3 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतीय रेल्वेनं 2.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे:
भारतीय रेल्वेनं 2.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे:

3 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 जुलै 2020)

भारतीय रेल्वेनं 2.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे:

 • गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. तर काळाप्रमाणे रेल्वेही बदलत आहे.
 • नुकताच भारतीय रेल्वेनं 8.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे. या मालगाडीला रेल्वेनं शेषनाग असं नाव दिलं आहे.
 • भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रेल्वेगाडी आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
 • भारतीय रेल्वेनं रेषनाग या मालगाडीला चार मालगाड्यांचे डबे एकत्र जोडून तयार केली आहे. या मालगाडीत एकूण 251 डबे जोडण्यात आले होतं.
 • तसंच ही मालगाडी खेचण्यासाठी सात इलेक्ट्रिक इंजिनही लावण्यात आली होती. सुरूवातीला तीन आणि मध्यभागी चार अशा इंजिनच्या मदतीनं ही रेल्वे चालवण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 जुलै 2020)

रशियाकडून 21 मिग-29 लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार:

 • सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी 38 हजार 900 कोटी रुपये खर्चून 33 लढाऊ जेट विमाने, अनेक क्षेपणास्त्र यंत्रणा आणि इतर लष्करी साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी मंजुरी दिली.
 • रशियाकडून 21 मिग-29 लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार.
 • सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडून 12 एसयू-30 एमकेआय (सुखोई) विमाने खरेदी केली जाणार आहेत.
 • तर 248 ‘अ‍ॅस्ट्रा’ क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

खासगी प्रवासी रेल्वेसेवा 2023 मध्ये प्रत्यक्षात येईल:

 • देशातील 109 मार्गावरील प्रवासी रेल्वेसेवा खासगी कंपन्यांकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव कार्यान्वित झाला असून ही खासगी सेवा एप्रिल 2023 मध्ये प्रत्यक्षात येईल, अशी माहिती रेल्वेमंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी गुरुवारी दिली.
 • मेड इन इंडिया’ धोरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याने देशी खासगी कंपन्यांना अग्रक्रम असेल.
 • रेल्वे मंत्रालयाने बुधवारी 109 रेल्वेमार्गावर 151 रेल्वे गाडय़ांच्या व्यवस्थापनासाठी खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत.
 • या प्रकल्पामध्ये 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या रेल्वे 16 डब्यांच्या असतील व कमाल 160 किमी वेगाने धावतील.

ज्येष्ठ माजी कॅरमपटू आणि आंतरराष्ट्रीय पंच जनार्दन संगम यांचे यांचे निधन:

 • ज्येष्ठ माजी कॅरमपटू आणि आंतरराष्ट्रीय पंच जनार्दन संगम यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.
 • संगम यांनी खेळाडू म्हणून नेव्हल डॉकयार्डचे प्रतिनिधित्व केले.
 • अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रमुख पंचांची भूमिका बजावणाऱ्या संगम यांनी तांत्रिक अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
 • 1992 ते 2019 या 27 वर्षांच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या कार्यकारिणीवर संयुक्त सचिव पद सांभाळले.
 • तसेच संघटनेचे माजी सचिव म्हणूनही ते कार्यरत होते. त्याशिवाय कॅरमच्या प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रे आणि क्रीडा वाहिन्यांद्वारे त्यांनी अमूल्य योगदान दिले.

33 लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे:

 • एकीकडे पूर्व लडाख सीमेवर चीनशी तणातणी सुरू असतानाच भारताने आता रशियाकडून लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • 33 लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी (12 सुखोई-30 एमकेआयएस आणि 21 मिग-29) संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे.
 • याशिवाय सध्या भारताकडे असलेले 59 मिग-29 लढाऊ विमानांचे अपग्रेडेशनही करण्यात येणार आहे.
 • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी संविधानात केलेल्या बदलांना रशियातील मतदारांनी मान्यता दिली.

दिनविशेष :

 • सन 1850 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
 • महात्मा फुले यांनी 3 जुलै 1852 मध्ये दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
 • भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ सन 1855 मध्ये झाला.
 • 3 जुलै 1884 मध्ये डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.
 • सन 2006 मध्ये एक्स.पी. 14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जुलै 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.