30 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

कोविड 19
कोविड 19

27 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 मार्च 2020)

करोनावरील संभाव्य लशीचे घटक शोधण्यात यश :

 • करोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी औषध व लस शोधण्याचे प्रयत्न सुरू असून हैदराबाद विद्यापीठातील महिला संशोधिकेने या विषाणूवर परिणामकारक ठरू शकेल अशी प्रायोगिक लशीचे संभाव्य घटक शोधून काढले आहेत.
 • तर या लशीवर अजून प्रयोग सुरू व्हायचे आहेत. सार्स व एमईआरएस (सिव्हीयर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम व मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) या रोगांवरही ही लस परिणामकारक ठरू शकते.
 • हैदराबाद विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसच्या जैवरसायन विभागात काम करणाऱ्या डॉ. सीमा मिश्रा यांनी नवीन लशीचे प्रारूप तयार केले आहे. त्यांनी ‘टी सेल एपिटोप्स’ ही प्रायोगिक लस तयार केली असून त्या लशीच्या मदतीने कोविड 19 म्हणजेच करोना विषाणूला मारणे शक्य होणार आहे.

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय :

 • देशात लॉकडाउन लागू केल्यानंतर कामानिमित्त घरापासून दूर असलेले कामगार अडकून पडले. त्याचबरोबर जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत आणि हातावर पोट भरतात, अशा लोकांसमोर मोठं संकट उभं राहिलं.
 • त्यामुळे दिल्लीत राहणाऱ्या बहुसंख्य लोकांना गावाकडं स्थलांतर सुरू केलं आहे. करोनाचा संसर्गाच्या दृष्टीनं हे अत्यंत घातक असून, याला रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना घरभाडं भरणं अशक्य आहे, अशा लोकांचं भाडं दिल्ली सरकार भरणार आहे.
 • तसेच 15 मार्चनंतर देशात करोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढला. त्यामुळे तातडीचं पाऊल म्हणून केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली.

दिनविशेष:

 • थोरले बाजीराव पेशवे यांनी 1729 यावर्षी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
 • डच चित्रकार व्हिंसेंट व्हॅन गॉग यांचा जन्म 30 मार्च 1853 मध्ये झाला होता.
 • भारतीय भूदलाचे सहावे सरसेनापती ‘जनरल कोडेन्डेरा सुबय्या‘ तथा के.एस. थीमय्या यांचा जन्म 30 मार्च 1906 मध्ये झाला.
 • सन 1929 मध्ये भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
 • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक ‘क्लाउस स्च्वाब‘ यांचा जन्म 30 मार्च 1938 रोजी झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.