31 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही:
भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही:

31 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (31 जुलै 2020)

भारतातले 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनातून बरे झाले:

  • भारतातलं करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे आता 64.4 टक्के इतकं झालं आहे.
  • एप्रिल महिन्यात रिकव्हरी रेट 7.85 टक्के इतका होता अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. आत्तापर्यंत देशात 1कोटी 81 लाख, 90 हजार करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
  • यामध्ये RT-PCR आणि रॅपिड टेस्ट्सचाही समावेश आहे असंही त्यांनी सांगितलं.
  • भारतातले 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनातून बरे झाले आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जुलै 2020)

10 ऑगस्टपर्यंत करोनाची लस उपलब्ध होणार:

  • जगभरात करोनाचा कहर सुरु असताना रशियातून एक चांगली बातमी समोर आली आहे. 10 ऑगस्टपर्यंत करोनावरच्या पहिल्या लसीला मंजुरी देऊ शकतो असा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
  • पुढील दोन आठवड्यांमध्ये रशिया करोना व्हायरसवरची लस बाजारात आणू शकतं.
  • रशियन अधिकारी आणि वैज्ञानिकांनी CNN शी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. मॉस्कोतल्या गामालेया इन्सिट्युटमध्ये ही लस तयार करण्यात आली आहे.
  • गामालेया इन्सिट्युटचा वैज्ञानिकांचा दावा आहे की, सामान्य लोकांच्या वापरासाठी या लसीला 10 ऑगस्टपर्यंत मंजुरी देऊ शकतो. पण सर्वात आधी लस फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल असंही रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही:

  • भारतातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता, करोना व्हायरसची साथ रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटीवर अवलंबून राहता येणार नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले.
  • लस हाच करोना व्हायरसवर मात करण्याचा मार्ग आहे असे सरकारचे मत आहे.“हर्ड इम्युनिटी हे आजारापासून मिळणारे अप्रत्यक्ष संरक्षण आहे.
  • हर्ड इम्युनिटी लोकसंख्येला आजारापासून वाचवते पण लस तयार होईल तेव्हाच हर्ड इम्युनिटी तयार होईल किंवा नागरिकांना करोनाची लागण होऊन ते त्यातून बरे झाले, तर हर्ड इम्युनिटी तयार होते.
  • भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही. लस दिल्यानंतरच हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते” असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

संगकारा याने रोहितवर स्तुतीसुमनं उधळली होती:

  • भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सध्याच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे.
  • श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याने रोहितवर स्तुतीसुमनं उधळली होती. “रोहितला मैदानावर खेळताना बघायला मला खूप आवडतं.
  • तो एक उत्तर क्रिकेटपटू आहे. त्याच्या खेळाची शैली अप्रतिम आहे.

दिनविशेष :

  • सन 1658 मध्ये औरंगजेब मुघल सम्राट बनले.
  • हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांचा जन्म 31 जुलै 1880 मध्ये झाला.
  • रेंजर 7 अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्र 31 जुलै 1964 मध्ये काढले.
  • सतार वादक पं. रविशंकर यांना सन 1992 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.