3 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
3 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 जून 2020)
शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये एमएसएमई क्षेत्रासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.
- तर करोनाच्या संकटकाळात एमएसएमई क्षेत्राचं महत्त्व ओळखून केंद्र सरकारनं त्यांना पॅकेज देण्याची घोषणा केली होती.
- तसेच सोमवारी पार पडलेल्या बैठकीत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत घोषणांसाठी रोडमॅप तयार करण्यात आला. या घोषणांमुळे एमएसएमई क्षेत्रात गुंतवणूक वाढणार असून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी आणि नरेंद्र तोमर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठीही मोठे निर्णय घेण्यात आले.
- तर संकटात अडकलेल्या एमएसएमई क्षेत्रासाठी ईक्विटी मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत 20 हजार कोटी रूपयांच्या मदतीच्या तरतूदीवर शिक्कामोर्तब करण्यात आली.
- तसेच यामुळे संकटात अडकलेल्या 2 लाख एमएसएमईला फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त 50 हजचार कोटी रूपयांच्या इक्विटी गुंतवणुकीचा प्रस्तावही पहिल्यांदा समोर आला आहे. यामुळे एमएसएमई उद्योगांना शेअर बाजाराती सूचिबद्ध होण्याची संधी मिळणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल उत्पादक केंद्र :
- भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल निर्मिती केंद्र म्हणून उदयास आला आहे, अशी घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी केली.
- तर गेल्या पाच वर्षात, देशात 200 पेक्षा अधिक मोबाईल निर्मिती युनिट्स सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात माहिती देणारं एक ग्राफिकल प्रेझेंटेशन सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे.
- तसेच यानुसार, भारतात सन 2014 च्या तुलनेत मोबाईल हँडसेट निर्मिती करणाऱ्या युनिट्समध्ये सन 2019 मध्ये 200 टक्के वाढ झाली.
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलंय की, इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना भारताला ईएसडीएम क्षेत्रातील डेस्टिनेशन म्हणून विचारात घ्यावं. कारण त्यांना जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती केंद्राचा भाग होण्याची संधी उपलब्ध होत आहे.
रशियाने बनवलं नवीन औषध :
- रशियाने करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे एक औषध विकसित केले आहे. पुढच्या आठवडयापासून रशियामध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर या औषधाचा वापर सुरु होणार आहे. रशियाच्या आरोग्य यंत्रणेने हे औषध वापरण्यास मंजुरी दिली आहे.
- तर या नव्या औषधामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल तसेच विस्कटलेली आर्थिक घ़डी रुळावर येऊन सर्वसामान्य जीवन हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.
- तसेच एविफेविर या नावाने औषधाची नोंदणी झाली आहे. पुढच्या आठवडयापासून म्हणजे 11 जूनपासून रशियन रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर या अँटीव्हायरल औषधाने उपचार सुरु होणार आहेत.
- एविफेविर औषध बनवणारी कंपनी महिन्याला 60 हजार रुग्णांवर उपचार करता येतील, इतक्या प्रमाणात औषध बनवणार आहे.
राणी, मनिका, विनेशची ‘खेलरत्न’साठी शिफारस :
- भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, कुस्तीपटू विनेश फोगट आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांची क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
- तसेच महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
राणीची हॉकी इंडियाकडून प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याशिवाय हॉकीमध्ये वंदना कतारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंग यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. - राणीच्या नेतृत्वाखाली भारताने 2017 मध्ये आशिया चषक पटकावला होता. तिने 2019 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निर्णायक गोल केल्याने भारताला टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला पात्र ठरता आले.
- भारतीय कुस्ती महासंघाकडून विनेशची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विनेश पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली भारताकडून एकमेव महिला कुस्तीपटू आहे.
सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध :
- पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (एनसीआरए- टीआयएफआर)च्या नॅशनल सेंटर फॉर स्ट्रोफिजिक्समधील वैज्ञानिकांनी सूर्याच्या सर्व भागांवर होणाऱ्या छोट्या विस्फोटातून निघणाऱ्या सूक्ष्म रेडिओ प्रकाशझोतांचा शोध लावला आहे.
- तर या संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी प्रथमच जगासमोर चुंबकीय विस्फोटाचे धूम्र लोट आढळून येत असल्याचे पुरावे मांडले आहे.
- तसेच ”एनसीआरए मधील प्रा.दिव्य ओबेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत असलेला विद्यार्थी सुरजित मोंडल व डॉ. अतुल मोहन या शास्त्रज्ञांच्या गटाने हे संशोधन केले आहे.
- ‘मर्चीसन वाइल्ड फिल्ड रे (एमडब्ल्यूए)’या दुर्बिणीतून घेतलेल्या डाटा व एनसीआरए मध्ये तयार केलेल्या आधुनिक तांत्रिक प्रणालीच्या सहाय्याने हा शोध लावला आहे.
- सूर्याच्या पृष्ठभागावर अंदाजे दोन दशलक्ष अंश तापमानाचा म्हणजेच सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा 300 पट जास्त उष्ण वायूचा एक थर असतो.या थराची झलक संपूर्ण खग्रास सूर्यग्रहणादरम्यान आपल्याला पाहता येते
दिनविशेष:
- 3 जून 1916 मध्ये महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
- हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना 3 जून 1947 मध्ये जाहीर झाली.
- जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी 3 जून 1998 मध्ये झाली.