28 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

28 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 सप्टेंबर 2021)

आयुष्मान भारत डिजिटल योजना :

  • आयुष्मान भारत डिजिटल योजना क्रांतिकारक बदल घडवील, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
  • तर या योजनेत लोकांना डिजिटल हेल्थ आयडी दिला जाणार असून त्यात आरोग्याविषयक नोंदी असतील असे त्यांनी स्पष्ट केले.
  • तसेच यातील आयुष्मान भारत डिजिटल योजनेचा पथर्शक प्रकल्प हा पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्लय़ावरून 15 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर केला होता.
  • सध्या आयमुष्मान भारत डिजिटल योजना पथदर्शक पातळीवर सहा केंद्रशासित प्रदेशात राबवली जात होती.
  • तर आता ती देशभरात राबवण्यात येत असून त्याचवेळी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची तिसरी वर्षपूर्ती साजरी करीत आहे.
  • तसेच 130 कोटी आधार कार्ड, 118 कोटी मोबाइल वापरकर्ते, 43 कोटी जन धन बँक खाती अशा पायाभूत सोयी जगात कुठेही सापडणार नाहीत.
  • आता या योजनेतील व्यक्तींना डिजिटल हेल्थ आयडी दिला जाणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य नोंदी या डिजिटल पातळीवर साठवल्या जाणार आहेत.

लष्करीदृष्टय़ा महत्त्वाचा जोजिला बोगदा 2026 पर्यंत होणार पूर्ण :

  • लडाखमधील कारगिल, लेह आणि द्रास या देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील भूप्रदेशाशी बारामाही लष्करी तसेच आर्थिक संपर्क कायम ठेवू शकणाऱ्या जोजिला बोगद्याचे बांधकाम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
  • तसेच या बोगद्याचे काम प्रगतीपथावर असून भूषृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी त्याची मंगळवारी पाहणी करणार आहेत.
  • सोनमर्ग ते लेह हा मार्ग हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे वाहतुकीसाठी बंद होतो. त्यामुळे कारगिल, द्रास आणि लेह भागांत सैन्य तैनात करणे व त्यादृष्टीने लष्करी वाहतुकीसाठी अन्य जवळचा मार्ग उपलब्ध नाही.
  • तर पर्यायी मार्ग खर्चिक असून तो चीन व पाकिस्तान सीमांच्या नजिक असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जोजिला बोगदा बनवला जात आहे.
  • जोजिला बोगदा समुद्रसपाटीपासून 11 हजार 587 फुटांवर बांधला जात असलेला आशियातील 14.15 किमीचा सर्वात मोठा बोगदा असेल.
  • लडाखमधील राष्ट्रीय महामार्ग 1 वर झेडमोड ते जोजिला या एकूण 33 किमीच्या पट्टय़ात दोन बोगदे होणार आहेत.

‘आकाश प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने जमीनीवरुन हवेत मारा करत लक्ष्यभेद करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राच्या सुधारीत आवृत्तीची ‘आकाश प्राईम’ ची यशस्वी चाचणी आज घेतली.
  • सुरुवातीला विकसित करण्यात आलेल्या आकाश क्षेपणास्त्राच्या तुलनेत नव्या दमाच्या आकाश प्राईममध्ये स्वदेशी उपकरणांचा जास्त वापर करण्यात आला आहे.
  • आकाश प्राईममध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणखी अचुकतेने ग्रहण करणारी स्वदेशी बनावटीची यंत्रणा बसवण्यात आली आहे.
  • तसंच उंचावर गेल्यावर थंड हवेतही खात्रीशीर काम करु शकेल अशा पद्धतीच्या सुधारणा या आकाश प्राईममध्ये करण्यात आल्या आहेत.
  • आकाश प्राईमची चाचणी करतांना जमिनीवरील आवश्यक पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
  • तर या सर्वांमुळे जमीनीवरुन हवेतील लक्ष्यभेद करण्याची भारताची संरक्षण प्रणाली आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.
  • 30 किलोमीटरच्या परिघातील जमिनीपासून 20 किलोमीटर उंचीपर्यंतचे लक्ष्य अचूक भेदण्याची आकाश क्षेपणास्त्राची मूळ क्षमता आहे.
  • ध्वनीपेक्षा 3 पट वेगाने आकाश क्षेपणस्त्र लक्ष्यभेद करु शकते. तेव्हा आकाश प्राईमच्या रुपात आकाश क्षेपणास्त्रात आणखी अचूकता आली आहे.

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रिगट स्थापन:

  • वस्तू व सेवा कर प्रणालीतील (जीएसटी) त्रूटी दूर करुन ती सहज, सोपी करण्यासंदर्भात सुधारणा सूचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे.
  • मंत्रिगटाने शिफारस केलेल्या आणि जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर देखील हाच मंत्रिगट देखरेख ठेवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, आंध्रप्रदेशचे अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ, आसामचे अर्थमंत्री अजंटा निओग, छत्तीसगडचे व्यापार करमंत्री टी. एस. सिंगदेव, ओडीसाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी, तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पलानीवेल थैगाराजन यांचा समावेश आहे.

दिनविशेष:

  • 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन, आंतरराष्ट्रीय जाणून घेण्याचा हक्क दिन तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन म्हणून पाळला जातो.
  • क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला होता.
  • जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.
  • 28 सप्टेंबर 1967 हा दिवस सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा स्मृतीदिन आहे.
  • ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म 28 सप्टेंबर 1982 मध्ये झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.