30 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

30 December 2019 Current Affairs In Marath
30 December 2019 Current Affairs In Marath

30 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2019)

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान :

 • चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं.
 • चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती.
 • तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही.
 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2019)

हेमंत सोरेन बनले झारखंडचे 11वे मुख्यमंत्री :

 • झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली. राजधानी रांचीतील मोरहाबादी मैदानावर हा शपथविधीसोहळा पार पडला.
 • तसेच राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
 • तर यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.
 • हेमंत सोरेन हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. सोरेन यांच्यासह काँग्रेसचे विधिमंडळ नेते आलमगिर आलम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरान आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सत्यानंद भोक्त यांनी देखील यावेळी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली.

वेगवान गोलंदाज पीटर सिडलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा :

 • ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज पीटर सिडलने रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
 • न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये सहकाऱ्यांसमोर सिडलने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

ऐश्वर्य तोमर आणि रुद्रांक्ष पाटील यांना सुवर्ण :

 • मध्य प्रदेशच्या 18 वर्षीय ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने आर. आर. लक्ष्य चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या एअर रायफल नेमबाजी स्पर्धेतील 10 मीटर वरिष्ठ गटाचे रविवारी सुवर्णपदक पटकावले.
 • तर वर्षांच्या पूर्वार्धात 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिक पात्रता स्थान निश्चित करण्याची किमया साधणारा ऐश्वर्य पहिल्या 10 फैरींमध्ये राजस्थानच्या 16 वर्षीय यश वर्धनपेक्षा पिछाडीवर होता; परंतु 10.7, 10.8 आणि 10.9 असे सातत्याने गुण मिळवणाऱ्या ऐश्वर्यने एकूण 252.2 गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.
 • यशने 250.7 गुणांसह रौप्यपदक पटकावले, तर हृदय हझारिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • गतविजेत्या दिव्यांश सिंग पनवारला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 • तसेच कनिष्ठ गटात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने 249.9 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर पवन अंधारेला रौप्यपदक मिळाले. सौरव लगडने कांस्यपदक पटकावले.

जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतपद भारताच्या हम्पीनं पटकावलं :

 • रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपदावर भारताच्या कोनेरू हम्पीनं नाव कोरलं.
 • हम्पीनं चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव केला. महिला गटातील विजेतेपद हम्पीनं मिळवलं, तर पुरूष गटातील विजेतेपद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसह यांनं पटकावलं आहे.
 • पहिला फेरीमध्येच हम्पीचा पराभव झाला, त्यानंतर दुसऱ्या फेरीत मुंसडी मारत पुनरागमन केलं. त्यानंतर झालेल्या 12व्या फेरीपर्यंत हम्पीनं नऊ गुण मिळवत ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. हम्पी आणि टिंगजीचे गुण समान झाल्यामुळे विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीने करण्यात आला. अखेरच्या निर्णायक गेमसह हम्पीनं विजेतेपद पटकावले.

दिनविशेष :

 • ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे 30 डिसेंबर 1906 स्थापना.
 • 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.
 • गांधीवादी कार्यकर्ता आचार्य शंकरराव देव यांचे 30 डिसेंबर रोजी निधन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 डिसेंबर 2019)

You might also like
1 Comment
 1. Amol pandit says

  Good

Leave A Reply

Your email address will not be published.