31 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
31 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 मे 2020)
नासाच्या करोना व्हेंटिलेटर्सचा परवाना पुण्याच्या भारत फोर्जला :
- नासाने करोना उपचारांसाठी तयार केलेले व्हेंटिलेटर्स बनवण्याचा परवाना पुणे,हैदराबाद व बंगळुरू येथील कंपन्यांना देण्यात आला आहे.
- तर भारतातील ज्या कंपन्यांना हा परवाना मिळाला त्यात पुण्याची भारत फोर्ज लि., बेंगळुरूची अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. व हैदराबादची मेधा सव्हरे ड्राइव्हज प्रा.लि यांचा समावेश आहे.
- तसेच भारतीय कंपन्यांशिवाय इतर अठरा कंपन्यांना हे परवाने देण्यात आले असून त्यात आठ अमेरिकी व तीन ब्राझिलियन कंपन्यांचा समावेश आहे.
- दी नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ही स्वतंत्र संस्था असून ती अवकाश संशोधनाला वाहिलेली आहे.
- तर अमेरिकेतील रुग्णांसाठी दक्षिण कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत नासाने एक व्हेंटिलेटर तयार केला होता. तेथील अभियंत्यांनी तयार केलेल्या या व्हेंटिलेटरला ‘व्हायटल’ असे म्हटले आहे.
- तर एक महिन्यात तो तयार करण्यात आला व त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने 30 एप्रिल रोजी परवानगी दिली होती. व्हायटल म्हणजे ‘व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी अॅक्सेसिबल लोकली’नावाचे उपकरण असून त्याचे सुटे भाग पुरवठा साखळ्यात उपलब्ध आहेत.
- गंभीर रुग्णांवर उपचारासाठी हा व्हेंटिलेटर वापरला जातो. त्याची रचना लवचीक असून त्यात सुधारणाही करता येतात.
Must Read (नक्की वाचा):
BCCI कडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस :
- भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे.
- तर प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं पाठवत असते.
- 2019 विश्वचषकात 5 शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
- तसेच याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं बीसीसीआयने सुचवली आहे.
ला-लीगा फुटबॉल 11 जूनपासून :
- स्पॅनिश फुटबॉल लीग म्हणजेच ला-लीगा तीन महिन्यांच्या कालावधीनंतर 11 जूनपासून सुरू होत आहे. 2020-21 मोसमाला 12 सप्टेंबरपासून सुरुवात होईल, असे स्पॅनिश क्रीडा परिषदेने स्पष्ट केले.
- तर स्पेनमधील दोन स्पर्धाच्या उर्वरित 11 फेऱ्यांना सुरुवात करण्यावर स्पॅनिश फुटबॉल महासंघ आणि ला-लीगाचे एकमत झाले आहे. यंदाचा मोसम 19 जुलैला समाप्त होईल.
- तसेच बेटिस विरुद्ध सेव्हिला यांच्यात होणाऱ्या सामन्याने करोनानंतरच्या मोसमाला 11 जूनपासून सुरुवात होईल.
नासाचे स्पेस एक्स लाँच :
- अमेरिकी अंतराळ संस्था नासाने 9 वर्षांनंतर इतिहास रचला आहे.
- तर फ्लोरिडाच्या केप कनवरल येथील जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून नासाने स्पेसएक्स डेमो-2 मिशन लाँच केले आहे. अमेरिकेने 9 वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत.
- तसेच चंद्रावर उतरण्याचे पहिले उड्डाण याच केंद्रावरून करण्यात आले होते.
- नासाचे संचालक जीम ब्राईडेन्स्टीन यांनी सांगितले की, अमेरिकेने 9 वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत.
- नासाने यावेळी स्पेसएक्स फाल्कन 9 हे रॉकेट पाठविले आहे. यामध्ये रॉबर्ट बेंहकेन आणि डग्लस हुर्ले हे दोन अंतरालवीर आहेत.
- तर हे यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर यशस्वीरित्या गेले असून कॅप्सूल यशस्वीरित्या उघडल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले.
विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू :
- फोर्ब्सच्या 2020 च्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एकमेव श्रीमंत भारतीय ठरला.
- तर विराटची एकूण कमाई 2.6 कोटी डॉलर इतकी आहे.
- तसेच कोहली 100 खेळाडूंच्या यादीत 66 व्या स्थानावर आहे. मागच्यावर्षी तो 100 व्या तसेच 2018 ला 83 व्या स्थानावर होता.
- कोहलीने 2.4 कोटी डॉलर जाहिराती आणि ब्रॅन्ड या माध्यमातून तर 20 लाख डॉलरची कमाई वेतन आणि पुरस्कारातून केली आहे.
- फोर्ब्सने शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (105 मिलियन डॉलर) , लियोनेल मेस्सी (104 मिलियन डॉलर), नेमार (95.5 मिलियन डॉलर)आणि अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स(88.2 मिलियन डॉलर) हे अव्वल पाच स्थानावर आहेत.
- तर फोर्ब्स 1990 पासून श्रीमंतांची यादी जाहीर करीत आहे.
दिनविशेष :
- 31 मे – जागतिक तंबाखूविरोधी दिन
- 31 मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून पाळला जातो.
- सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टिन यांचा जन्म 31 मे 1683 मध्ये झाला.
- महाराणी ‘अहिल्याबाई होळकर’ यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला.
- 31 मे 1952 रोजी ‘संगीत नाटक अकादमी’ची स्थापना झाली.
- नेल्सन मंडेला यांना 31 मे 1990 रोजी लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर झाला.
- प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना 1991 चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून 31 मे 1992 मध्ये जाहीर झाला.