3 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

3 April 2019 Current Affairs In Marathi

3 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 एप्रिल 2019)

सुनीत जाधव तिसऱ्यांदा ‘भारत-श्री’चा मानकरी:

 • काही दिवसांपूर्वीच सलग सहाव्यांदा ‘महाराष्ट्र-श्री’ किताब पटकावणाऱ्या सुनीत जाधवने चेन्नईत रंगलेल्या 12व्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘भारत-श्री’ किताबाला गवसणी घातली. या विजयासह सुनीतने गेल्या वर्षी राम निवासकडून पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढला आणि गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा ‘भारत-श्री’ जिंकण्याची करामात केली.
 • महाराष्ट्राच्या दिनेश कांबळे आणि अनिल बिलावा यांनी अनुक्रमे 65 आणि 75 किलो वजनी गटात गटविजेतेपदाचा मान पटकावला. त्याचबरोबर रेल्वे आणि सेनादलाचे वर्चस्व मोडीत काढत महाराष्ट्राने पहिल्यांदाच सांघिक विजेतेपदावर नाव कोरले.
 • भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत सुनीत, दिल्लीचा नरेंदर यादव आणि सेना दलाच्या अनुज कुमार तालियन यांच्यात अंतिम विजेतेपदासाठी कडवी चुरस रंगली होती.
 • महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात महाराष्ट्राच्या दिपाली ओगले हिने रौप्यपदक पटकावले. ‘मिस-महाराष्ट्र श्री’ ठरलेल्या मंजिरी भावसार हिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 • महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत हरयाणाची गीता सैनी विजेती ठरली. महाराष्ट्राच्या अमला ब्रह्मचारी हिने चौथे स्थान प्राप्त केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 एप्रिल 2019)

मिशन शक्ती मुळे आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकास धोका:

 • भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीत लक्ष्य केलेल्या उपग्रहाचे 400 तुकडे अवकाशात तरंगत असून त्याचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकास धोका निर्माण झाला असल्याचे ‘नासा’ या अमेरिकी अवकाश संस्थेने म्हटले आहे. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर निर्माण झालेले तुकडे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर आदळण्याची शक्यता 44 टक्के वाढली आहे. A-SAT
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 मार्च रोजी उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याचे जाहीर केले होते. कमी उंचीवरील उपग्रह भेदून ही चाचणी यशस्वी करण्यात आली होती. त्यात जमिनीवरून अवकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र वापरले होते.
 • तर ही चाचणी यशस्वी झाल्याने भारत हा अवकाशशक्ती बनला होता. अमेरिका, रशिया व चीन यांच्यानंतर उपग्रहभेदी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असलेला भारत हा चौथा देश ठरला होता.
 • दी नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेचे प्रशासक जिम ब्रायडेनस्टाइन यांनी सांगितले, की आतापर्यंत भारताने भेदलेल्या उपग्रहाचे 60 तुकडे ओळखण्यात यश आले असून त्यातील 24 तुकडे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापासून जवळच्या कक्षेत आहेत.
 • नासा टाउनहॉल येथे त्यांनी कर्मचाऱ्यांशी बोलताना सांगितले, की ज्यात अवकाश स्थानकास धोका निर्माण होईल अशी चाचणी करणे भयानक होते. हा कचरा अवकाश स्थानकापासून कमी उंचीवरून भ्रमण करीत आहे. आगामी मानवी अवकाश उड्डाणांसाठी ही घटना खूपच धोकादायक आहे.
 • ब्रायडेनस्टाइन हे भारताच्या उपग्रहभेदी चाचणीस विरोध करणारे ट्रम्प प्रशासनातील पहिले वरिष्ठ अधिकारी आहेत. भारताने केलेली उपग्रहभेदी चाचणी घातक ठरली असून तासागणिकच्या निरीक्षणात आम्हाला त्यातून निर्माण झालेल्या तुकडय़ांचा धोका दिसून येत आहे. असे त्यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त:

 • आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. तत्काळ प्रभावाने आव्हाड यांच्याकडे या पदाची सूत्रे सोपवण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 • जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे आक्रमक नेते मानले जाता. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी लक्षात घेऊन शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले महत्त्वाचे मानले जाणारे पद त्यांना दिले आहे.
 • जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस पद आव्हाड यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

भारत सलग तिसर्‍यांदा ICC क्रमवारीत प्रथम स्थानी:

 • विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखत ICC Test Championship Mace म्हणजे ICC कडून मानाची गदा मिळवली. या मनाच्या गदा पुरस्कारासोबतच टीम इंडियाला 1 मिलियन डॉलरचे रोख रकमेचे बक्षीसही देण्यात आले. Virat-ICC-Mace
 • 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत प्रत्येक संघाची कसोटी कामगिरी पाहून जो संघ वर्षाअखेरीस (1 एप्रिल) अव्वल स्थानी विराजमान होतो, त्या संघाला ही मानाची गदा आणि रोख रकमेचा पुरस्कार दिला जातो.
 • तर टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार मिळाला. ICC कडून विराट कोहलीला मानाची गदा प्रदान करून टीम इंडियाचा सन्मान करण्यात आला.
 • संघाच्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडने दुसरे स्थान पटकावले आहे. बांगलादेशविरुद्ध मिळवलेल्या कसोटी मालिका विजयाच्या बळावर त्यांना वर्षअखेरीस दुसऱ्या स्थानी विराजमान होता आले आहे. या यादीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.

अपूर्वा ठाकूर जागतिक सौंदर्य स्पर्धेत चमकली:

 • अमेरिकेतील पनामा येथे नुकतीच मिस टिन युनिव्हर्स 2019 स्पर्धा पार पडली. या सौंदर्य स्पर्धेत अलिबागच्या अपूर्वा ठाकूर हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धेत लक्षणीय कामगिरी बजावत तीने थर्ड रनर अपचा किताब पटकावला.
 • या स्पर्धेत वेगवेगळ्या 28 देशातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यातील 16 जणींची उपांत्य फेरीत निवड करण्यात आली. अंतिम फेरीसाठी सहा स्पर्धकांची निवड झाली, ज्यात अपूर्वाचाही समावेश होता.
 • तर चुरशीच्या फेरीत अपूर्वा मिस टिन युनिव्हर्स किताब पटकावण्यात अपयशी ठरली. मात्र स्पर्धेतील थर्ड रनर अपचा किताब तिनं पटकावला. ब्राझिल आणि मेक्सिकोच्या सौंदर्यवतींनी स्पर्धेवर वर्चस्व राखले.
 • तसेच अपूर्वाला देशभरातून मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अपूर्वाने मिस टिन इंडिया युनिव्हर्सचा किताब 2018 मध्ये जिंकला होता.

दिनविशेष:

 • सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म 3 एप्रिल 1882 मध्ये झाला.
 • मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 रोजी झाला होता.
 • सन 1948 मध्ये ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
 • मार्टिन कूपर या मोटोरोलो कंपनीतील संशोधकाने 1973 मध्ये जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
 • सन 2000 मध्ये आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 एप्रिल 2019)

You might also like
1 Comment
 1. Pratiksha dharmik says

  Usefull and interesting new

Leave A Reply

Your email address will not be published.