29 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

कायरन पोलार्ड
कायरन पोलार्ड

29 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 सप्टेंबर 2021)

शेतकऱ्यांसाठी पिकांच्या 35 नव्या प्रजाती :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पिकांच्या 35 नवीन प्रजाती कृषी क्षेत्रातील वापरासाठी खुल्या केल्या असून त्या केंद्रीय कृषी संशोधन परिषदेने तयार केलेल्या आहेत.
  • तसेच हवामान बदल व कुपोषण या दोन आव्हानांना तोंड देण्यासाठी त्या तयार करण्यात आल्या.
  • तर या प्रजाती 2021 मध्ये विकसित करण्यात आल्या आहेत.
  • केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, देशातील 86 टक्के शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत. त्यांचे उत्पन्न यातून वाढणार आहे. शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून राहू नये. स्वत:च्या शक्तीवर उभे रहावे अशी पंतप्रधानांची इच्छा आहे.
  • त्यासाठी पंतप्रधान किसान योजना, वाहतूक सुविधा, किसान रेल यांसारखे उपक्रम राबवण्यात आले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतानाच त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
  • विविध पिकांचा समावेश पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी खुल्या केलेल्या पिकांच्या प्रजातींमध्ये चवळीची दुष्काळाला तोंड देऊ शकणारी प्रजाती, सोयाबीनची लवकर तयार होणारी प्रजाती, वाटाणा व तुरीची कीडप्रतिबंधक व बुरशीप्रतिरोधक प्रजाती, गहू, बाजरी, मका, क्विनोआ, तांदूळ, मका, विंगड बिन यांच्या प्रजातींचाही समावेश आहे.

आशियातल्या सर्वात लांब बोगद्याची उद्घाटनाची तारीख जाहीर :

  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जम्मू -काश्मीरमधील आशियातील सर्वात लांब झोजिला बोगद्याचा आढावा घेतला.
  • तर या बोगद्यामुळे लेह ते श्रीनगर हे अंतर तीन तासांनी कमी होणार आहे.
  • तसेच झोजिला बोगदा ऑल वेदर रोड कनेक्टिव्हिटी अंतर्गत बांधला जात आहे, हा आशियातील सर्वात लांब बोगदा असणार आहे.
  • केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जोजिला बोगद्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे, आम्हाला आशा आहे की ते 23 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि पंतप्रधान 26 जानेवारीला त्याचे उद्घाटन करतील.
  • मोदी सरकार आल्यावर जम्मू -काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग 1695 किलोमीटर लांबीचा होता, पण आता तो 2,664 किलोमीटरचा झाला आहे.

जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धात भारताचा अर्मेनियावर विजय :

  • भारतीय संघाने मंगळवारी तिसऱ्या फेरीत अर्मेनियाला 2.5-1.5 असे नमवून ‘फिडे’ जागतिक सांघिक महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत दुसऱ्या विजयाची नोंद केली.
  • अ-गटात समावेश असलेल्या भारताने पहिल्या फेरीत अझरबैजानशी 2-2 अशी बरोबरी साधली, तर दुसऱ्या फेरीत स्पेनला 2.5-1.5 असे हरवले.
  • तिसऱ्या फेरीतील विजयामुळे भारताने 7 गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले आहे, तर रशियाने 11 गुणांसह आघाडी टिकवली.

मुंबईचा पोलार्ड ठरला जगातला पहिला क्रिकेटर :

  • मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएल 2021च्या 42 व्या सामन्यात आपल्या शानदार गोलंदाजीने इतिहास रचला.
  • पोलार्डने सामन्यातील आपल्या पहिल्याच षटकात ख्रिस गेल आणि केएल राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
  • तर राहुलची विकेट घेत पोलार्डने टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 300 विकेट्स पूर्ण केल्या.
  • पोलार्ड टी-20 मध्ये 10 हजार धावा तसेच 300 विकेट घेणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
  • सर्वाधिक टी-20 ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम पोलार्डच्या नावावर आहे. तो 15 वेळा टी-20 ट्रॉफी जिंकणाऱ्या संघांचा भाग आहे.
  • त्याच्याशिवाय ड्वेन ब्राव्होने या फॉरमॅटमध्ये हा पराक्रम केला आहे.

दिनविशेष :

  • 29 सप्टेंबर हा दिवस ‘जागातिक हृदय दिन‘ आहे.
  • सन 1917 मध्ये मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
  • ‘बिर्ला तारांगण‘ हे आशियातील पहिले तारांगण सन 1963 मध्ये कोलकाता येथे सुरू झाले.
  • सन 2012 मध्ये ‘अल्तमस कबीर‘ हे भारताचे 39वे सरन्यायाधीश झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.