30 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

30 October 2018 Current Affairs In Marathi

30 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 ऑक्टोबर 2018)

हॉकी विश्वचषकासाठी कलिंगा स्टेडियम सज्ज:

 • हॉकीचा विश्वचषक भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर होणार आहे, त्या स्टेडियमच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यात आला असून स्पर्धेला महिना बाकी असतानाच संपूर्ण स्टेडियम सज्ज करण्यात आले आहे. भुवनेश्वर शहरासह संपूर्ण ओडिशातही हॉकी विश्वचषकाचे वातावरण तयार झाले आहे.
 • भुवनेश्वरमध्ये 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या हॉकीच्या विश्वचषकासाठी जणू संपूर्ण नगरच सजू लागले आहे. काही मोठय़ा मॉल्स, हॉटेल्सवर हॉकी विश्वचषकाच्या चिन्हासह खेळाडूंची मोठमोठी चित्रेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
 • जगभरातून येणाऱ्या हॉकीप्रेमी नागरिकांसाठी शासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सज्ज करण्यात आलेल्या स्टेडियमची क्षमता 15 हजार प्रेक्षकांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रेक्षकांना सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. त्याशिवाय भुवनेश्वरमधील सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन घडवून अधिकाधिक पर्यटकांनादेखील आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
 • भुवनेश्वरमध्ये काही सहाव्या शतकातील मंदिरेदेखील असून ती पाहण्याकडेदेखील जगभरातील पर्यटकांचा ओढा असेल, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
 • तसेच सायकलद्वारे अन्य काही धार्मिक, आध्यात्मिक स्थळे, प्राचीन मठांचे दर्शन घेता येईल, अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 ऑक्टोबर 2018)

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन:

 • ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक शवंत देव यांचे 29 ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या देव यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते. आपल्या लेखनकौशल्य आणि संगीत दिग्दर्शनाने अनेक वर्ष त्यांनी संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविले.
 • मराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘येशिल येशिल येशिल राणी’, अशा अनेक संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना सुरेल मराठी गीतांची अनुभूती यशवंत देव यांनी दिली.
 • लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली. तसेच, ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली.
 • तसेच यशवंत देव यांची मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत गीतकार-संगीतकार म्हणून ओळख राहिली. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 साली झाला होता.

भारताच्या टेनिस दुहेरीत दिविज अव्वल स्थानी:

 • नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा दिविज शरण 38व्या स्थानासह भारतातील अव्वल क्रमांकाचा दुहेरीचा टेनिसपटू ठरला आहे.
 • रोहन बोपन्नाची नऊ स्थानांनी घसरण झाल्याने तो 39व्या स्थानी पोहोचला आहे. तर लिएंडर पेस 60व्या स्थानी असल्याने दिविजला भारतीय टेनिसपटूंमध्ये अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी मिळाली.
 • तर भारताचा दुहेरीतील आणखी एक टेनिसपटू जीवन नेदुचेझियानला 72वे स्थान मिळाले असून ते त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च आहे.

खालिदा झिया यांना सात वर्षांचा तुरुंगवास:

 • बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया (वय 73) यांना भ्रष्टाचाराच्या दुसऱ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
 • दिवंगत पती झिआयुर रहमान यांच्या नावाने सुरू केलेल्या अनाथालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दोषारोप त्यांच्यावर आहे. यातील पहिल्या प्रकरणात न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे.
 • आजची शिक्षा ही झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. यानुसार झिया व अन्य तिघांनी अधिकाराचा गैरवापर करीत ट्रस्टसाठी बेनामी स्रोतांकडून तीन लाख 75 हजार अमेरिकी डॉलर जमा केल्याचा आरोप आहे.
 • खालिदा झिया या आजारी असल्याचे कारण देत न्यायालयात गैरहजर राहिल्या. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. न्यायाधीश मोहम्मद अख्तरुझमान यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवीत त्यांना सात वर्षांची शिक्षा दिली.
 • तसेच त्यांच्या अनुपस्थितीत सुनावणी होऊ नये, ही झिया यांची याचिका फेटाळून लावली. झिया यांचे माजी राजकीय कामकाज सचिव हॅरिस चौधरी, त्यांचे माजी सहकारी झिआउल इस्लाम मुन्ना व ढाक्‍याचे माजी महापौर सादिक होसैन खोका यांनाही न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

दिनविशेष:

 • 30 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन‘ आहे.
 • भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 मध्ये झाला.
 • सन 1920 मध्ये सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना करण्यात आली.
 • सन 1945 मध्ये भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
 • शिवाजी पार्कवर सन 1966 मध्ये शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 ऑक्टोबर 2018)

You might also like
1 Comment
 1. DATTATRAY PATIL says

  VERY HEIPFUL

Leave A Reply

Your email address will not be published.