध केला आहे. प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि पॉप स्टार इल्टॉन जॉन यांनी ब्रुनेईच्या बालकीच्या हॉटेल्सवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
  • तर या देशात इस्लामची शिकवण दृढ झालेली पाहायची आहे, असे वक्तव्य सुलतान बोल्किआ यांनी देशातील लोकांसमोर केले.

नौदलाला मिळणार अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स:

  • जगातील सर्वात प्रगत, शक्तिशाली व बहुद्देशीय अशी 24 एमएच-60 ‘रोमियो’ सीहॉक हेलिकॉप्टर भारतास विकण्यास अमेरिका सरकारने मंजुरी दिली आहे. ही हेलिकॉप्टर भारतीय नौदलात दाखल झाल्यावर हिंदी महासागरातील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरतील, असे मानले जाते.
  • लॉकहीड मार्टिन कंपनीची ही हेलिकॉप्टर विकत घेण्याचा सौदा सुमारे 2.4 अब्ज डॉलरचा असेल. भारतीय सागरी हद्दीत वावरणाऱ्या पाणबुड्या शोधून त्यांचा अचूक वेध घेऊ शकणाऱ्या प्रबळ ‘हंटर’ हेलिकॉप्टरची भारतीय नौदलास गेल्या एक दशकाहून काळ भासणारी निकड या हेलिकॉप्टरने पूर्ण होईल.
  • सध्या नौदलाकडे यासाठी ब्रिटनकडून घेतलेल्या ‘सी किंग’ हेलिकॉप्टरचा ताफा आहे; परंतु ती जुनी झाल्याने त्यांची जागा आता ही नवी ‘सीहॉक’ हेलिकॉप्टर घेतील. या हेलिकॉप्टर विक्रीच्या सौद्यास मंजुरी देण्यात आल्याचे ट्रम्प प्रशासनाने काँग्रेसला अधिकृतपणे कळविले.
  • इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण आशिया क्षेत्रातील राजकीय स्थैर्य, शांतता व आर्थिक विकास सुनिश्चित करण्याच्या अमेरिकेच्या धोरणात महत्त्वाचा भागीदार असलेल्या भारताच्या सुरक्षेस या सौद्यामुळे बळकटी मिळेल, असे अमेरिकी सरकारने नमूद केले.
  • भारत या नव्या साधनाचा वापर स्वसंरक्षणासोबतच क्षेत्रीय धोक्यांना तोंड देण्यासाठी करेल, अशी ग्वाहीही ट्रम्प प्रशासनाने संसदेस दिली.

नागपूर केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षकपदी अरविंद पांडे:

  • लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नागपूर लोकसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून अरविंद भूषण पांडे यांची नियुक्ती केली आहे. पांडे यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकविषयक कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. arvind-pande
  • केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक अरविंद पांडे हे उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील 25 बटालियनचे कमांडंट असून, 2009 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.
  • नागपूर लोकसभा मतदार संघातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मतदारांची गाऱ्हाणे रविभवन येथे कॉटेज क्रमांक-1 येथे स्वीकारतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9022203935 आहे.
  • तसेच ते जनतेसाठी तसेच राजकीय पक्ष, उमेदवार अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी रविभवन येथे सकाळी 11 ते 1 व सायंकाळी 5 ते 6 या वेळेत उपलब्ध राहतील.

पुण्यात युवकांचे ‘मोदी 2.0’ अभियान:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विविध क्षेत्रांतील पाचशे युवकांनी एकत्र येत ‘मोदी 2.0’ हे अभियान सुरू केले आहे.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक, प्राध्यापक, शिक्षक, गृहिणींचाही या अभियानात सहभाग आहे. या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
  • केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विविध योजना समाजमाध्यमातून (फेसबुक, ट्वीटर, यु-टय़ूब) प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविणे, शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी जनजागृती अभियान राबविणे, नवमतदारांनी मतदान करावे यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम घेणे.
  • तसेच मॉल्स आणि चित्रपटगृहांमध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम करणे, ठिकठिकाणी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमांचे आयोजन करून ‘पुन्हा एकदा मोदी’ या प्रचार मोहिमेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिनविशेष:

  • सन 1882 मध्ये ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या.
  • ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचा जन्म 4 एप्रिल 1902 मध्ये झाला होता.
  • पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा 12 देशांनी 1949 मध्ये नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.
  • सन 1968 मध्ये जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांची हत्या केली.
  • लता मंगेशकर यांना 1990 यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 एप्रिल 2019)

You might also like
1 Comment
  1. Kalpana aher says

    Thanks

Leave A Reply

Your email address will not be published.