30 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

30 August 2018 Current Affairs In Marathi

30 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2018)

टोल नाक्यावर व्हीआयपी आणि न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका :

 • राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल नाक्यांवर व्हीआयपी आणि विद्यमान न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.
 • आदेशाचे पालन न झाल्यास तो कोर्टाचा अवमान समजला जाईल असेही न्यायालयाने बजावले आहे.
 • तर स्वतंत्र मार्गिकेचा विषय सोडवला नाही तर सर्व संबंधित यंत्रणांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल असे न्यायालयाने सांगितले आहे.
 • तसेच संपूर्ण देशभरातील राष्ट्रीय महामार्गांसाठी आपला हा आदेश लागू असेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

भारतीय अंतराळवीर अवकाशात जाण्याचा मुहूर्त ठरला :

 • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने ‘मिशन गगनयान’साठी डिसेंबर 2021 चा मुहूर्त ठरवला आहे.Nasa
 • तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन गगनयानसाठी 2022 सालापर्यंतची मुदत दिली होती. पण इस्त्रोने त्यापेक्षा वर्षभर आधीच ही मोहिम प्रत्यक्षात आणण्याच संकल्प सोडला आहे.
 • मिशन गगनयान ही भारताची महत्वकांक्षी मोहिम असून भारत प्रथमच स्वबळावर आपल्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे.
 • तसेच इस्त्रोसाठी ही अत्यंत आव्हानात्मक मोहिम असून अवकाशवीरांना प्रत्यक्ष अंतराळात पाठवण्याआधी वेगवेगळया कठिण चाचण्या कराव्या लागणार आहेत.
 • यामध्ये डिसेंबर 2020 आणि जून 2021 मधील दोन मानवरहित मोहिमांचा समावेश आहे.
 • तर इस्त्रोला या मोहिमेसाठी आणखी वेगळया प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. क्रू सपोर्ट सिस्टिम, सर्व्हीस मॉडयुल आणि ऑरबिटल मॉडयुल बनवावे लागणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2018)

कर्ज मिळविण्यासाठी गुगलही करणार आता मदत :

 • जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या गुगलने नुकतीच एका महत्त्वाच्या गोष्टीची घोषणाGoogleकेली आहे.
 • सामान्यांना कधी घर घेण्यासाठी, कधी गाडी घेण्यासाठी तर कधी शिक्षणासाठी कर्जाची आवश्यकता असते. त्यावेळी आता गुगल मदतीला धावून येणार आहे.
 • विशेष म्हणजे हे लोन तुम्हाला घरबसल्या मिळू शकणार आहे. गुगलची मालकी असलेल्या अल्फाबेट या कंपनीकडून ही सुविधा दिली जाणार आहे.
 • यासाठी अल्फाबेटने 4 भारतीय बँकांशी करार करणार आहे. त्यामुळे आता कर्ज मिळण्याचा सोपा आणि चांगला पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
 • यामध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि फेडरल बँक यांचा समावेश आहे.
  यासाठी फार मोठी प्रक्रिया नसून काही सेकंदांमध्ये हे कर्ज मान्य होणार असल्याचेही गुगलकडून सांगण्यात आले आहे.

चांद्रयान-2चे जानेवारीत प्रक्षेपण :

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या जानेवारी महिन्यात चांद्रयान-2 या अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणार आहे.
 • चांद्रयान-2 या अंतराळ यानाचे जीएसएलव्ही-एमके-3-एम 1 या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
 • चांद्रयान-2च्या वजनामध्ये वाढ झाली असून आता ते 3.8 टन इतके झाले आहे. त्यामुळेच चांद्रयान-2चे जीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण करता येणार नाही, असेही सिवन यांनी सांगितले.
 • तसेच गरजेनुसार प्रक्षेपण यान अद्ययावत करून त्याला जीएसएलव्ही-एमके-३ असे स्वरूप देण्यात आले आहे.
 • तर सदर यानाचे प्रक्षेपण 3 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान करण्याचे ठरविण्यात आले आहे.
 • दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे जगातील पहिलेच अभियान आहे, असेही सिवन यांनी सांगितले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॉथ्लॉनमध्ये भारताला पहिलेच सुवर्णपदक :

 • आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॉथ्लॉनमध्ये भारताला पहिलेच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवले आहे.
 • स्वप्नाच्या सुवर्णपदक विजेत्या कामगिरीमुळे आज हेप्टॉथ्लॉन या खेळाचे नाव अनेकांना समजले असेल.
 • हेप्टॉथ्लॉनमध्ये एकूण सात खेळांचा समावेश होतो. तर तिने दोन दिवसात 6026 गुणांची कमाई करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 • पात्रता फेरीमधील पहिल्या दोन (भालाफेक आणि उडी) निकषांमध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने 800 मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले.
 • हेप्टॉथ्लॉन या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते.
 • त्याचबरोबर 100 मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.

अचंथा-मनिकाला ऐतिहासिक कांस्यपदक :

 • भारताची मिश्र दुहेरी जोडी मनिका बत्रा व अचंथा शरथ कमल यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यांनी ऐतिहासिक कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.
 • भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले होते.
 • त्यामुळे तब्बल 60 वर्षांनी भारताला टेबल टेनिसमध्ये पदक मिळाले.

अरपिंदर सिंहची ‘तिहेरी उडी’ सुवर्णपदकावर :

 • इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अकराव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर पडली आहे.
 • तिहेरी उडीत भारताच्या अरपिंदर सिंहने सुवर्णपदकची कमाई केली आहे.  तर या स्पर्धेतलं भारताचं हे दहावं सुवर्णपदक ठरलंय.
 • याच प्रकारात भारताचा राकेश बाबुही अंतिम फेरीत दाखल झाला होता, मात्र पदकांच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखणं त्याला जमलं नाही.

दिनविशेष :

 • 30 ऑगस्ट 1835 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
 • अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना 30 ऑगस्ट 1835 मध्ये झाली.
 • नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा 30 ऑगस्ट 1871 मध्ये जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.