31 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
31 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 जुलै 2018)
‘एसबीआय’कडून मुदत ठेवींवरील व्याजदरांत वाढ :
- देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) 30 जुलै रोजी काही विशिष्ट अवधींच्या मुदत ठेवींवरील (फिक्स डिपॉझिट) व्याजदारांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. त्यानुसार या व्याजदरांमध्ये 5 ते 10 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.05 टक्के ते 0.1 टक्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हे नवे व्याजदर 30 जुलैपासून लागू झाले आहेत.
- एसबीआयने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, 1 ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर सध्या 6.65 टक्के व्याज देण्यात येत आहे. त्यात वाढ करून ते 6.70 टक्के करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 2 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 6.65 टक्क्यांवरुन 6.75 टक्के वाढ करण्यात आली आहे.
- तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ते 2 वर्षांसाठीच्या मुदत ठेवीत 7.15 टक्क्यांऐवजी 7.20 टक्के तर 2 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.15 टक्क्यांऐवजी 7.25 टक्के व्याजदर लागू होणार आहेत. हे दर एक कोटींपर्यंतच्या मुदत ठेवींवर लागू असतील.
- तसेच कमी कालावधीसाठी केलेल्या मोठ्या मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये कपात करण्यात आली आहे. 1 ते 2 वर्षांसाठी 1 कोटींवरून 10 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर व्याजदर 7 टक्क्यांवरुन 6.70 टक्के करण्यात आले आहेत.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी यामध्ये व्याजदर 7.50 टक्क्यांवरुन 7.20 टक्के कमी करण्यात आले आहेत. तसेच 1 ते 2 वर्षांपर्यंत 10 कोटींपेक्षा अधिक मुदत ठेवींवर व्याजदर 7 टक्क्यांहून 6.70 टक्के कमी करण्यात आले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
आयसीसी वन-डे क्रमवारीत भारतीयांचे वर्चस्व कायम :
- भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. आयसीसीने नुकतीच आपली सुधारित जागतिक क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपले पहिले स्थान अद्यापही कायम राखले आहे. याव्यतिरीक्त उप-कर्णधार रोहित शर्मा चौथ्या तर सलामीवीर शिखर धवन दहाव्या स्थानावर आहे.
- भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मात्र आपले स्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेत केलेल्या संथ खेळामुळे धोनी क्रमवारीत 15व्या स्थानावर घसरला आहे.
- दुसरीकडे पाकिस्तानच्या फखार झमानचेही क्रमवारीतले स्थान सुधारले आहे. आपल्या आधीच्या क्रमवारीत तब्बल 8 अंकांनी सुधारणा करत फखार झमानने 713 गुणांसह 16वे स्थान पटकावले आहे.
- तसेच भारताचा सध्याचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळविले. तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 6वे तर त्याचा साथीदार युझवेंद्र चहलने 10वे स्थान पटकावले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनील देवधर :
- त्रिपुरातील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे मराठमोळे शिल्पकार सुनील देवधर यांना पक्षात राष्ट्रीय सरचिटणीसपदी बढती देण्यात आली असून अपेक्षेप्रमाणे आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी म्हणूनही देवधर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- आंध्रमध्ये पुढील वर्षी लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होत असून आंध्र जिंकण्याच्या इराद्यानेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देवधर यांच्यावर विश्वास टाकल्याचे बोलले जात आहे.
- आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून तेलुगू देसम पक्षाने आधी एनडीएशी नाते तोडले. त्यानंतर तेलुगू देसमने केंद्र सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणून मोदी सरकारविरोधातील आपला लढा अधिक तीव्र केला.
- एंकंदरच आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय खेळी भाजपला अडचणीत आणणाऱ्या ठरू लागल्या आहेत. त्यामुळेच ज्याप्रमाणे त्रिपुरात 25 वर्षांचे माणिक सरकार यांचे सरकार खाली खेचण्यात आले त्याचप्रमाणे आंध्रमध्येही चंद्राबाबूंना धक्का देण्याचा भाजपचा इरादा असून आगामी निवडणुका लक्षात घेऊन संघटनेत फेरबदल केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. नवी जबाबदारी देण्यात आल्यानंतर सुनील देवधर लवकरच आंध्रमध्ये सक्रिय होतील, असेही सांगण्यात आले.
दिनविशेष :
- सन 1658 मध्ये औरंगजेब मुघल सम्राट बनले.
- हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांचा जन्म 31 जुलै 1880 मध्ये झाला.
- रेंजर 7 अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्र 31 जुलै 1964 मध्ये काढले.
- सतार वादक पं. रविशंकर यांना सन 1992 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा