3 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

3 December 2018 Current Affairs In Marathi

3 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 डिसेंबर 2018)

जी-20 परिषदेचे 2022 मध्ये यजमानपद भारताकडे:

  • जी-20 देशांची परिषद 2022 मध्ये भारतात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स येथे तेराव्या जी 20 शिखर बैठकीवेळी ही घोषणा केली. त्यांनी भारताला यजमानपद  दिल्याबद्दल इटलीचे अभिनंदन केले आहे. Narendra Modi
  • 2022 मधील जी 20 परिषदेचे यजमानपद इटली भूषवणार होता, पण भारताच्या विनंतीनुसार त्यांनी या परिषदेचे यजमानपद भारताला देऊ केले. 14 वी जी 20 परिषद जपानमध्ये तर पंधरावी सौदी  अरेबियात होणार आहे.
  • 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असून हे वर्ष विशेष आहे, त्यामुळे सर्वानी वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे म्हणजे भारतात यावे. भारताचा संपन्न इतिहास, विविधता यांचा अनुभव  घ्यावा, भारताचे आदरातिथ्यही बघावे असा संदेश समाजमाध्यमांद्वारे मोदी यांनी पाठवला होता.
  • जी 20 देशांमध्ये अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपीय समुदाय, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया,  तुर्कस्थान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश होता.
  • तर जी 20 देशांच्या अर्थव्यवस्थेत जगाचे 90 टक्के उत्पन्न सामावलेले असून, जागतिक व्यापाराचा 80 टक्के भाग या देशात आहे. जगाची दोनतृतीयांश लोकसंख्या या देशात राहते व जगातील निम्मा  भूभाग या देशात आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2018)

अनिल बिलावा ठरला ‘नवोदित मुंबई श्री’:

  • गोरेगाव पूर्व येथील पांडुरंगवाडी मैदानात रंगलेल्या नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत परळच्या हर्क्युलस जिमच्या अनिल बिलावा याने किताबावर नाव कोरले.
  • बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आाणि फिटनेस संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल 195 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तर वेळेचे पालन न करणाऱ्या 20 पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंना सहभाग नाकारण्यात आला.
  • प्रत्येक गटात 4-5 चांगले खेळाडू असल्यामुळे विजेता निवडण्यासाठी परीक्षकांना मेहनत घ्यावी लागली. 55 आणि 60 किलो वजनी गटात अनुक्रमे बॉडी वर्कशॉपच्या हेमंत भंडारी आणि विपुल सावंत यांनी बाजी मारली.
  • किताबासाठी हेमंत, विपुल, रुपेश चव्हाण, मकरंद दहिबावकर, अनिल बिलावा, राजेश खाटीकमोट आणि विकास म्हापसेकर यांच्यात चुरस रंगली. पण 75 किलो वजनी गटाच्या विजेता अनिल बिलावाने जेतेपदावर नाव कोरले.

‘ए.एस. राजीव’ बँक ऑफ महाराष्ट्रचे नवे व्यवस्थापकीय संचालक:

  • इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक ए.एस. राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2 डिसेंबर रोजी कार्यभार स्वीकारला आहे.
  • ए.एस. राजीव यांना सिंडिकेट बँक, विजया बँक आणि इंडियन बँक मधील सुमारे तीन दशके व्यावसायिक बँकिंगचा अनुभव आहे. Bank of Maharashtra
  • चार्टर्ड अकाउंटंट असण्यासोबतच त्यांच्याकडे कॉर्पोरेट क्रेडिट, आंतरराष्ट्रीय बँकिंग, ट्रेझरी, जोखीम व्यवस्थापन, क्रेडिट देखरेख व पर्यवेक्षण, एनपीए व्यवस्थापन, नियोजन आणि विकास, मानव संसाधन,  दक्षता, कॉर्पोरेट प्रशासन, तपासणी व लेखापरीक्षण, सायबर सुरक्षा, वित्त, खाती आणि कर यासह बँकिंगच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठा अनुभव आहे.
  • तसेच राजीव हे गणित पदवीधर असून सोबतच एफसीए, एमबीए, डीआयएसए आणि सीएआयआयबी पात्र आहेत.

साई संस्थानकडून राज्याला बिनव्याजी कर्ज:

  • आर्थिक संकटात सापडलेले फडणवीस सरकार साईबाबांच्या चरणी आले आहे. रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी तब्बल पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज राज्य सरकारला देण्याचा निर्णय शिर्डी साई संस्थानने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी हा निधी वापरला जाणार आहे.
  • नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्प चाळीस वर्षांपासून रखडले आहे. धरण बांधून पूर्ण असले, तरी निधीअभावी कालव्यांची कामे रखडली आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डी  संस्थानकडे कर्जाची मागणी केली होती.
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या एक फेब्रुवारीला कर्जाच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. त्याबाबतचा प्रस्ताव शिर्डी संस्थानकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला साई संस्थानने 1 डिसेंबर  रोजी मंजुरी दिली.
  • तसेच राज्य सरकारला दोन टप्प्यांत हे कर्ज दिले जाणार आहे. त्यासाठी गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महामंडळ आणि साई संस्थान यांच्यात याबाबत करारही करण्यात आला.

व्हॉट्‌सऍपकडून लवकरच पेमेंट सुविधा देण्यात येणार:

  • फेक न्यूजप्रकरणी टीकेचा सामना केल्यानंतर ‘व्हॉट्‌सऍपआता भारतात आपल्या पेमेंट सुविधेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे प्रमुख ख्रिस डॅनियल यांनी नुकतेच रिझर्व्ह बॅंकेला पत्र लिहून याबाबतची परवानगी मागितली आहे. Whats App
  • भारतातील व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांची संख्या सुमारे 20 कोटी आहे. त्यांना पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस असून, त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून व्हॉट्‌सऍप प्रयत्नशील आहे. ही सुविधा  सुरू करण्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर 10 लाख युझर्सद्वारे याची चाचणी घेण्यात आली आहे.
  • तत्पूर्वी व्हॉट्‌सऍपची प्रतिस्पर्धी कंपनी ‘गुगल’ने भारतात यापूर्वीच आपली पेमेंट सुविधा सुरू केली असून, रिझर्व्ह बॅंकेकडून परवानगी मिळाल्यानंतर व्हॉट्‌सऍपच्या युझर्सनाही या सुविधेचा लाभ घेता येणार  आहे.
  • दरम्यान, पेमेंट सुविधेसाठी विविध बॅंका, तसेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत बोलणी सुरू असल्याची माहिती व्हॉट्‌सऍपच्या प्रवक्‍त्याने दिली.
  • मध्यंतरी व्हॉट्‌सऍपवरील फेक संदेशांमुळे  जमावाकडून हत्यांचे प्रकार समोर आल्यानंतर व्हॉट्‌सऍपवर टीकेची झोड उठली होती. सरकारने याची दखल घेत ठोस उपाय योजनेच्या सूचना व्हॉट्‌सऍपला केल्या होत्या.

दिनविशेष:

  • 3 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक अपंग दिन‘ आहे.
  • सन 1870 मध्ये बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
  • जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1882 मध्ये झाला.
  • भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 मध्ये झाला.
  • 3 डिसेंबर 1951 हा दिवस कवियत्री ‘बहिणाबाई चौधरी’ यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.