31 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs
31 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 मार्च 2022)
‘बिमस्टेक’चे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी भारताकडून एक दशलक्ष डॉलर :
- बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (बिमस्टेक) गटाच्या पाचव्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गटाचे आर्थिक सामथ्र्य वाढवण्यासाठी एक दशलक्ष डॉलर देण्याचा संकल्प जाहीर केला.
- तर या गटातील देशांनी मुक्त व्यापार करार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
- भारतासह बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या गटाचे सदस्य देश आहेत.
- तसेच श्रीलंका सध्या या ग्रुपचे अध्यक्षपद भूषवत आहे.
Must Read (नक्की वाचा):
महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ :
- केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात बुधवारी तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली़.
- तर यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्के झाला असून, तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने जुलै 2021 पासून भत्तावाढ लागू होणार असून, चालू मार्च महिन्याच्या वेतनात थकबाकीसह ही वाढ देण्यात येईल.
- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला़.
- केंद्राच्या या निर्णयाचा सुमारे 47.68 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 6862 लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ होणार असून, सरकारी तिजोरीवर 9 हजार 544.50 कोटींचा भार पडणार आहे.
पाकिस्तानच्या बाबर आझमने रचला ‘हा’नवा विक्रम :
- भारतात एकीकडे आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा थरार रंगला असून तिकडे पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे.
- तर या मालिकेदरम्यान पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने मोठी कामगिरी करुन दाखवली आहे.
- त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 4000 धावा केल्या असून भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.
- पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात चार हजार धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे.
- तसेच आझमने एकूण 82 डावांमध्ये हा विक्रम रचला आहे.
- तर याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हसीम आमलाने 81 डावांमध्ये 4000 धावा केलेल्या असून तो या विक्रमामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
- बाबर आझमने 4000 धावा करण्याच्या विक्रमामध्ये विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे.
- सर्वात जलद गतीने आणि कमी डावात 4000 धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली हा आशियातील पहिला खेळाडू होता.
- तर त्याने 93 डावांत हा विक्रम आपल्या नावावर केलेला होता.
मनिका-अर्चनाला कांस्य :
- दोहा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत बुधवारी मनिका बत्रा आणि अर्चना कामत जोडीला महिला दुहेरीच्या कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- उपांत्य सामन्यात लि यू-झून आणि चेंग आय-चिंग जोडीकडून त्यांनी 8-11, 6-11, 7-11 असा पराभव पत्करला.
- जी. साथियान आणि मनिका यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने गमावले.
- साथियानने स्वीडनच्या क्रिस्टियन कार्लसनकडून हार पत्करली, तर जर्मनीच्या यिंग हॅनने मनिकाला नमवले.
माजी क्रिकेटपटू राहुल मंकड यांचे निधन :
- मुंबईचे माजी फलंदाज राहुल मंकड यांचे बुधवारी बुधवारी निधन झाले.
- सलामीवीर राहुल यांनी 1972-73ते 1984-85 या कालावधीतील 47 सामन्यांत 35.77 च्या सरासरीने एकूण 2111 धावा केल्या.
- तर यात पाच शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश होता.
- रणजी विजेत्या मुंबईच्या संघात ते चार वेळा सदस्य होते.
- याशिवाय 1978-79च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यातही त्यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.
दिनविशेष :
- सन 1504 मध्ये 31 मार्च रोजी शिखांचे दुसरे गुरू ‘गुरू अंगद देव’ यांचा जन्म झाला.
- भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म सन 1865 मध्ये 31 मार्च रोजी झाला.
- डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
- 31 मार्च 1889 आरोजी आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला 2 वर्षे, 2 महिने व 2 दिवस लागले.
- भारतीय विद्वान ग्यानी ‘चेत सिंग’ यांचा जन्म सन 1902 मध्ये 31 मार्च रोजी झाला.