29 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs
29 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 मार्च 2022)
प्रभा अत्रेंपासून भालाफेकपटू निरज चोप्रापर्यंत अनेक दिग्गज पद्म पुरस्काराने सन्मानित :
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी 2022 च्या पद्म पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करत सन्मानित केलं.
- यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्यापासून टोकिओ ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या निरज चोप्रापर्यंत अनेकांचा समावेश आहे.
- प्रभा अत्रे आणि कल्याण सिंह यांना पद्मविभूषण, तर भारत बायोटेकचे कृष्णा एला आणि सुचित्रा एला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
- कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
- याशिवाय टोकिओ पॅरालम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि भालाफेकपटू सुमित अंतिलला पद्मश्री, गायिका सुलोचना चवन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
- आयरलँडचे प्राध्यापक रुट्गर कोर्टेनहोर्स्ट यांना आयरिश शाळांमध्ये संस्कृत भाषेच्या प्रसाराच्या प्रयत्नांसाठी पद्मश्री देण्यात आला.
- प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगमला देखील पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
- तर या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते.
- तसेच यंदा एकूण 128 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यात दोन जोडप्यांचा समावेश आहे.
- तसेच या पुरस्कारांमध्ये 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
प्रमोद सावंत यांना गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ :
- गोवा विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 40 सदस्यांच्या सभागृहात 20 जागा जिंकणाऱ्या भाजपचे नेतृत्व करणारे आणि तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले प्रमोद सावंत यांचा सोमवारी दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.
- पणजीनजीकच्या बांबोलिम येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या समारंभात राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्ले यांनी सावंत यांच्यासह भाजपच्या आठ आमदारांना शपथ दिली.
- तर 10 हजाराहून अधिक लोक या कार्यक्रमाला हजर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व श्रीपाद नाईक, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मूळचे गोवेकर असलेले हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, गोव्याचे निवडणूक प्रभारी असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.
दोषी, गैरदोषी व्यक्तीच्या हातापायांचे ठसे, छायाचित्रे 75 वर्षे जतन करण्याची तरतूद :
- एखाद्या आरोपीची माहिती जतन करण्याचा अधिकार देणारे ‘गुन्हेगारी प्रक्रिया ओळख’ विधेयक सोमवारी लोकसभेत मांडले गेले.
- तर त्या विधेयकाद्वारे यासंदर्भातील ‘कैदी ओळख’ हा जुना कायदा रद्द केला जाईल.
- नव्या कायद्याद्वारे दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोषी व गैरदोषी व्यक्तींच्या बोटांचे आणि पायाचे ठसे, तसेच छायाचित्रे घेण्याची व ते जतन करण्याची परवानगी पोलिसांना दिली जाईल.
- विद्यमान गुन्हेगार ओळख कायदा 1920 मध्ये तयार केला गेला होता.
- नव्या कायद्यामुळे तपास यंत्रणांना गुन्ह्यांची उकल करताना मोठी मदत होऊ शकेल, असा युक्तिवाद केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा-टेनी यांनी केला.
- तसेच हे विधेयक पोलिसांना आरोपी व अन्य व्यक्तींच्या बोटांचे ठसे, तळहाताचे ठसे, पायाचे ठसे, छायाचित्रे, बुबुळ आणि डोळ्यातील पडद्याचे स्कॅन, शारीरिक-जैविक नमुन्यांचे विश्लेषण, संबंधित व्यक्तीच्या वर्तवणुकीशी संबंधित गुणधर्म, स्वाक्षऱ्या, हस्ताक्षर आदी माहिती जतन करता येऊ शकेल.
विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धात कॅनडा 36 वर्षांनंतर विश्वचषकासाठी पात्र :
- कॅनडाने जमैकाला 4-0 असे पराभूत करत तब्बल 36 वर्षांनंतर ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळवले.
- कॅनडाने 1986 च्या विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
- त्याआधी किंवा नंतर त्यांना या स्पर्धेसाठी पात्र ठरता आले नव्हते.
- तर यंदा मात्र त्यांनी पात्रता फेरीत अप्रतिम कामगिरी केली.
दिनविशेष:
- सन 1849 मध्ये ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले होते.
- अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक ‘पाडुरंग लक्ष्मण‘ तथा ‘बाळ गाडगीळ‘ यांचा जन्म 29 मार्च 1926 मध्ये झाला
होता. - 1968 या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना झाली.
- सन 1982 मध्ये एन.टी. रामाराव यांनी तेलगू देसम या पक्षाची स्थापना केली.