30 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs
30 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2021)
आता ‘BH’ सीरिजमध्येही नोंद होणार वाहनं :
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केली आहे.
- तर यामार्फत वाहनधारक आता बीएच अर्थात भारत सीरिजमध्ये (BH)आपल्या नवीन वाहनांची नोंदणी करू शकणार आहेत.
- एका राज्यातील दुसऱ्या राज्यात जायचं म्हटलं तर नियमानुसार वाहनधारकानं वर्षभराच्या आपल्या वाहनांची पुन्हा नोंदणी करावी लागते.
- मात्र, या भारत सिरीजमुळे दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर वाहनधारकांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. ते दुसऱ्या राज्यात जुन्या नोंदणी क्रमांकावरून आपली वाहनं चालवू शकतात.
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या नव्या भारत सिरीजचा सर्वाधिक फायदा नोकरीच्या किंवा कामाच्यानिमित्ताने वारंवार इतर राज्यात जावं लागणाऱ्या, त्याचप्रमाणे सततच्या बदल्या होणाऱ्या व्यक्तींना होणार आहे. कारण, या लोकांची सततच्या नोंदणीच्या त्रासातून मोठी सुटका होणार आहे.
- सद्यस्थितीत कोणत्याही खाजगी वाहनधारकाला आपल्या वाहनाची नोंदणी करताना आपल्या मूळ राज्यात 15 वर्षांसाठी तर दुसऱ्या राज्यात गेल्यास पुन्हा 10 ते 12 वर्षांसाठी रस्ते आणि वाहतूक कर भरावा लागतो.
- मात्र, बीएच सीरिज योजनेमध्ये हा कर निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच 10 लाख रुपये किंमतीच्या वाहनासाठी 8 टक्के तर 10 ते 20 लाख रुपये किंमतीच्या वाहनासाठी 12 टक्के इतका कर असणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारताच्या खात्यात अजून दोन पदकांचा समावेश :
- भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य आणि एक कांस्य अशी मिळून एकूण तीन पदके जिंकली.
- टेबल टेनिसपटू भाविना पटेलने दिवसाची सुरुवात रौप्यपदकाने केली. तर संध्याकाळ अखेरीस निषाद कुमारने उंच उडीत रौप्य आणि विनोद कुमारने डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले.
- उंच उडी टी-47 स्पर्धेत सहभागी झालेल्या निषादने 2.06 मीटरसह रौप्यपदक जिंकले.
- 2019मध्ये पदार्पण केलेल्या निषादचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याने पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत आशियाई विक्रमाची बरोबरी केली.
- भारतीय धावपटू राम पालची कामगिरीही स्तुत्य होती. त्याने 1.94 मीटर उडी घेऊन पाचवे स्थान मिळवले, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भाविना पटेलने कोरले रौप्यपदकावर नाव :
- टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे.
- भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
- टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला.
- यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा 3-0 असा पराभव केला.
- टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे.
दिनविशेष :
- 30 ऑगस्ट 1835 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
- अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना 30 ऑगस्ट 1835 मध्ये झाली.
- नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा 30 ऑगस्ट 1871 मध्ये जन्म झाला.