29 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

मीराबाईचा अमेरिकेत सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च:
मीराबाईचा अमेरिकेत सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च

29 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 सप्टेंबर 2020)

ट्रॅम्प यांच्याकडून 2016-2017 या काळात केवळ 750 डॉलर प्राप्तिकर भरणा:

 • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016-2017 या काळात फक्त750अमेरिकी डॉलर्स इतका प्राप्तिकर भरल्याचे उघड झाले आहे.
 • त्यावेळी ते अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. व्हाइट हाऊसमध्ये त्यांचे पहिले वर्ष यात पूर्ण झाले होते.
 • माध्यमांच्या बातम्यांनुसार ते व त्यांच्या कंपन्यांनी 2017 मध्ये भारतात 1,45,400 अमेरिकी डॉलर्स इतका प्राप्तिकर भरला आहे.
 • ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने २०१६ मध्ये रिंगणात उतरले व निवडून आले. त्यांचा डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावरचा विजय हा आश्चर्यकारक मानला जात होता.
 • डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या वर्षी निवडणूक जिंकली त्या वर्षांत केवळ 750 डॉलर्सचा कर भरला असल्याचे दी न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.

राफेलला ऑफसेट भागीदार जाहीर न करण्याची मुभा:

 • एप्रिल 2016 मध्ये संरक्षण खरेदी धोरणात करण्यात आलेल्या बदलामुळे, 36 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी त्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारत व फ्रान्स यांनी करार केला तेव्हा ‘ऑफसेट भागीदार’ जाहीर न करण्याची मुभा राफेल लढाऊ विमानांच्या पुरवठादारांना मिळाली.
 • केंद्र सरकारने 2015 साली ऑफसेट धोरणात प्रस्तावित केलेले बदल 1 एप्रिल 2016 पासून ‘योग्यप्रकारे समाविष्ट करण्यात आले’, असे भारताच्या नियंत्रक व महालेखापालांनी (कॅग) 2019 सालच्या अहवाल क्र. 20 मध्ये नमूद केले आहे.
 • हा अहवाल गेल्या आठवडय़ात संसदेत सादर करण्यात आला.
 • धोरणातील बदलाचा अर्थ, राफेल व्यवहाराच्या प्रकरणात विदेशी विक्रेत्यांना सप्टेंबर 2016 मध्ये करारावर स्वाक्षरी करतेवेळी ऑफसेट पार्टनर जाहीर करावा लागला नाही.

मीराबाईचा अमेरिकेत सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च:

 • टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होण्याकरिता भारताची अव्वल वेटलिफ्टर मीराबाई चानूला अमेरिकेत सरावाची परवानगी मिळाली आहे.
 • मीराबाईच्या सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) करण्यात येणार आहे.
  मीराबाई तिच्या दोन प्रशिक्षकांसह लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.
 • अमेरिकेतील कॅन्सास सिटी येथे ती दोन महिने सराव करणार आहे. मीराबाई ही ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ या उपक्रमातील निवडक खेळाडू असल्याने तिच्या सरावाचा खर्च ‘साइ’ करणार आहे.
 • अमेरिकेत मीराबाईच्या सरावाचा खर्च एकूण 40 लाख रुपये अपेक्षित आहे. तो आम्ही उचलणार आहोत.
 • अमेरिकेतील सरावाचा फायदा मीराबाईला ऑलिम्पिक पात्रतेसाठी होईल,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

दिनविशेष :

 • 29 सप्टेंबर हा दिवस ‘जागातिक हृदय दिन‘ आहे.
 • सन 1917 मध्ये मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
 • ‘बिर्ला तारांगण‘ हे आशियातील पहिले तारांगण सन 1963 मध्ये कोलकाता येथे सुरू झाले.
 • सन 2012 मध्ये ‘अल्तमस कबीर‘ हे भारताचे 39वे सरन्यायाधीश झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.