31 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
31 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 जानेवारी 2020)
राणी रामपालला ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अॅथलीट’चा पुरस्कार :
- भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिला या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अॅथलीट’चा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- तर हा पुरस्कार पटकावणारी राणी रामपाल ही पहिली हॉकी खेळाडू ठरली आहे.
- तसेच चाहत्यांकडून गेली 20 दिवस मते मागवण्यात आल्यानंतर वर्ल्ड गेम्सने गुरुवारी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.
- राणीने तब्बल 1 लाख, 99 हजार, 477 मते मिळवत या पुरस्काराच्या शर्यतीत अग्रस्थान पटकावले.
Must Read (नक्की वाचा):
तब्बल 9 लाख पीएफ खाती ब्लॉक :
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organisation- EPFO) जवळपास नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहेत.
- तर केद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेचा गैरवापर करणाऱ्या सुमारे 80 हजार कंपन्यांची यादी सरकारने केली आहे.
- तसेच या कंपन्यांनी फॉर्मल सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राच्या प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत बेकायदेशीर पद्धतीने तब्बल 300 कोटी रुपयांचा फायदा उचलला आहे.
- प्रधानमंत्री रोजगार योजनेचा अवैध लाभ जवळपास नऊ लाख जण घेत आहेत. पीएफ आणि प्रधानमंत्री रोजगार योजनेचा एकत्र लाभ घेणाऱ्या नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहे.
- बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या नऊ लाख लाभार्थांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. हे नऊ लाख जण या योजनेचा यापुढं लाभ घेऊ शकणार नाहीत. ही योजना लागू होण्याआधी 9 लाख जण फॉर्मल सेक्टरचा भाग होते, म्हणजेच ते आधीपासूनच पीएफचा लाभ घेत होते.
फुटबॉलपटू बाला देवी युरोपमधील क्लबशी करारबद्ध :
- गंगोम बाला देवी स्कॉटलंडमधील रेंजर्स एफसी या क्लबशी करारबद्ध झाली आहे. मणिपूरची आघाडीवीर बाला देवी ही परदेशी क्लबशी करारबद्ध झालेली पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे.
- तर रेंजर्स महिला संघाने 29 वर्षीय बाला देवी हिच्याशी 18 महिन्यांचा करार केला आहे.
- तसेच बाला देवीने भारतातर्फे सर्वाधिक गोल करण्याची किमया साधली आहे. तिच्या नावावर 58 सामन्यांत 52 गोल जमा आहेत.
- दक्षिण आशिया विभागातील ती सर्वाधिक गोल करणारी एकमेव खेळाडू आहे.
- वयाच्या 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या बाला देवीने भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्वही सांभाळले आहे.
- तर गेल्या दोन मोसमांपासून भारतीय महिला फुटबॉल लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा मान तिने पटकावला आहे.
- तिने 2015 आणि 2016 मध्ये अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे.
तामिळनाडूत पालींच्या दोन नव्या प्रजातींचे संशोधन :
- तामिळनाडूतील पर्वतरांगांमध्ये पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध संशोधकांनी लावला.
- संशोधकांचे पथक गेल्या अनेक महिन्यांपासून तामिळनाडूतील पर्वतरांगा पालथ्या घालत आहे. हेमीफायलोडॅक्टीलस (स्लेंडर गेको) या कुळातील पाली फक्त पश्चिम भारतात म्हणजेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशातील पूर्व घाटात आढळतात.
- तर या कुळातील पालींच्या चार प्रजातींची नोंद आजवर झाली आहे, पैकी तीन प्रजातींचा शोध याच पथकाने गेल्यावर्षी लावला होता.
- तसेच पूर्ण अभ्यास व संशोधनाअंती त्याचे निष्कर्ष व शोधप्रबंध ‘झुटाक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला. या संशोधनामुळे भारतातील या कुळातील पालींच्या प्रजातींची संख्या सहा झाली आहे.
सर्व विषयांसाठी एका पुस्तकाचा घेणार निर्णय :
- विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘सर्व विषयांसाठी एकच पुस्तक’ हा नवा पथदर्शी प्रकल्प बालभारतीतर्फे हाती घेण्यात आला आहे.
- मात्र, राज्यातील काही तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांकडून मिळणाºया प्रतिसादानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांसाठी केली जाईल.
- तर त्यातच विद्यार्थी, शिक्षक व पालकांना ही कल्पना कितपत भावते त्यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे, अशा प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
- तसेच त्यामुळेच पुस्तकांचे वेगवेगळे भाग करून ‘बालभारती’कडून पुस्तकांच्या छपाईचे काम सुरू केले आहे.
दिनविशेष:
- सन 1911 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात 31 जानेवारी 1920 रोजी झाली.
- सोविएत रशियाने सन 1929 मध्ये लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले होते.
- सन 1949 यावर्षी बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
- राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 31 जानेवारी सन 1950 रोजी संसदेपुढे पहिले भाषण केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा