29 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

अ‍ॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक:
अ‍ॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक:

29 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 ऑक्टोबर 2020)

अ‍ॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक:

  • अ‍ॅपलनं आपल्या मोबाईल फोनची निर्मिती भारतात करण्यास सुरूवात केली आहे.
  • तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक संकुलामध्ये अ‍ॅपलसाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी टाटा समूह 5 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.
  • टाटा इलेक्ट्रॉनिक्स या नव्या कंपनीला तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाकडून 500 एकर जागा देण्यात आली फॉक्सकॉन यापूर्वीपासून भारतात आयफोन 11 सहित अन्य मोबाईल फोन्सची निर्मिती करत आहे.
  • टायटन इंजिनिअरिंग अँड ऑटोमेशन लिमिटेडद्वारे (TEAL) या प्रकल्पाला तांत्रिक मदत पुरवली जाणार आहे.
  • या प्रकल्पात ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 18 हजार कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यात येणार आहे.
  • तसंच यापैकी 90 टक्के महिला कर्मचारी असतील अशीही माहिती समोर आली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 ऑक्टोबर 2020)

16 Omni- role राफेल जेट लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात सामील होणार:

  • भारताने फ्रान्सला 36 राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील पाच विमाने 29 जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली.
  • आता भारतीय हवाई दलाची क्षणता आणि ताकद आणखी वाढणार आहे. 16 Omni- role राफेल जेट लढाऊ विमानं एप्रिल 2021 पर्यंत भारतीय हवाई दलात सामील होणार आहेत.
  • भारतातही जेट इंजिन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची निर्मिती करण्याचं काम सुरू करणार असल्याची माहिती फ्रान्सची सर्वात मोठी जेट इंजिन तयार करणारी कंपनी सफरानकडून देण्यात आली.

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी ‘आयसीसी’ प्रयत्नशील!:

  • विश्वातील अव्वल तीन खेळांमध्ये स्थान मिळवणाऱ्या क्रिकेटचा पुन्हा एकदा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढाकार घेतला आहे.
  • ‘आयसीसी’ने संबंधित देशांकडून याद्वारे होणाऱ्या नफ्याचा अहवाल मागवला आहे.
  • 2018मध्ये ‘आयसीसी’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार 87 टक्के चाहत्यांनी क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याला होकार दर्शवला होता.
  • यापूर्वी 1900मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा एकमेव सामना खेळवण्यात आला होता.
    त्यावेळी ग्रेट ब्रिटन संघाने फ्रान्सचा 158 धावांनी धुव्वा उडवून सुवर्णपदक पटकावले होते.

दिनविशेष:

  • 29 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक स्ट्रोक दिन’ आहे.
  • सन 1894 मध्ये महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना झाली.
  • महर्षि धोंडो केशव कर्वे यांना सन 1958 मध्ये भारतरत्‍न पुरस्कार प्रदान.
  • भारतीय बॉक्सर ‘विजेंदर सिंग‘ यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1985 रोजी झाला.
  • सन 1996 मध्ये स्वदेशात बनविलेली कामिनी ही 30 मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
  • सन 2008 मध्ये डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समध्ये विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.