3 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतीय महिलांची तिसऱ्या स्थानावर झेप:
भारतीय महिलांची तिसऱ्या स्थानावर झेप

3 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2020)

भारतात करोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 1.56 टक्के इतकं:

  • भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शुक्रवारी एक लाखांवर पोहोचली.
  • जगभरात आतापर्यंत करोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ जगभरातील एकूण मृत्यूंपैकी 10 टक्के मृत्यू भारतात झाले आहेत.
  • भारताच्या तुलनेत फक्त अमेरिका आणि ब्राझिलमध्ये सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. अमेरिकेत 2 लाख 12 हजार तर ब्राझिलमध्ये 1 लाख 45 हजार जणांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.
  • करोनामुळे जगभरात दिवसाला चार ते सहा हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे.
  • दुसरीकडे भारतात गेल्या एका महिन्यापासून दिवसाला जवळपास एक हजार रुग्ण आढळत आहेत.
  • गेल्या तीन महिन्यांपासून भारतातील मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. भारतात करोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 1.56 टक्के इतकं झालं आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2020)

‘एच 1 बी’ व्हिसा बंदी आदेशास अमेरिकी न्यायालयाची स्थगिती:

  • अमेरिकी न्यायालयाने एच 1 बी व्हिसावर घालण्यात आलेल्या तात्पुरत्या बंदीच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.
  • अध्यक्ष ट्रम्प यांनी हा आदेश जारी करताना त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन केले आहे, असे सांगून न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला चपराक दिली.
  • व्यापार व अंतर्गत सुरक्षा मंत्रालय यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ‘नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया’चे न्यायाधीश जेफ्री व्हाइट यांनी हा निकाल दिला.
  • व्हीसा बंदीमुळे अनेकउत्पादक कंपन्यांना आर्थिक दुरवस्था असताना महत्त्वाची पदे भरणे कठीण झाले होते, असे राष्ट्रीय उत्पादक संघटनेने म्हटले आहे.
  • एच 2 व्हिसा हे कृषीतर हंगामी कामगारांना दिले जातात. तर जे व्हिसा हे सांस्कृतिक आदानप्रदानासाठी वापरले जातात.
  • एल व्हिसा हे व्यवस्थापक व बहुराष्ट्रीय कंपन्यांतील व्यवस्थापक पदावरील कर्मचाऱ्यांसाठी वापरले जातात. या सर्व प्रकारच्या व्हिसांवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षअखेरीपर्यंत बंदी घातली होती.

भारतीय महिलांची तिसऱ्या स्थानावर झेप:

  • भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे.आयसीसीने शुक्रवारी महिला क्रिकेट संघांसाठी नवी क्रमवारी जाहीर केली.
  • या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाने आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे.
  • ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या खात्यात 291 तर इंग्लंड महिला संघाच्या खात्यात 280 गुण जमा आहेत.
  • फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा भारतीय महिला संघ 270 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
  • न्यूझीलंडचा संघ आणि भारताचा संघ यांच्यात फक्त एका गुणाचा फरक आहे.
  • भारतीय महिला संघाच्या खेळाडू सध्या युएईत महिला आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
  • 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय युएईत ३ संघांमध्ये ही स्पर्धा खेळवणार असल्याचं समजतंय.

दिनविशेष:

  • हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला.
  • इराकला सन 1932 मध्ये युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने सन 1935 या वर्षी इथिओपिया पादाक्रांत केले.
  • सन 1952 मध्ये युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.