29 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs

29 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 जुलै 2022)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर :

 • महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानतर्फे मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना शि‌वशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी वर्षाचा समारोप आणि तिथीनुसार जन्मदिनाची पूर्वसंध्या असे दुहेरी औचित्य साधून 1 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 • याच कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते इतिहास अभ्यासक संदीप तिखे यांना श्रीमंत बळवंत मोरेश्वर पुरंदरे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जुलै 2022)

17 वर्षांवरील तरुणांना आगाऊ मतदार नोंदणीची संधी :

 • निवडणुकांमध्ये तरुणांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने निवणूक आयोग प्रयत्न करत आहे.
 • त्यानुसार आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून 17 वर्षे पूर्ण झालेले तरुण मतदार यादीत आगाऊ नोंदणी करू शकतात.
 • मात्र मतदान करण्याचा अधिकार 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनाच मिळणार आहे.
 • पूर्वी एक जानेवारी किंवा त्याअगोदर वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तरुण मतदार यादीत नाव नोंदणी करण्यास पात्र ठरत होते, तर एक जानेवारीनंतर 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी एक वर्षभर प्रतीक्षा करावी लागत होती.
 • निवडणूक कायद्यातील बदलानंतर एक जानेवारी, एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबरला 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार नोंदणी करता येते.

गैया गृहितकाची मांडणी करणारे वैज्ञानिक जेम्स लव्हलॉक यांचं निधन :

 • गैया गृहितकाची मांडणी करणारे आणि पर्यावरण वैज्ञानिक जेम्स लव्हलॉक यांचं 103 व्या वाढदिवसाला निधन झालं.
 • लव्हलॉक हे यूकेच्या सर्वात प्रतिष्ठित स्वतंत्र शास्त्रज्ञांपैकी एक होते.
 • 1960 च्या दशकाच्या मध्यापासून ते एकटेच त्यांच्या प्रयोगशाळेत विविध प्रयोग करायचे आणि हवामानाचे अंदाज बांधत होते.
 • समाज कालानुसार सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळेच पृथ्वी धोक्यात आली आहे, अशी मांडणी जेम्स लव्हलॉक यांनी केली होती.
 • दुसऱ्या महायुद्धात स्फोटक द्रव्यांमुळे होणाऱ्या भाजण्याच्या जखमा लवकर बऱ्या करण्यावर लव्हलॉक यांनी संशोधन केले.
 • 1930 मधल्या शोधानंतर तयार केलेली जवळपास सर्व सीएफसी संयुगे अजूनही जागतिक वातावरणात तशीच होती व वाढत होती, हे त्यांनी 1971 साली ईसीडीचा वापर करून दाखवून दिले.
 • या निरीक्षणाचा वापर करून 1974 मध्ये मोलिना व रॉलंड या वैज्ञानिकांनी सीएफसी वायू व पृथ्वीवरील ओझोन थराला पडणारे भगदाड यांचा संबंध दाखवून दिला.
 • या शोधामुळे सीएफसी निर्मितीवर पाश्चिमात्य जगात बंदी घालण्यात आली. त्यांनी केलेली ‘गाईया गृहितकं’ याची मांडणी प्रसिद्ध झाली.

बुद्धिबळ महोत्सवाला प्रारंभ :

 • भारतातील बुद्धिबळ महोत्सवाला प्रारंभ झाला असून गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर या मान्यवरांच्या उपस्थित बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
 • उद्घाटन सोहळय़ात भारत आणि तमिळनाडूच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले.
 • तसेच भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने ऑलिम्पियाड क्रीडाज्योत स्टॅलिन आणि मोदी यांच्याकडे सुपूर्द केली.
 • त्यानंतर आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश युवा ग्रँडमास्टरांसह भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर एस. विजयालक्ष्मी यांनी ही क्रीडाज्योत हाती घेतली.

वेगाच्या बादशाहने केली निवृत्तीची घोषणा :

 • फॉर्म्युला वन शर्यत तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
 • तरुणाईच्या अशाच एका लाडक्या खेळाडूंनी फॉर्म्युला वनमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.
 • चार वेळा विश्वविजेता सेबॅस्टियन वेटेलने गुरुवारी निवृत्तीची जाहीर केली.
 • हा हंगाम 2022 त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा हंगाम ठरणार आहे.
 • सध्या अ‍ॅस्टन मार्टिन संघाचा चालक असलेला 35 वर्षीय सेबॅस्टियनने 2010 ते 2013 मध्ये रेड बुलकडून खेळताना चार विजेतेपदं पटकावली होती.
 • याशिवाय, त्याने फेरारीसोबत सहा हंगाम खेळ केला होता.

दिनविशेष :

 • 29 जुलै 1852 मध्ये पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
 • जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान 29 जुलै 1920 मध्ये सुरू झाली.
 • टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया 29 जुलै 1946 मध्ये असे नामकरण झाले.
 • 29 जुलै 1957 मध्ये इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.
 • भारत-श्रीलंका शांतता करारावर 29 जुलै 1987 मध्ये सह्या करण्यात आल्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 जुलै 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.