3 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs
3 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2022)
साडेचार हजार शब्दांचा ‘पावरी भाषाकोश’ साकार :
- गुणवत्ता असूनही आदिवासी विद्यार्थी केवळ भाषिक अडसरामुळे शालेय शिक्षणात मागे पडतात.
- तर हे चित्र बदलण्यासाठी सुमारे साडेचार हजार शब्दांचा समावेश असलेल्या ‘पावरी भाषाकोश’ची निर्मिती करण्यात आली आहे.
- तसेच या भाषाकोशामुळे पावरा समाजातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मातृभाषा, राज्यभाषा, देशभाषा अन् ज्ञानभाषा इंग्रजीतील शब्दसंग्रह उपलब्ध होणार आहे.
- आमदार डॉ. संजय कुटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून व अडीच वर्षांच्या सखोल संशोधनातून ‘राइज फाउंडेशन’ने पाच भागात ‘पावरी भाषाकोश’ साकारला असून विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्टला जळगाव जामोद येथे याचे प्रकाशन होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
करोना लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार :
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
- अमित शाह यांच्या भेटीनंतर सुवेंदू अधिकारी यांनी अमित शाह यांनी हे आश्वासन दिलं असल्याची माहिती दिली.
- 11 डिसेंबर 2019 ला संसदेत सीएए संमत करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी अधिसूचना जारी करण्यात आली.
- केंद्र सरकारने अद्याप कायद्यासाठीची नियमावली तयार केलेली नाही.
- अनेक विरोधी पक्षांनी सीएएला विरोध केलेला असतानाही, अमित शाह यांनी याची अमलबजावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
- धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात लॉन बॉल्स महिला संघाला सुवर्णपदक :
- भारतीय महिला संघाने मंगळवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली.
- तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 17-10 असा पराभव केला.
- भारतीय संघात लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सेलिना आणि रूपा राणी तिर्की यांचा समावेश होता.
- तर या क्रीडा प्रकारात एखाद्या भारतीय संघांने अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
वेटलिफ्टिंगमध्ये विकास ठाकूरने पटकावले रौप्य पदक :
- बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे.
- स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय वेटलिफ्टिंगपटू विकास ठाकूरने 96 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
- तर हे भारताचे एकूण 12वे तर वेटलिफ्टिंगमधील आठवे पदक ठरले आहे.
- विकासने स्नॅच फेरीत 155 किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीमध्ये 191 किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण 346 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.
पुरुषांच्या टेबल टेनिसमधील सांघिक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक :
- भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.
- त्यापूर्वी लॉन बॉल खेळामध्ये भारतीय महिला लॉन बॉल संघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्ण पदक पटकावले.
- भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने अंतिम सामन्यात सिंगापूरचा 3-1 असा पराभव केला.
- भारताकडून दुहेरी सामन्यात हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी विजयाची नोंद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली होती
- पण, जी. साथियान आणि हरमीत देसाई यांनी आपापले वैयक्तीक सामने जिंकून भारताचे सुवर्णपदक निश्चित केले.
दिनविशेष :
- हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म 3 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.
- स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला.
- ‘द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी‘ची स्थापना सन 1900 मध्ये झाली.
- 3 ऑगस्ट 1948 मध्ये भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
- सन 1960 मध्ये नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.