31 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
31 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 ऑक्टोबर 2018)
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा आज लोकार्पण सोहळा:
- भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे आज (31 ऑक्टोबर) लोकार्पण होणार आहे.
- जगातील सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 143 वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. सरदार पटेल यांचे हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे.या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी बांधण्यात आलेल्या 182 मीटर उंच असलेल्या पुतळ्याचे लोकार्पण केले जाईल.
- भाजपाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून मागील काही महिन्यांपासून हा पुतळा चांगलाच चर्चेत आहे. या पुतळ्याचे एक मराठी कनेक्शनही आहे. शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. देशाच्या जडणघडणीतले सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान फार मोठे आहे.
- तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचमुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुषही म्हटलं जातं लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण याच मुद्द्यांवर केंद्रीत असेल ते काय बोलणार याची उत्सुकता आहे.
- सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. देशाला पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे. त्यांच्या या महान कार्याचा गौरव म्हणूनच स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
छत्तीसगडच्या कुलाधिपतीपदी अशोक मोडक यांची नियुक्ती:
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय विश्वविद्यालय छत्तीसगडच्या कुलाधिपतीपदी डॉ. अशोक मोडक यांची नियुक्ती केली आहे.
- शिक्षण क्षेत्रातील ज्ञान आणि संशोधनासाठी डॉ. मोडक हे परिचित आहेत. ते मूळचे डोंबिवलीकर आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे डोंबिवलीतील व्यक्तीला कुलाधिपतीचा मान मिळाल्याने मानाचा तुरा डोंबिवलीच्या शिरपेचात खोवला गेला आहे.
- डॉ. मोडक यांनी 1963 पासून प्राध्यापक म्हणून काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. टिळकनगर शिक्षण प्रसारक संस्थेचे ते माजी अध्यक्ष आहेत.
- सन 1994 ते 2006 पर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघाचे ते आमदार होते. या कारकिर्दीत त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार राज्य सरकारने दिला होता.
- प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका सरकार दरबारी व विधिमंडळात मांडली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा होणार आहे.
एसटी बस हंगामी प्रवास भाड्यात 10 टक्क्यांनी वाढ:
- दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) कडून राज्याच्या विविध भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वाढविण्यात आलेले दहा टक्के प्रवास भाड्याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यानुसार पुणे विभागाने प्रवास भाडे निश्चित केले आहे.
- दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एस.टी ची सरसकट 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ दि. 1 ते 20 नोव्हेंबर अशी 20 दिवसांसाठी लागू असेल. मागील वर्षी याचकाळात सेवाप्रकार निहाय 20, 15 व 10 टक्के अशी भाडेवाढ केली होती. ही भाडेवाढ भाडेवाढ दि. 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून लागू होईल.
- पुण्यातील शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकातून विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी जादा बस सोडल्या जाणार आहेत. या बसचे दहा टक्क्यांनुसार जादा बस भाडे निश्चित करण्यात आले आहेत. एसटीकडून वातानुकुलित व्होल्वो, वातानुकुलित शिवशाही, निम आराम, साधी व रातराणी अशा बस सोडल्या जातील.
मालदीवच्या माजी अध्यक्षांचा तुरुंगवास रद्द:
- मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांना यापूर्वी जाहीर केलेली 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा प्रकरणाची फेरतपासणी होईपर्यंत रद्द केली. प्रोसिक्युटर जनरल यांनी केलेल्या मागणीनुसार न्यायालयाने हा निर्णय दिला.
- नशीद हे मालदीवचे अध्यक्ष असताना त्यांनी 2012 साली तत्कालीन न्यायाधीशांना ताब्यात घेण्यासाठी लष्कराचा वापर केला होता. त्या प्रकरणी नशीद यांची सत्ता गेल्यावर त्यांच्यावर खटला चालवून 13 वर्षांची शिक्षा देण्यात आली. मात्र नशीद गेल्या दोन वर्षांपासून राजकीय आश्रय घेऊन परदेशात गेले आहेत.
- सुरुवातीला त्यांनी वैद्यकीय उपचारांसाठी ब्रिटनमध्ये तर नंतर श्रीलंकेमध्ये राजकीय आश्रय घेतला. सध्या ते मालदीवमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी 1 नोव्हेंबरला मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
- तसेच या निकालाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून निषेध करण्यात आला होता.
लोपेतेगुई यांची रेयाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावरून गच्छंती:
- रेयाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावरून ज्युलेन लोपेतेगुई यांची गच्छंती करण्यात आली आहे.
- अवघ्या 139 दिवसांत त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. त्यांच्या जागेवर ब-संघाचे प्रशिक्षक सँतियागो सोलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- नुकत्याच झालेल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी बार्सिलोनाकडून 5-1 असा पराभव पत्करावा लागल्यानंतरच त्यांच्यावर हे संकट कोसळले आहे, या चर्चेला बहर आला होता.
- दरम्यान, लोपेतेगुई हे रेयाल व्हॅलाडॉलिड संघाशी होणाऱ्या सामन्यापर्यंत संघाच्या प्रशिक्षकपदी राहणार आहेत.
दिनविशेष:
- 31 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक बचत दिन‘ तसेच ‘राष्ट्रीय एकता दिन‘ म्हणून पाळला जातो.
- भारतरत्न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 मध्ये झाला.
- सन 1920 मध्ये नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
- दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना 31 ऑक्टोबर 1966 रोजी झाली.
- भारताचे 6वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सन 1984 मध्ये सूत्रे हाती घेतली होती.
- सन 2011 मध्ये जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा