30 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

30 January 2020 Current Affairs In Marathi
30 January 2020 Current Affairs In Marathi

30 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 जानेवारी 2020)

अंतराळात दोन निकामी उपग्रह धडकण्याची शक्यता :

 • अवकाशात दोन उपग्रहांची टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांची नावे आयआरएएश व जीजीएसइ 4 अशी आहेत. ते एकमेकावर आदळण्याची शक्यता ही शंभरात 1 इतकी आहे.
 • तर या उपग्रहांची टक्कर रोखण्यासाठी कोणताही उपाय नाही, कारण ते निकामी उपग्रह असून त्यांच्याशी संपर्क साधणारी कुठलीही यंत्रणा चालू नाही. प्रत्यक्ष टकरीपेक्षा यातून निर्माण होणारा अवकाश कचरा ही मोठी डोकेदुखी आहे.
 • तसेच दी इन्फ्रारेड अस्ट्रॉनॉमिकल सॅटेलाइट व ग्रॅव्हिटी ग्रॅडिअंट स्टॅबिलायझेशन एक्सपिरिमेंट (जीजीएसइ 4) हे दोन उपग्रह ताशी 14 किमी वेगाने प्रवास करीत असून लिओलॅबच्या माहितीनुसार ते एकमेकांवर आदळण्याची शक्यता शंभरात एक आहे. कदाचित ते एकमेकांजवळून
 • जातील व टक्कर 15 ते 30 मीटरच्या अंतर फरकाने टळू शकते. हे उपग्रह निकामी असल्याने त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण आहे.
 • तर यापूर्वी काही उपग्रह साठ किलोमीटर जवळ आले होते, आताच्या उपग्रहांमध्ये तर हे अंतर कमी आहे. आयआरएएस उपग्रह 1083 किलोचा असून जीजीएसइ उपग्रह 4.5 किलो वजनाचा आहे.
 • उपग्रह एकमेकांवर आदळले तर अवकाश कचरा निर्माण होतो. भारताने मिशन शक्तीमध्ये उपग्रहभेदी क्षेपणास्त्राने एक उपग्रह फोडला होता त्यामुळे अवकाश कचरा निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती.

वाहनांवर डॉक्टर, आमदार किंवा प्रेस असे स्टीकर लावल्यास होणार दंड :

 • नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहनांवर महापौर, आमदार, प्रेस, डॉक्टर यांसारखे स्टिकर लावल्यास दंड होणार आहे.
 • यासंदर्भात पंजाब आणि हरयाणात पहिल्यांदा हा कायदा लागू होणार आहे. गेल्या आठवड्यात या दोन शहरांमध्ये या नव्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश हायकोर्टाने दिले होते.
 • तसेच त्यासाठी 72 तासांची मुदतही देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने आता याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने देशभरात हा नियम लागू होऊ शकतो.
 • तर न्या. राजीव शर्मा आणि न्या. अमोल रतन सिंह यांच्या खंडपीठाने एका सूमोटो याचिकेवर सुनावणी करताना याबाबत आदेश दिला होता. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार, खासगी वाहनांवर हायकोर्ट, आर्मी, पोलीस, प्रेस, पत्रकार, अध्यक्ष, उपाध्यक्ष असे शब्द लिहिण्यावर बंदी आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्टाने सरकारला 72 तासांचा अवधी दिला होता.

आता 24व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार :

 • केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी सुधारित मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक 2020 ला मंजुरी दिली. त्यामुळे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी कायदा, 1971 मध्ये सुधारणा केली जाणार आहे.
 • तर हे नवे विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे.
 • तसेच याद्वारे महिलांना यापूर्वी गर्भपातासाठी असलेली 20 आठवड्यांची मर्यादा वाढवत 24 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे देशातील माता मृत्यूदर कमी होण्यासही मदत होणार आहे.

रोहित शर्मानं केला मोठा विक्रम :

 • तिसऱ्या टी-20 सामन्यात सलामी फलंदाज रोहित शर्मानं मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
 • तर रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
 • न्यूझीलंडमध्ये सेडन पार्कवर सुरू असलेल्या टी-20 सामन्यात 50 धावा करताच रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम झाला आहे.
 • तसेच स्फोटक सलामी फलंदाज रोहित शर्मानं 219 व्या डावांत हा पराक्रम केला आहे.
 • सचिन तेंडुलकरने 214 डावांत दहा हजार धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना वेगवान दहा हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीने मोडला धोनीचा हा विक्रम :

 • भारतीय कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार एम.एस. धोनीचा विक्रम मोडला आहे.
 • विराट कोहलीनं टी 20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा काढण्याचा धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे.
 • भारतीय कर्णधार म्हणून टी 20 मध्ये सर्वाधिक धावा आता विराट कोहलीच्या नावावर आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.
 • तर न्यूझीलंडबरोबर सुरू असेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 25 धावा करताच टी 20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम केला. विराट कोहलीने न्यूझीलंडबरोबर 38 धावांची खेळी केली.
 • तसेच टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर 1126 धावा झाल्या आहेत. धोनीनं टी 20० कर्णधार असताना एक हजार 112 धावा काढल्या होत्या.
 • टी 20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून फाफ डु प्लेसिसच्या खात्यात 1 हजार 273 धावा आहेत.
 • तर 1 हजार 148 धावांसह दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सन आहे. विराट कोहली 1126 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

दिनविशेष:

 • गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म 30 जानेवारी 1910 मध्ये झाला होता.
 • शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म 30 जानेवारी 1911 रोजी झाला होता.
 • सन 1948 मध्ये नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
 • पीटर लेंको हा सन 1994 मध्ये बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
 1. balaji sargad says

  Bifor to and summary problem and exclusive and that for mi you can not be annar this is child for you and the problem completed think you me and of

Leave A Reply

Your email address will not be published.