31 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतीय नौदलासाठी 6 पारंपरिक पाणबुडय़ा बांधण्याच्या 55 हजार कोटींची निविदा :
भारतीय नौदलासाठी 6 पारंपरिक पाणबुडय़ा बांधण्याच्या 55 हजार कोटींची निविदा

31 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2020)

भारतीय नौदलासाठी 6 पारंपरिक पाणबुडय़ा बांधण्याच्या 55 हजार कोटींची निविदा :

  • भारतीय नौदलासाठी 6 पारंपरिक पाणबुडय़ा बांधण्याच्या 55 हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पासाठी पुढील महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
  • अत्याधुनिक लष्करी साधनसामुग्री देशातच तयार करून त्यांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विदेशातील बडय़ा संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांसोबत भागीदारी करण्यास देशी कंपन्यांना परवानगी देणाऱ्या सामरिक भागीदारी प्रारूपांतर्गत या पाणबुडय़ांची निर्मिती केली जाणार आहे.
  • ‘पी-75’ असे नाव ठेवण्यात आलेल्या या महाप्रकल्पाकरिता, या पाणबुडय़ांच्या तपशिलासारखी प्राथमिक कामे आणि प्रस्तावाबाबतची विनंती जारी करण्यासाठीची औपचारिकता संरक्षण मंत्रालय आणि भारतीय नौदल यांच्या वेगवेगळ्या चमूंनी पूर्ण केली आहे.
  • मेक इन इंडिया’ उपक्रमांपैकी एक असलेल्या या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाने एल अँड टी समूह व माझगाव डॉक्स लि. या 2 भारतीय शिपयार्ड व 5 विदेशी संरक्षण साहित्य कंपन्या यांची नावे विचारात घेतली आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2020)

भारताने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला- ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड:

  • फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं रविवारी पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला.
  • या स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने या ऑनलाइन स्पर्धेत भारत आणि रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.
  • सुरुवातीला रशियाला विजेता घोषित करण्यात आलं कारण फायनलमध्ये भारताचे दोन खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत कनेक्शन होत नसल्याने वेळ गमावला.
  • भारताने या वादग्रस्त निर्णयाला विरोध दर्शवला त्यानंतर याची समिक्षा करण्यात आली आणि भारत-रशिया या दोन्ही देशांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.

सप्टेंबर महिना ‘पोषण महिना’ म्हणून साजरा होणार- पंतप्रधान मोदी:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, सकाळी 11 वाजता, ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधला.
  • नरेंद्र मोदी यांच्या मासिक कार्यक्रमाचा हा 68 वा भाग होता.
  • या भागात मोदी यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल.
  • पंतप्रधान मोदींनी आज, ‘भारतीय कृषी कोष’ तयार करण्यात येणार असल्याचंही सांगितलं.
  • यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणतं धान्य पिकतं? त्याची nutrition value किती? याची सर्व माहिती दिली जाणार आहे.

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला ऐतिहासिक सहविजेतेपद:

  • बुद्धिबळ विश्वात जगज्जेतेखालोखाल सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाड स्पध्रेत भारताने रविवारी रशियाच्या बरोबरीने ऐतिहासिक सहविजेतेपद पटकावले.
  • माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद, जलद प्रकारातील विद्यमान जगज्जेती कोनेरु हम्पी अशा प्रतिभावंतांच्या अनुभवाबरोबरच, दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहाल सरीन अशा युवा बुद्धिबळपटूंच्या असीम ऊर्जेला मिळालेली विदिथ गुजरातीच्या नेतृत्वाची साथ ही भारताच्या कामगिरीची निसंशय वैशिष्टय़े ठरली.
  • लोकसत्ता तरुण तेजांकित’ ठरलेल्या विदिथ गुजरातीने भारतीय संघाचे नेतृत्व समर्थपणे केले.
  • युवा बुद्धिबळपटूंचाही प्रत्येक संघात समावेश करण्यात आला. भारतात अनेक युवा बुद्धिबळपटू उदयाला येत असून या बदलाचा फायदा त्यामुळे भारताला झाला.

दिनविशेष :

  • 31 ऑगस्ट हा दिवस बालस्वातंत्रदिन आहे.
  • मृत्युंजय कादंबरीचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक ‘शिवाजी सावंत‘ यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 मध्ये झाला.
  • सन 1947 मध्ये 31 ऑगस्ट रोजी भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
  • पांडुरंगशास्त्री आठवले यांना सन 1996 मध्ये मॅगसेसे पुरस्कार प्रदान झाले.
  • राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते सन 1970 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.