3 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

3 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 मे 2022)

भारताच्या पाणबुडी प्रकल्पातून फ्रान्सच्या ‘नेव्हल ग्रुप’ची माघार :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित फ्रान्स दौऱ्यापूर्वी, आपण भारतीय नौदलाच्या पी-75 इंडिया प्रकल्पात सहभागी होऊ शकणार नसल्याचे फ्रान्समधील संरक्षण क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या नेव्हल ग्रुपने म्हटले आहे.
  • तर या प्रकल्पात, सहा पारंपरिक पाणबुडय़ा भारतात तयार केल्या जाणार होत्या.
  • तसेच आपण ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’ (आरएफपी)च्या शर्ती पूर्ण करू शकत नाही व त्यामुळे आपण लिलावातील बोलीवर कायम राहू शकत नाही, असे 43 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी ‘शॉर्टलिस्ट’ करण्यात आलेल्या पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक असलेल्या या ग्रुपने सांगितले आहे.
  • नव्या सामरिक भागीदारी प्रारूपांतर्गत हा सर्वात मोठा प्रकल्प असून, यात पाणबुडय़ा भारतातच तयार करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मूळ उपकरण उत्पादक (ओईएम) एका भारतीय कंपनीशी भागीदारी करेल आणि तंत्रज्ञानही देईल.
  • पी-75 आय हा भारतातच पाणबुडय़ा तयार करण्यासाठीचा दुसरा प्रकल्प आहे.
  • त्याअंतर्गत नेव्हल ग्रुपने माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डिंग लि.शी भागीदारी करून कलवरी श्रेणीच्या (स्कॉर्पिअन क्लास) सहा पाणबुडय़ा भारतातच तयार करण्याचे काम नुकतेच पूर्ण केले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मे 2022)

ट्विटरच्या सीईओ पदी इलॉन मस्क यांची निवड :

  • इलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड केली असल्याची माहिती समोर आली आहे.
  • मस्क यांनी निवड केलेली व्यक्ती ट्विटरची 44 अब्ज डॉलरमध्ये विक्री पूर्ण झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवालची जागा घेणार आहे.
  • तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक डॉर्सीच्या जागी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
  • अग्रवाल यांना 12 महिन्यांआधीच काढून टाकले तर कंपनीला त्यांना 38.7 अब्ज डॉलर द्यावे लागतील.
  • मात्र, कराराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पराग अग्रवाल या पदावर राहतील.

शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात रामायण, भगवद् गीता अन् वेद शिकवणार :

  • उत्तराखंडचे शिक्षण मंत्री धन सिंह रावत यांनी वेद, रामायण आणि भगवद् गीतेवर आधारित अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे असं मत व्यक्त केलंय.
  • शालेय शिक्षणामध्ये हिंदू धर्मांमधील ग्रंथ आणि वेदांचा समावेश करण्यात आला पहिजे असं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय.
  • तर धन सिंह रावत यांनी उत्तरखंडचा इतिहास आणि भौगोलिक परिस्थितीबद्दल म्हणजेच भूगोलाबद्दल शिकवलं जाणार आहे असंही सांगितलं,
  • नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय इतिहासावर आणि परंपरांवर आधारित शैक्षिणक धोरण तयार केलं जाणार असल्याचं उत्तराखंडच्या शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं.
  • वेद पुराण आणि गितेसहीत स्थानिक भाषांनाही अभ्यासक्रमामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले.

कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धात हर्षदाची सुवर्णकमाई :

  • पुण्याच्या हर्षदा गरूडने सोमवारी ग्रीसमध्ये झालेल्या कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली.
  • तर या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी ती पहिली भारतीय वेटलिफ्टिंगपटू ठरली आहे.
  • तसेच 45 किलो वजनी गटात हर्षदाने स्नॅचमध्ये 70 किलो, तर क्लिन आणि जर्कमध्ये 83 किलो असे एकूण 153 किलोचे वजन उचलत अग्रस्थान पटकावले.
  • 18 वर्षीय हर्षदाने यापूर्वी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत जेतेपद मिळवले असून तिने 2020 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत 139 किलो वजन उचलत कांस्यपदक मिळवले होते.

नागपूरची दिव्या भारतीय संघात :

  • आगामी ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खुल्या आणि महिला विभागात प्रत्येकी दोन संघ यजमान भारताचे प्रतिनिधित्व करणार असून या संघांची सोमवारी घोषणा करण्यात आली.
  • महिला संघामध्ये नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचाही समावेश करण्यात आला आहे.
  • पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद या स्पर्धेमध्ये भारतीय संघांच्या प्रेरकाच्या भूमिकेत दिसेल.
  • तर ही स्पर्धा चेन्नईमध्ये 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे.

दिनविशेष :

  • 3 मे 1912 हा दिवस उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी यांचा स्मृतीदिन आहे.
  • दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 3 मे 1939 रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
  • 3 मे 1947 रोजीइंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
  • भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म 3 मे 1959 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मे 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.