3 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

क्रिकेटमधील डकवर्थ-लुइस प्रणालीचे जनक टोनी लुइस
क्रिकेटमधील डकवर्थ-लुइस प्रणालीचे जनक टोनी लुइस

3 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 एप्रिल 2020)

डकवर्थ-लुइसचे जनक टोनी लुइस यांचे निधन :

 • क्रिकेटमधील डकवर्थ-लुइस प्रणालीचे जनक टोनी लुइस यांचे लंडन येथे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) ही घोषणा केली.
 • तर टोनी यांनी गणितज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासोबत डकवर्थ-लुइस पद्धत 1997 मध्ये अमलात आणली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 1999 मध्ये ती स्वीकारली.
 • डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास गणिताची आकडेमोड करत षटके कमी करण्यात येतात. लुइस यांची ही प्रणाली क्रिकेटमध्ये चांगलीच गाजली. अजूनही सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ-लुइस प्रणालीचा आधार घेतला जातो.
 • तसेच लुइस यांना क्रिकेट आणि गणितातील या संशोधनाबद्दल ‘एमबीई’ या ब्रिटनमधील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 एप्रिल 2020)

प्राप्तिकर रिटर्न, ‘पॅन-आधार’ जोडणीची नवी मुदत 30 जूनपर्यंत :

 • प्राप्तिकराचे रिटर्न भरणे, प्राप्तिकर वजावटीसाठी गुंतवणूक करणे, पॅन कार्ड व ‘आधार’ची जोडणी 31 मार्चपर्यंत करणे अपेक्षित असलेल्या अनेक बाबींना केंद्र सरकारने सध्याचे कोरोना संकट लक्षात घेऊन, येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
 • तसेच मुदतीत कर न भरल्यास आकारल्या जाणाऱ्या व्याजाच्या दरातही कपात करण्यात आली असून, विलंबासाठी लावण्यात येणारा दंडही माफ करण्यात आला आहे.
 • तर प्राप्तिकर आणि भांडवली प्राप्तिकर यासारखे प्रत्यक्ष कर व केंद्रीय उत्पादन शुल्क, ‘जीएसटी’ व सीमाशुल्क यासारख्या अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत अनेक बाबींची पूर्तता करण्याची शेवटची तारीख वित्तीय वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 मार्च ही असते; परंतु कोरोना संकटाने सर्वच व्यवहार ठप्प वा विस्कळीत झाल्याने करदात्यांना या बाबींची पूर्तता करणे शक्य झालेले नाही, हे लक्षात घेऊन अशा अनेक बाबींना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यासह इतरही काही तरतुदी करणारा वटहुकूम राष्ट्रपतींनी मंगळवारी जारी केला.

सरकारी माहिती वापरण्याचा प्रसारमाध्यमांना सल्ला :

 • टाळेबंदीनंतर हजारो रोजंदारी मजुरांच्या स्थलांतराची निर्माण झालेली समस्या असत्य माहिती पसरल्यामुळे उद्भवली होती, असे कारण देत सरकारी माहितीवर अवलंबून राहण्याचा ‘सल्ला’ प्रसारमाध्यमांना तसेच, राज्य सरकारी अधिकाऱ्यांनाही देण्यात आला आहे.
 • करोनाच्या स्थितीचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी होत असलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सरकारी वृत्त वाहिन्या व सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीला प्राधान्य देण्यात आले आहे.
 • तसेच खासगी वृत्तवाहिन्यांच्या तसेच, वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहण्याची ‘सूचना’ करण्यात आली आहे.
 • सरकारद्वारे दिली जाणारी माहिती प्रसारमाध्यमांनी वापरली पाहिजे, अशी सूचना केंद्र सरकारद्वारे सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निवदेनात करण्यात आली होती. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी सामाजिक जबाबदारीने वागले पाहिजे असेही सरकारचे म्हणणे आहे.

दिनविशेष:

 • सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म 3 एप्रिल 1882 मध्ये झाला.
 • मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 रोजी झाला होता.
 • सन 1948 मध्ये ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
 • मार्टिन कूपर या मोटोरोलो कंपनीतील संशोधकाने 1973 मध्ये जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
 • सन 2000 मध्ये आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.