30 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले:
नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले:

30 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 जून 2020)

6 राफेल लढाऊ जेट विमानांची पहिली तुकडी भारतात:

  • सहा राफेल लढाऊ जेट विमानांची पहिली तुकडी भारताला 27 जुलैपर्यंत मिळण्याची शक्यता असून, यामुळे भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता अधिक उंचावण्याची अपेक्षा आहे.
  • फ्रान्समधील करोना महासाथीचा परिणाम न होता राफेल जेट विमाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारताला दिली जातील.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2 जूनला त्यांच्या फ्रान्सच्या समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
  • या विमानाची पहिली स्क्वाड्रन हवाई दलाच्या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या तळांपैकी अंबाला हवाई दल स्थानकात तैनात केली जाईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जून 2020)

सुरक्षित सुविधा भारतातील फोनवर देण्यास सुरुवात-अ‍ॅपल व गुगल:

  • वापरकर्त्यांच्या व्यक्तिगततेला धक्का न लावता कोविड रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याची सोय अ‍ॅपल व गुगल या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आरोग्य संकटाच्या काळात एकत्र येऊन करून दिली आहे.
  • त्यात ‘एक्स्पोजर नोटिफिकेशन सोल्यूशन’ नावाची आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.
  • भारतात अँड्राइड व आयफोनवर ही सुविधा उपलब्ध करण्यास गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे.
  • ही सुविधा ‘एपीआय’ म्हणजे ‘अ‍ॅप्लीकेशन प्रोग्रॅम इंटरफेस’ असून त्यामुळे आरोग्य संस्था व सरकार यांना विश्वासार्ह पद्धतीने संपर्क व्यक्तींचा शोध घेता येऊ शकतो.
  • भारतातील आरोग्य सेतू हे उपयोजन या ‘एक्स्पोजर नोटिफिकेशन’ सुविधेला सुसंगत किंवा अनुकूल नसल्याने त्याचा वापर भारतात कठीण आहे.
  • आरोग्यसेतू उपयोजनात व्यक्तीची जास्तीत जास्त माहिती गोळा केली जाते त्यामुळे त्यात व्यक्तिगततेचा भंग होतो त्यामुळे सरतेशेवटी सरकारने या उपयोजनाची (अ‍ॅप्लीकेशन) सक्ती बंद केली होती.
  • ‘एक्स्पोजर नोटिफिकेशन’ सुविधा केवळ सार्वजनिक आरोग्य अधिकारी वापरत असलेल्या उपयोजनास लागू करता येते.

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर:

  • कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे.
  • त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान कराने, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
  • राज्यातील 23 वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे.
  • नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लाटिना प्रोजेक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचे डिजिटल उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
  • हा संकलित केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाईल. प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्वीता दर हा 90 टक्के आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

भारत व चीन यांच्या लष्करांमध्ये चर्चेची आणखी आज तिसरी फेरी:

  • पूर्व लडाख भागातील तणाव कमी करण्याचा, तसेच या संवेदनशील भागातून फौजा परत घेण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याचा प्रयत्न म्हणून भारत व चीन यांच्या लष्करांमध्ये चर्चेची आणखी एक फेरी होणार असल्याची माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली.
  • लेफ्टनंट जनरल स्तरावर होणाऱ्या चर्चेची ही तिसरी फेरी राहणार असून, प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भारतीय हद्दीतील चुशुल सेक्टरमध्ये ती सकाळी साडेदहा वाजता होईल.
  • पहिल्या दोन फेऱ्या ताबारेषेच्या चीनकडील बाजूच्या मोल्डो येथे झाल्या होत्या.
  • 22 जूनला झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत दोन्ही बाजूंची पूर्व लडाखमधील संघर्षांच्या सर्व ठिकाणांवरून फौजा माघीर घेण्याबाबत ‘परस्पर सहमती’ झाली होती.
  • त्यापूर्वी 6 जूनच्या पहिल्या फेरीत दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या कराराच्या अंमलबजावणीबाबत दोन्ही बाजू मंगळवारी चर्चा करणे अपेक्षित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
  • भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व 14 कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंग हे करणार असून, चिनी बाजूचे नेतृत्व तिबेट लष्करी जिल्ह्य़ाचे कमांडर करण्याची शक्यता आहे.

59 अ‍ॅपवर बंदी केंद्र सरकारने जाहीर केले:

  • लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घातली.
  • वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
  • माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘69अ’ मधील तरतुदींचा आधार घेत 59 अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले.

नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले:

  • भारताचे नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले आहे.
  • मेनन हे ‘एलिट’ पंचांमध्ये स्थान मिळवणारे सर्वात तरुण पंच ठरले आहेत. आगामी 2020-21 हंगामासाठी इंग्लंडच्या नायजेल लाँग यांच्या जागी मेनन यांची निवड झाली आहे.
  • 36 वर्षीय मेनन यांनी तीन कसोटी, 24 एकदिवसीय आणि 16 ट्वेन्टी-20 लढतींमध्ये पंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
  • आयसीसी’च्या मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवणारे मेनन हे श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदराम रवी यांच्यानंतर भारताचे तिसरे पंच आहेत.
  • ‘‘आयसीसीच्या जगातील मुख्य पंच आणि सामनाधिकाऱ्यांमध्ये स्थान मिळवावे, हे सुरुवातीपासून स्वप्न होते. अजूनही विश्वास बसत नाही,’’ असे मेनन यांनी सांगितले.

भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली:

  • करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे.
  • भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली.
  • आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.
  • जुलै महिन्यापासून या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार असल्याची माहिती भारच बायोटेककडून देण्यात आली.
  • एसएआरएस-सीओव्ही -2 स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळो करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले.
  • हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं आहे.
  • ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज 1 आणि फेज 2 मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

दिनविशेष :

  • 30 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन आहे.
  • भारतीय रसायनशास्त्रज्ञ ‘चिंतामणी नागेश रामचंद्र राव‘ यांचा जन्म 30 जून 1934 मध्ये झाला.
  • जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 हा सन 1937 मध्ये लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
  • सन 1965 मध्ये भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
  • केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन सन 1986 मध्ये मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 जुलै 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.