30 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

30 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 सप्टेंबर 2021)

जपानचे माजी राजनीतिज्ञ किशिदा आता नवे पंतप्रधान :

 • जपानचे माजी परराष्ट्र मंत्री फुमिओ किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वपदाची निवडणूक बुधवारी जिंकली असून ते आता पुढील पंतप्रधान असणार आहेत.
 • किशिदा यांनी आधीचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांची जागा घेतली.
 • तर सुगा यांनी सप्टेंबरमध्ये कार्यभार घेतला होता त्याला वर्ष पूर्ण होत असतानाच पायउतार व्हावे लागत आहे.
 • लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक झाली असून त्यात त्यांची निवड झाल्याने संसदेत सोमवारी त्यांची पंतप्रधानपदी निवड होणार आहे, कारण संसदेत त्यांचा पक्ष व मित्र पक्षांचे प्राबल्य आहे.

उत्तर कोरियाकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी :

 • उत्तर कोरियाने नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण यशस्वी झाले आहे.
 • तर हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेचे असून उत्तर कोरिया त्याची लष्करी क्षमता वाढवत चालला आहे.
 • अमेरिका व दक्षिण कोरिया यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला आक्षेप घेऊनही क्षेपणास्त्र चाचण्या सुरूच आहेत.
 • तसेच उत्तर कोरियाने महिनाभरात तीन चाचण्या केल्या आहेत.
 • प्रक्षेपण स्थिरता व प्रवास क्षमता, हायपरसॉनिक ग्लायडिंग अस्त्र वेगळे होणे हे सर्व यशस्वीपणे करण्यात आले.

मध्यान्न भोजन योजनेच नाव बदललं :

 • देशभरातील शाळांमध्ये मुलांसाठी पोषक आहार पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मध्यान्न भोजन योजनेला पाच वर्ष अजून मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 • तर आता ही योजना ‘नॅशनल स्कीम फॉर पीएम पोषण’नावाने ओळखली जाईल.
 • त्यामुळे आता 2026 पर्यंत देशभरातील शाळांमधून लहान मुलांना पोषक मध्यान्न आहार मिळू शकणार आहे.
 • तसेच ही योजना राज्य सरकारांच्या सहभागातून राबवली जाणार आहे.
 • तसेच, 3 ते 5 वर्षांशी शाळापूर्व गटांमध्ये शिकणारी मुलं देखील या योदनेत अंतर्भूत करण्यात येणार असल्याचं देखील स्पष्ट करम्यात आलं आहे.

जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धात भारताचा फ्रान्सवर दिमाखदार विजय :

 • चौथ्या फेरीत रशियाकडून पत्करलेल्या 1-3 अशा पराभवातून सावरत भारताने ‘फिडे’ जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेच्या पाचव्या आणि अखेरच्या फेरीत फ्रान्सवर 3-1 असा दिमाखदार विजय मिळवला.
 • तर भारताची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानशी गाठ पडणार आहे.
 • क्ती कुलकर्णी आणि मेरी अ‍ॅन गोम्स यांच्या विजयांनी पाचव्या फेरीत महत्त्वाची भूमिका बजावली, तर द्रोणावल्ली हरिका आणि तानिया सचदेव यांनी आपापले सामने बरोबरीत सोडवले.

माणदेशातील संशोधकाच्या नेतृत्वाखाली लघुग्रहाचा शोध :

 • अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने (नासा) सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये माळवाडी येथील विद्यार्थी संशोधक विनायक दोलताडे यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी गटाने अवकाशातील एका लघुग्रहाचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.
 • दरम्यान या शोधावर नासाचे अंतिम शिक्कामोर्तब बाकी आहे.
 • नासा, पॅन स्टार्स, कॅटालीना स्काय सर्वे आणि टेक्सास येथील हर्डीन सिमन्स युनिव्हर्सिटी यांच्याकडून 1 ते 27 सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोधमोहीम घेण्यात आली होती.
 • तर या अंतर्गत गटामध्ये दोलताडे यांच्या नेतृत्वाखाली आनंद कांबळे, संकेत दळवी, वैभव सावंत, मनीष जाधव, गौरव डाहुले या विद्यार्थ्यांच्या गटाने संशोधन केले.
 • या गटाने एका लघुग्रहाचा शोध लावण्यात यश मिळविले असून त्याची नोंद नासाकडे करण्यात आली आहे.
 • तीन ते पाच वर्षे त्याच्या स्थितीचे व हालचालींचे निरीक्षण घेऊन नंतर याचा समावेश नासाच्या खगोलीय घटकांच्या यादीमध्ये करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

 • 30 सप्टेंबरआंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
 • ब्रिटनची पहिली ट्राम सेवा 30 सप्टेंबर 1860 मध्ये सुरु झाली.
 • थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर 30 सप्टेंबर 1882 मध्ये सुरु झाले.
 • 30 सप्टेंबर 1895 मध्ये फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
 • हुव्हर धरणाचे बांधकाम 30 सप्टेंबर 1935 मध्ये पूर्ण झाले.
 • पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात 30 सप्टेंबर 1947 मध्ये प्रवेश.
 • 30 सप्टेंबर 1966 मध्ये बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.