31 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

बालस्वातंत्रदिन
बालस्वातंत्रदिन

31 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2022)

घटनापीठाच्या प्रक्रियेसंबंधीच्या पैलूंवर 6 सप्टेंबरला निर्णय :

  • आर्थिक मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) नोकरी आणि प्रवेशांसाठी दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या संवैधानिक वैधतेची तपासणी सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ करणार आहे.
  • मुस्लिमांना आरक्षण देण्यासंदर्भातील राज्याचा स्थानिक कायदा रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल याचिकांवर सुनावणी करण्याआधी सर्वोच्च न्यायालय ही पडताळणी करणार आहे.
  • सरन्यायाधीश उदय लळित, न्या. दिनेश महेश्वरी, न्या. रवींद्र भट्ट, न्या. बेला एम. त्रिवेदी व न्या. पारदीवाला या पाच जणांच्या घटनापीठाने स्पष्ट केले,की या संदर्भातील प्रक्रियागत पैलू व अन्य तपशिलांबाबत घटनापीठ 6 सप्टेंबर रोजी निर्णय घेईल व 13 सप्टेंबरला आरक्षणासंदर्भातील याचिकांवर सुनावणी करेल.
  • केंद्र सरकारने 103 व्या घटनादुरुस्तींतर्गत अधिनियम 2019 अंतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गासाठी (ईडब्ल्यूएस) दाखले, प्रवेश आणि नोकरीत आरक्षणाची तरतूद केली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2022)

गौतम अदानी जगातले तिसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत :

  • अब्जाधीश गौतम अदानी यांनी लुई व्हिटॉनचे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत टॉप 3 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
  • हा मान मिळवणारे अदानी हे आशिया खंडातील पहिले व्यावसायिक ठरले आहेत.
  • विशेष म्हणजे चीनचे जॅक मा आणि भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सुद्धा आजवर हे करणे शक्य झालेले नाही.
  • प्रतिष्ठित श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यापाठोपाठ अदानी यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.
  • अदानी यांच्या संपत्तीत +1. 12 अब्ज डॉलरची शेवटची वाढ दिसली होती.
  • जुलै 2022 मध्ये, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून अदानी 113 अब्ज डॉलर्ससह जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनले होते.

रोहित शर्मा हाँगकाँग विरुद्ध जिंकताच ‘हा’ महत्त्वाचा विक्रम रचणार :

  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करून जोरदार सुरुवात केली आहे.
  • आता 31 ऑगस्टला टीम इंडिया हाँगकाँगशी आमने सामने येणार आहे.
  • दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिय येथे भारत विरुद्ध हॉंगकॉंग सामना पार पडणार आहे.
  • हा सामना भारतीय संघाला महत्त्वाचा असणार आहे कारण या सामन्यात विजयी झाल्यास टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
  • रोहितने 18 चेंडूत केवळ 12 धावा केल्या पण तरीही T20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 3499 धावांसह रोहित दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
  • आशिया कप सामन्यातील कर्णधार म्हणून प्राप्त केलेले 6 विजय हे सर्वाधिक असून हा विक्रम एमएस धोनी आणि मोईन खान यांच्या नावे आहे.
  • जर हाँगकाँग विरुद्धचा सामना भारताने जिंकला तर सात विजयांसह रोहित शर्मा या यादीत प्रथम क्रमांकावर येईल.

दिनविशेष :

  • 31 ऑगस्ट हा दिवस बालस्वातंत्रदिन आहे.
  • मृत्युंजय कादंबरीचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक ‘शिवाजी सावंत‘ यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 मध्ये झाला.
  • सन 1947 मध्ये 31 ऑगस्ट रोजी भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
  • पांडुरंगशास्त्री आठवले यांना सन 1996 मध्ये मॅगसेसे पुरस्कार प्रदान झाले.
  • राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते सन 1970 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.