3 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs
3 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 जानेवारी 2022)
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू :
- करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू होत आहे.
- मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील 650 केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
- मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी 1 जानेवारी सुरू करण्यात आली आहे.
- तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- 2007 मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
Must Read (नक्की वाचा):
संमेलनाध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड :
- उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षपदी भारत सासणे यांच्या नावावर रविवारी महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
- नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद या सर्व घटक मंडळांकडून आलेल्या नावांवर चर्चा झाल्यानंतर काही मिनिटांतच सासणे हेच अध्यक्ष होतील, असे ठरविण्यात आले.
- अध्यक्षपदासाठी घटक संस्थांकडून प्रवीण दवणे, रामचंद्र देखणे, तारा भवाळकर व अनिल अवचट यांची नावेही चर्चेत होती.
महिलांच्या विवाहाच्या वयाची चिकित्सा :
- महिलांचे विवाहासाठीचे कायदेशीवर वय हे 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाची चिकित्सा ज्या संसदीय समितीकडून केली जाणार आहे, तिच्या 31 सदस्यांत केवळ एक महिला आहे.
- तर हे बालविवाह प्रतिबंधक कायदा सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात लोकसभेत सादर करण्यात आले होते.
- तसेच ते चिकित्सेसाठी संसदेच्या शिक्षण, महिला, बालक, युवा आणि क्रीडा विषयक स्थायी समितीकडे पाठविण्यात आले आहे.
- तर या विधेयकातील तरतुदींचा देशातील महिलावर्गावर दूरगामी परिणाम होणार आहे.
दिनविशेष:
- 3 जानेवारी हा दिवस ‘बालिकादिन‘ तसेच ‘अॅक्युपेशन थेरेपी दिन‘ म्हणून पाळला जातो.
- पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारकसावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.
- हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म 3 जानेवारी 1921 मध्ये झाला होता.
- सन 1950 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
- 3 जानेवारी 1952 रोजी स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
- नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर सन 2004 मध्ये राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.