30 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs

उद्धव ठाकरें
उद्धव ठाकरें

30 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 जून 2022)

भारतीय बनावटीच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :

 • संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या पूर्ण भारतीय बनावटीच्या ‘लेसर गाईडेड’ रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची (लेसर गायडेड अँटीटँक गायडेड मिसाईल-एटीजीएम) भारतीय लष्कराच्या वतीने नगर शहराजवळील ह्णकेके रेंजह्णह्ण या युद्धसराव क्षेत्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
 • सुमारे नऊ महिन्यांपूर्वी दूर अंतरावरील लक्ष्याचा भेद करण्याची चाचणी याच सराव क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर आता जवळच्या अंतरासाठी घेण्यात आलेली ही चाचणीही यशस्वी झाली आहे.
 • भारतीय लष्करात मुख्य लढाऊ वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अर्जुन’ या रणगाडय़ावरून या चाचणीसाठी ‘एटीजीएम’ डागण्यात आले.
 • केके युद्ध सरावक्षेत्र लष्कराच्या ह्णआर्मर्ड कार्प्स अँड स्कूल (एसीसी अँड एस) या रणगाडा प्रशिक्षण केंद्राच्या अखत्यारीत नगर शहरापासून सुमारे 20 किमी. अंतरावर आहे.
 • याच सराव क्षेत्रात पूर्वी अर्जून रणगाडय़ाच्याही चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आता अर्जुनवरील 120 मिमी.च्या तोफेसाठी चाचण्या सुरू आहेत.
 • ‘एटीजीएम’ची चाचणी घेण्यात आली. यावेळी एटीजीएम क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेत आपली परिणामकारकता दाखवून दिली.
 • रणगाडय़ाच्या सुरक्षेसाठी ‘एक्सल्पोजिव्ह रिअ‍ॅक्टिव आर्मर’ (इरा) तंत्र वापरले जाते.
 • त्याला भेदण्यासाठी ह्णएटीजीएमह्णह्णवर ह्णहाय एक्सप्लोजिव्ह अँटीटँक (हीट) बसवले गेले आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जून 2022)

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव नामांतर :

 • शिवसेनेसाठी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या नामांतरांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली.
 • औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली़.
 • नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
 • शिवसेनेतील बंडाळीमुळे अस्थिर राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
 • आता हा प्रस्ताव नियमाप्रमाणे पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल.

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा :

 • मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय.
 • मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.

उपराष्ट्रपतीपदाची 6 ऑगस्टला निवडणूक :

 • उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 6 ऑगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही घोषणा केली.
 • विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी काढली जाणार असून 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
 • तर 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
 • तसेच 6 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.
 • लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतात.
 • तर या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यही सहभागी होतात.

‘क्यूएस’च्या यादीत मुंबईचाही समावेश :

 • विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची यादी ‘क्यूएस’ने जाहीर केली आहे.
 • लंडन हे जगातील विद्यार्थ्यांसाठीचे सर्वोत्कृष्ट शहर असल्याचे या यादीतून दिसून येत आहे.
 • परदेशातील विद्यार्थ्यांनाही लंडनमध्ये किफायतशीर आणि चांगले शिक्षण मिळत असून विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा, विद्यापीठांचा दर्जा याबाबतीत लंडन सरस असल्याचे या यादीत म्हटले आहे.
 • भारतातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर मुंबई असल्याचेही ‘क्यूएस’ने म्हटले आहे.
 • यंदा 2023 साठीची यादी जाहीर करण्यात आली आहे.
 • लंडननंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर दक्षिण कोरियातील सेऊल आणि जर्मनीमधील म्युनिच ही शहरे आहेत.
 • मुंबई या यादीत 103 व्या क्रमाकांवर असली तरी भारतात विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शहर मुंबई असल्याचे या यादीत म्हटले आहे.

मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धात सिंधू, कश्यपची विजयी सलामी :

 • पीव्ही सिंधूने मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत बुधवारी विजयी सलामी नोंदवली तर सायना नेहवालला गाशा गुंडाळावा लागला.
 • माजी विश्वविजेत्या सिंधूने दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन करीत थायलंडच्या जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकावरील पोर्नपावी चोचूवाँगला 21-13, 21-17 असे नामोहरम केले.
 • सिंधूने चोचूवाँगविरुद्ध आठव्या सामन्यापैकी पाचवा विजय मिळवला आहे.

दिनविशेष :

 • 30 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन आहे.
 • भारतीय रसायनशास्त्रज्ञ ‘चिंतामणी नागेश रामचंद्र राव‘ यांचा जन्म 30 जून 1934 मध्ये झाला.
 • जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 हा सन 1937 मध्ये लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
 • सन 1965 मध्ये भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
 • केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन सन 1986 मध्ये मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 जुलै 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.