31 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

उपयोजनाची (अ‍ॅप) सक्ती येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने रद्द:
उपयोजनाची (अ‍ॅप) सक्ती येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने रद्द

31 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (31 ऑक्टोबर 2020)

उपयोजनाची (अ‍ॅप) सक्ती येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने रद्द:

 • करोना रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधण्याच्या उद्देशाने निर्माण केलेल्या आरोग्यसेतु उपयोजनाची (अ‍ॅप) सक्ती येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने रद्द केली आहे.
 • या विद्यापीठाचे विद्यार्थी व कर्मचारी यांना हे उपयोजन भ्रमणध्वनी संचावर वापरण्याची सक्ती करण्यात आली होती.
 • पण आता या उपयोजनाचा वापर अनिवार्य नसून ऐच्छिक असल्याचे विद्यापीठाच्या कुलसचिवांनी स्पष्ट केले आहे.
 • केंद्र सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयात असे स्पष्ट केले होते की, रेल्वे व हवाई प्रवासासाठी आरोग्यसेतु उपयोजनाची सक्ती करण्यात आलेली नाही.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 ऑक्टोबर 2020)

पश्चिम तुर्की आणि ग्रीस या देशांतील काही भाग शुक्रवार भूकंपाचे तीव्र झटक्यांची हादरले:

 • पश्चिम तुर्की आणि ग्रीस या देशांतील काही भाग आज (शुक्रवार) भूकंपाचे तीव्र झटक्यांची हादरले.
 • या भूकंपाची तीव्रता 7 रिश्टर स्केल असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने सांगितलं आहे.
 • आत्तापर्यंत या भूंकपात चार जणांचा मृत्यू झाला असून 120 लोक जखमी झाले आहेत.
 • या भूकंपाची तीव्रता 6.9 रिश्टर स्केल इतकी होती. याचं केंद्र समोसच्या ग्रीक बेटांपासून 13 किमी ईशान्येला होता.
 • तर तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थान विभागाच्या अध्यक्षांनी सांगितलं की, भूकंपाची तीव्रता 6.6 नोंदवली गेली आहे. याचं केंद्र 16.5 किमी खोलवर होतं.

अमित पंघालसह भारताचे तीन खेळाडू अंतिम फेरीत:

 • नँटिस (फ्रान्स) येथे सुरू असलेल्या अ‍ॅलेक्सि व्हॅस्टिने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या अमित पंघाल (52 किलो), कविंदर सिंग बिश्त (57 किलो) आणि संजीत (91 किलो) यांनी दिमाखदार विजयांसह अंतिम फेरी गाठली आहे.
 • चार वेळा आशियाई पदक विजेत्या शिवा थापाला (63 किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
 • आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या कविंदरने फ्रान्सच्या बेनिस जॉर्ज मेल्कुमियानचा 3-0 असा पाडाव केला.
 • इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संजीतने अमेरिकेच्या शेरॉड फुल्गमचा 2-1 असा पराभव केला.

दिनविशेष:

 • 31 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक बचत दिन‘ तसेच ‘राष्ट्रीय एकता दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 मध्ये झाला.
 • सन 1920 मध्ये नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
 • दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना 31 ऑक्टोबर 1966 रोजी झाली.
 • भारताचे 6वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सन 1984 मध्ये सूत्रे हाती घेतली होती.
 • सन 2011 मध्ये जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.