29 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 July 2018 Current Affairs In Marathi

29 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 जुलै 2018)

प्लास्टिक, थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांचा शोध :

 • प्लास्टिक आणि थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांची पैदास पुण्यातील एका संशोधकाने केली आहे.Plasticbagban
 • त्यामुळे पुढील काळात प्लास्टिक विघटनाची चिंता पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे.
 • तर मेणअळी किंवा अगदी घराच्या धान्यात होणाऱ्या पाखरांच्या अळ्याही प्लास्टिक खातात.
 • त्यापूर्वीच गेल्या तीन वर्षांपासून डॉ. राहुल मराठे यांनी या अळ्यांची जवळपास बारावी पिढी प्लास्टिकच्या खुराकावर जोपासली आहे.
 • ह्या अळ्या प्लास्टिकमधील पॉलिमर हा घटक खाऊन पचवतात. प्लास्टिकच्या एका पिशवीचे विघटन होण्यासाठी 10
 • वर्षे लागतात तिथे साधारण 50 अळ्या एक पिशवी चार दिवसांत नष्ट करतात. तर अळ्यांची विष्ठा ही खत म्हणून वापरता येते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जुलै 2018)

मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठीही आता कागदविरहीत तिकीट :

 • मध्य व पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवाशांसाठी कागदविरहीत (पेपरलेस) तिकीट सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता मेल-Railway
 • एक्स्प्रेस गाडय़ांच्या प्रवाशांसाठीदेखील ही सुविधा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे.
 • यावर रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) चाचणी सुरू आहे.
 • तिकिटांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेल्वेच्या ‘क्रिस’ने मोबाईल तिकिटाची संकल्पना आणली.
 • 2015 मध्ये प्रथम कागदविरहीत (पेपरलेस) तिकीट सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली गेली.

मराठा आरक्षणावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन :

 • मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळताच, आरक्षणाच्या कायद्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार आहे.
 • आरक्षणासाठीच्या आंदोलनात हिंसाचार न करणा-या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 • तसेच मराठा समाजासाठीची पदे रिकामी ठेवूनच राज्य सरकार मेगा भरती करणार आहे.

हिमा व नीरज यांची काँटिनेंटल चषक स्पर्धेसाठी निवड :

 • हिमा व नीरज यांच्यासह भारताच्या सात खेळाडू 8 व 9 सप्टेंबरला होणा-या काँटिनेंटल चषक स्पर्धेत सहभाग घेणारHima Dasआहेत.
 • चेक प्रजासत्ताक येथील ओस्ट्राव्हा येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
 • आशियाई अॅथलेटिक्स असोसिएशनने या स्पर्धेत आशिया-पॅसिफिक संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारताच्या सात खेळाडूंची निवड केली.
 • तसेच या स्पर्धेत प्रत्येक विभागीय असोसिएशनमधील क्रमावारीतील आघाडीच्या खेळाडूंना सहभाग घेण्याची संधी मिळते.
 • आंतरराष्ट्रीय महासंघाच्या क्रमवारीनुसार नीरज (भालाफेक), मोहम्मद अनास ( 400 मी.), जिंसन जॉन्सन (800मी.) आणि अरपिंदर सिंग (तिहेरी उडी) यांनी पुरूष विभागात, तर
 • महिलांमध्ये हिमा दास (400 मी.), पी. यू. चित्रा (1500मी.) आणि सुधा सिंग (3000 मी. स्टीपलचेस) यांनी स्थान पटकावले आहे.

दिनविशेष :

 • 29 जुलै 1852 मध्ये पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
 • जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान 29 जुलै 1920 मध्ये सुरू झाली.
 • टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया 29 जुलै 1946 मध्ये असे नामकरण झाले.
 • 29 जुलै 1957 मध्ये इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.
 • भारत-श्रीलंका शांतता करारावर 29 जुलै 1987 मध्ये सह्या करण्यात आल्या.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जुलै 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.