29 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 November 2018 Current Affairs In Marathi

29 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 नोव्हेंबर 2018)

‘एसबीआय’ने एफडीवरील व्याजदर वाढवले:

  • स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ठेवीदारांना दिलासा दिला आहे. एसबीआयने फिक्स्ड डिपॉझिटवर (एफडी) मिळणाऱ्या व्याजदरात पाच बेसिक पॉइंट्सची वाढ केली आहे. आता एफडीवर 6.8 टक्के व्याज मिळणार आहे. SBI
  • बँकेचे हे नवे व्याजदर तात्काळ लागू झाले आहेत. एकाच वर्षात दोनदा व्याजदर वाढवल्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय वरिष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दरवाढ देण्यात आली आहे.
  • तर यापूर्वी एफडीवर 6.75 टक्के इतका व्याजदर मिळत होता, त्यात पाच बेसिक पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) बैठक होणार आहे. त्या बैठकीआधीच एसबीआयने हा निर्णय घेतला आहे.

युक्रेनच्या ‘डॉनबास’ला सुवर्णमयूर पुरस्कार:

  • हायब्रिड युद्धाची कहाणी सांगणाऱ्या युक्रेनच्या डॉनबास या चित्रपटाने भारताच्या 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णमयूर पटकावला. ‘वॉकिंग वुईथ द विंड’ या प्रवीण मोर्चाले यांच्या चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी मेमोरियल पारितोषिक प्राप्त झाले.
  • ए.मा. याव या केरळमध्ये चित्रीकरण केलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जुजे पेलिसरी यांना उत्कृष्ट दिग्दर्शन तर त्याच चित्रपटातील अभिनेते चेम्बान विनोद यांना उत्कृष्ट अभिनेत्याची बक्षिसे मिळाली.
  • युक्रेनच्या ‘व्हेन द ट्रिस फॉल’ या चित्रपटातील अनास्तासिया पुस्तोवित यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे बक्षीस प्राप्त झाले. मिल्को लाझारोवस यांच्या आगा या सिनेमाला विशेष ज्युरी पारितोषिकाने गौरविण्यात आले.
  • रिस्पेक्‍टो या आल्बर्टो मॉंट्रियास यांच्या पदार्पणातील फिचर फिल्मला दिग्दर्शनाचे इनाम मिळाले. लॉस सायलेन्सियॉस या पोर्तुगीज, स्पॅनिश चित्रपटाच्या दिग्दर्शक बिट्रिज सिनर यांना आयसीएफटी युनेस्को गांधी मेमोरियल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

लायसन्स, आरसी बूक सोबत नसतानाही करू शकणार ड्रायव्हिंग:

  • कोणतीही गाडी तुम्हाला चालवायची असल्यास, तुमच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. विना परवाना गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा मनाला जातो.
  • वाहतुकीचा नियम मोडला किंवा इतर तपासणीसाठी वाहतूक पोलिसांनी कोणतेही वाहन बाजूला घेतले की पहिल्यांदा त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीची इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. यामुळे प्रत्येक वाहनचालकाला ही कागदपत्रे जवळ बाळगूनच वाहन चालवावे लागते. Digital Loker
  • पण आता वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक न बाळगताही वाहन चालवता येणार आहे. डिजिटल स्वरुपात (मोबाईलमध्ये) ही कागदपत्रे वाहनचालकाजवळ असतील, तर त्याला पोलिसांना दाखवता येऊ शकतील.
  • वाहतूक आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयांनी मोटार वाहन कायदा 1989 नुसार डिजीटल स्वरूपात कागदपत्रे दाखवता येतील असा अध्यादेश काढला आहे. यासाठी ‘डिजिलॉकर‘ सुविधेची सुरुवात करण्यात येत आहे.
  • प्लेस्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. या अॅपमध्ये सर्व मुळ कागदपत्राची स्कॅन कॉपी सेव्ह करून ठेवावी लागेल. त्याव्यतिरीक्त इतर कोणतीही कागदपत्रे चालणार नाहीत.
  • तसेच रस्त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यास मूळ प्रतीऐवजी मोबाइल अ‍ॅपवरील कागदपत्रांची प्रतिमा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी हे डिजिलॉकर वाहनचालकाच्या मोबाईललाही जोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे जतन केलेली आपली सर्व प्रमाणपत्र डिजिटल लॉकरमधून जगभरात कोठेही उपलब्ध होण्याबरोबरच आयुष्यभर सुरक्षित राहणार आहेत.

भारतात पालीच्या नव्या प्रजातींचा शोध:

  • पूर्वेत्तर भारतात वाकलेल्या व सच्छिद्र पालींच्या (बेन-टोंड गेको) सहा नव्या प्रजातींचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. घरात आढळणाऱ्या पालींपेक्षा या अतिशय वेगळ्या असून जमिनीवर तसेच दगडांवर देखील राहतात. ही प्रजाती फक्त पूर्वेत्तर भारतातच आढळत असून ‘टॅक्सोनॉमिक जर्नल झुटा’मध्ये या संशोधनावरील पेपर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • जागतिक पातळीवर सुमारे 250 पेक्षा अधिक पालींच्या प्रजाती आहेत. या वर्षांच्या सुरुवातीला हिमालय आणि पूवरेत्तर भारतातून या सहा नव्या प्रजातींचा शोध लागला.
  • हिमालयातील चार आणि पूर्वेत्तर भारतातील 11 प्रजातींपैकी या संपूर्ण वर्षांत एकूण नऊ प्रजातींचा शोध लागला आहे. शेजारील म्यानमार मध्येही 2017 पासून 20 नव्या प्रजातींचा शोध घेण्यात आला आहे.
  • इंडो-बर्मादरम्यान असलेल्या समृद्ध जैवविविधतेतून या नव्या प्रजाती मिळत आहेत. यापूर्वी कधीही या पद्धतीने संशोधन झाले नव्हते. गुवाहाटी येथून मिळालेल्या प्रजातीला ‘सायट्रोडॅक्टिलस गुवाहाटीनेस’ किंवा ‘गुवाहाटी बेंट-टोंड गेको’ असे नाव देण्यात आले आहे.

दिनविशेष:

  • समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1869 मध्ये झाला होता.
  • प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.
  • 29 नोव्हेंबर 1993 हा दिवस जे.आर.डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा स्मृतीदिन आहे. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.
  • सन 1996 या वर्षी नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविकामदर तेरेसायांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.