29 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

2020 सीडी थ्री
2020 सीडी थ्री

29 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 फेब्रुवरी 2020)

सापडला पृथ्वीचा ‘दुसरा चंद्र’:

 • पृथ्वीला चंद्र किती आहेत असा प्रश्न विचारल्यास अगदी लहान पोरगाही एक असं उत्तर देईल. मात्र लवकरच या प्रश्नाचे उत्तर दोन असं द्यावं लागणार आहे. कारण पृथ्वीचा दुसरा चंद्र शोधल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे.
 • तर संशोधकांनी पृथ्वीच्या दुसऱ्या चंद्राला 2020 सीडी थ्री असं नाव दिलं आहे.
 • तसेच मागील तीन वर्षांपासून हा अगदी लहानश्या आकाराचा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. अमेरिकेतील अॅरेझॉना येथील कॅटालीना स्काय सर्व्हे येथील संशोधकांनी या चंद्राचा शोध लावला आहे.
 • 19 फेब्रुवारी रोजी येथील संशोधकांना हा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसला. याआधीही संशोधकांना हा चंद्र सहा वेळा दिसला होता. त्यामुळे हा पृथ्वीचा मीनी मून असण्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केला आहे.
 • तर हा चंद्र 1.9 मीटर लांब आणि 3.5 मीटर रुंद आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर तो एका लहान गाडीच्या आकाराचा आहे.
 • या नव्या चंद्राची परिक्रमण कशा ठरलेली नसून तो कधी पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी लांब असंही संशोधकांनी सांगितलं आहे. याआधी 2006 साली ‘आरएच वन 20’ ही छोटी खगोलीय वस्तू पृथ्वी भोवती फिरत होती.
 • सप्टेंबर 2006 ते जून 2007 पार्यंत पृथ्वीभोवती भ्रमण केल्यानंतर ही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर केली.
 • ‘आरएच वन 20’ प्रमाणे ‘2020 सीडी थ्री’ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून निघून जाईल असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे

एसएन श्रीवास्तव दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त :

 • दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एसएन श्रीवास्तव यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते अमूल्य पटनायक यांची जागा घेणार आहेत.
 • तर दिल्लीतील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमूल्य पटनायक यांच्याजागी एसएन श्रीवास्तव यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 • एसएन श्रीवास्तव 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना सीआरपीएफमधून पुन्हा दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी आणण्यात आले आहे.

पुतळा, स्टेडियमनंतर आता गुजरातमध्ये उभे राहणार जगातील सर्वात उंच मंदिर :

 • जगातील सर्वात मोठा पुतळा आणि जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्याचा मान मिळवल्यानंतर आता गुजरातमध्ये अजून एक भव्यदिव्य वास्तू उभी राहणार आहे. गुजरातमध्ये आता जगातील सर्वात सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येणार आहे.
 • पाटिदारांची कुलदेवात असलेल्या माँ उमिया देवीचे हे मंदिर गुजरातमध्ये वैष्णौदेवी-जसपूर मार्गावर उभारण्यात येणार आहे.
 • तर या मंदिराची उंची 131 मीटर असेल. तसेच या मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 1 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. तसेच या मंदिराचा भूमिपूजनाला दोन लाख भाविक उपस्थित राहणार आहेत.
 • तसेच या मंदिराचा आराखडा जर्मन आणि भारतीय वास्तुशास्त्रज्ञांनी मिळून तयार केला आहे. मंदिराच्या आतील ह्युईंग गॅलरीमधून अहमदाबाद शहर दिसणार आहे. तसेच या मंदिराचा गर्भगृहाची बांधणी भारतीय संस्कृतीप्रमाणे करण्यात येईल.
 • मंदिरामध्ये माँ उमिया देवीची मूर्ती 52 मीटर उंचीवर स्थापित केली जाईल. तसेच मंदिरामध्ये एक शिवलिंगाचीही स्थापना करण्यात येणार आहे.

पृथ्वी शॉला अर्धशतकी खेळीसह सचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान :

 • न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय संघाने मुंबईकर पृथ्वी शॉला संधी दिली.
 • रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या पृथ्वी शॉला वेलिंग्टन कसोटी सामन्यात आपली छाप पाडता आली नाही. पहिला कसोटी सामना भारतीय संघाने गमावला.
 • तर पृथ्वी शॉने पहिल्या कसोटी सामन्यात्या तुलनेत आश्वासक फलंदाजी करत चांगली फटकेबाजी केली.
 • पृथ्वीने 64 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह 54 धावा केल्या. सलामीवीर मयांक अग्रवाल स्वस्तात माघारी परतल्यानंतर पृथ्वीने दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासोबत अर्धशतकी भागीदारी केली.

आशिया चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडेच :

 • भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सुरु असलेल्या सुंदोपसुंदीवर अखेरीस तोडगा निघालेला आहे. आशिया चषकाचं यजमानपद अखेरीस पाकिस्तानकडेच राहणार असून स्पर्धा पाकिस्तान ऐवजी दुबईत खेळवली जाणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 • तर आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत यंदाच्या आशिया चषकाच्या यजमानपदाचे हक्क पाकिस्तानकडे देण्यात आलेले होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यामुळे या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं.
 • यंदाचा आशिया चषक दुबईत खेळवला जाईल, आणि भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ या स्पर्धेत खेळतील. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला रवाना होण्याआधी गांगुलीने पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली.
 • तसेच 3 मार्चला दुबईत आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक पार पडली जाणार आहे.

दिनविशेष :

 • 29 फेब्रुवरी 1996 मध्ये क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडिज संघाला 73 धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.
 • 634 मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोर्‍याचे बांधकाम 29 फेब्रुवरी 2012 मध्ये पूर्ण झाले.
 • 29 फेब्रुवरी 1896 भारताचे 4थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
 1. Durga gulbake says

  Thanks for this imformation sir

Leave A Reply

Your email address will not be published.